Skip to main content

तुमचे शोकेसमध्ये ठेवल्यासारखे आयुष्य ...!!

Published on 17/01/2011 - 07:23 प्रकाशित मुखपृष्ठ
काल तुम्ही लांबून तुमची गाडी दाखविली म्हातार्याला काय मस्त रंग होता हो तिचा गाडीच नाव काय तुम्ही घेतले डोक्यावरून गेले बघां त्याच्या त्याला वाटले आपण पण फिरवावा जरासा हात तुमच्या नजरेत त्याच्या हाताची किमंत दिसली नि हिमंत नाय झाली बघा म्हातार्याची तिला कुरवाळायला... मायच्यान ..!! शेती करणारां म्हातारा आयुष्यभर तेच केले कसा लावणार तुमच्या गाडीला हात रस्त्यात तुम्हाला तुमचा मित्र भेटला तेव्हा तुम्हाला लई लाज वाटली डोळ्यात दिसत व्हतं पाक तुमच्या...
लेखनविषय:

याद्या 1987
काव्यरस

भज्जी पार्टी

Published on 17/01/2011 - 07:15 प्रकाशित मुखपृष्ठ
कधी नव्हती तशी, हवा थंडगार होती सुर्याने कापसाची रजाई ओढली होती हवेच्या झुळूका गुदगुल्या करून जाती ग्लासांनी भज्यांची ऑर्डर सोडली होती नाकाने इकडेतिकडे पाहीले थोडे हुंगून पिणारे केव्हाचेच गेले होते रंगून पेय ओरडले भजी!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 1820

ह्या नंतरची कथा काय असावी ?

Published on 16/01/2011 - 22:18 प्रकाशित मुखपृष्ठ
समस्त मिपाकरांनो, धुवाधार पावसात अशीच सुचलेली ( अर्धवट, ) एका कथेची सुरवात.....जरा मदत कराल ? दूर कुथेतरी.......गर्द हिरव्या रानात.......ओथंबलेलं निळं आभाळ......बेधुंद कोसळणारा पाऊस.......उन्मत्त निसर्ग.......दूरवर लुकलुकणारे दिवे......अनोळखी वाटा......जांभळे डोंगर.....भारलेला आसमंत.....गच्च ओली मिठी......गरम श्वास......थरथरणारे देह.....ह्ळुवार स्पर्श......निथळ्णारे पाणी.....सेरभैर मन.......तो आणी ती......
लेखनविषय:

याद्या 6007

कायद्याचे पुस्तक आणि "copyright"

Published on 16/01/2011 - 18:50 प्रकाशित मुखपृष्ठ
आपण बाजारात मिळणारी कायद्याची पुस्तके विकत घेतो. त्या पुस्तकावर "copyright" हा लेखकाच्या नावे दिलेला असतो. माझे म्हणणे असे आहे की कायद्याचे कोणतेही पुस्तक हे मूळ "act"/code" चे सरळसरळ भाषान्तर असते. सर्व प्रकाशकान्नी छापलेल्या कायद्यावरील पुस्तकातील भाषा ही जवळ्जवळ सारखीच असते लेखक हा जितका निष्णात कायदे पण्डीत असेल्,तेवढ्या प्रमाणात "commentries" चे स्वरुप बदलु शकते .परन्तु आपण त्या अधिक महिती बद्दल पैसे देत असतो. कायदा हा "constitution"चा भाग असतो. लोकशाही मधे जनता ही सार्वभोम आहे. त्या मुळे कायद्याच्या पुस्तकान्चे "copyright" लेखकाच्या नावे नसावेत असे मला वाटते.

याद्या 3172

मसाला एग्स.. केसू स्टाईल

Published on 16/01/2011 - 17:27 प्रकाशित मुखपृष्ठ
८ जानेवारी पासून डायेट सुरू झाले (१ आठवड्यात एक पण केक घशाखाली उतरवला नाही.. खरच..वाढलेल्या वजनाची शप्पथ.. )त्यामुळे शीतकपाटातील पदार्थांची हालचाल मंद झाली, शीतकपाटात शिल्लक असलेली अंडी गेले २-३ दिवस सारखी वाकुल्या दाखवत होती.. शेवटी १५ जानेवारीला डायेटला १-२ दिवस विश्रांती द्यावी असा निर्णय मी आणि दिनेशनी एकमुखांने मंजूर केला.. आणि मसाला एग्स आणि ब्रेड बेत पक्का केला चला तर मग साहित्य लिहून घ्या..

याद्या 10113

देवा, येऊ देत आता अजून एक विमान...!

Published on 16/01/2011 - 17:13 प्रकाशित मुखपृष्ठ
देवा परमेश्वरा, आज सकाळीच ते अत्यवस्थ असल्याची बातमी कानावर आली..! देवा, आता पुरे झालं. ने त्यांना आता तुझ्या घरी. अगदी शांतपणे, त्रास न होता डोळे मिटू देत..! ते वयोवृद्ध आहेत, गलितगात्र आहेत, खूप आजारी आहेत. गेल्या बर्‍याच काळापासून अक्षरश: अंथरुणातच आहेत. माझ्यासारखे त्यांचे सामन्य भक्त, प्रशंसक, सगेसोयरे, हितचिंतक सारे त्यांच्या भोवती आहेत रे, पण तरीही ते मात्र पूर्णत: परावलंबी आहेत, असहाय्य आहेत.. आता अश्या अवस्थेत नाही पाहावत त्यांना..! याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा..! त्यांच्या या अभंगाचे स्वर कानी घोळताहेत..!
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 6194

विकिचा दहावा वाढदिवस

Published on 16/01/2011 - 16:46 प्रकाशित मुखपृष्ठ
काल विकिपिडियाचा दहावा वाढदिवस जगभरात साजरा करण्यात आला. भारतात खुद्द मुंबईत पाच वेगवेगळ्या ठिकाणी, पुणे, बंगळूरू, म्हैसूर, कोलकाता अशा नव्वदएक ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. त्यातल्या एका कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग मला लाभला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 7631

१३ वी रास...

Published on 16/01/2011 - 16:34 प्रकाशित मुखपृष्ठ
१३ वी रास आल्याने प्रत्येकाच्या आधीच्या (जुन्या) राशी बदलल्या. आता प्रश्न असे की... १. राशी बदलल्या मुळे भविष्य पण बदलले का??? २. जर बदलते तर ललाट रेषांचे काय ? (म्हणजे लहान पणी ऐकल्याप्रमाणे नशीब्/भाग्य/ललाट रेषा कधीच बदलत नाहीत, जे नशीबात असत ते होत.) ३. जर भविष्य बदलत नसेल किंवा थोडेफार बदलत असेल तर "सर्व राशींचे भविष्य इकडून तिकडून सारखेच असते काय??? ४. या आधी १३वी रास का वगळली गेली?? (१३ क्रमांक अशुभ म्हणून?) ५. जर ती वगळली होती होती तर ती आत्ता परत का सामाविष्ट केली?

याद्या 4674