विकिचा दहावा वाढदिवस
काल विकिपिडियाचा दहावा वाढदिवस जगभरात साजरा करण्यात आला. भारतात खुद्द मुंबईत पाच वेगवेगळ्या ठिकाणी, पुणे, बंगळूरू, म्हैसूर, कोलकाता अशा नव्वदएक ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. त्यातल्या एका कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग मला लाभला. त्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे:
दि पझल केकः
विकिमिडियाचे चीफ ग्लोबल डेव्हलपमेंट ऑफिसर बॅरी न्यूस्टेड केक कापताना:
कार्यक्रमाची सुरूवात जिमी वेल्स यांच्या एका व्हिडिओ संदेशाने झाली. विकिच्या वाढीस त्याच्या वाचकांचा आणि माहितीत भर घालणार्या सदस्यांचाही हातभार आहे. जिमी यांनी सर्वांचे या प्रसंगी अभिनंदन केले आणि त्याच बरोबर आभारही मानले. त्या नंतर बॅरी न्यूस्टेड यांनी विकिच्या वाटचालीचा आढावा घेतला.
२००१ सालचं भारताबद्दलची माहिती सांगणारं पान असं दिसत होतं: [फक्त दोन ओळी आणि त्यातही चुका.]
आणि आता पहा बरं:
भारतीय भाषांमध्ये आकडेच पाहायचं तर हिंदी आणि तेलुगूनंतर मराठीचा नंबर लागतो. परंतु मराठीत माहितीत भर घालणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हे त्यांनी आवर्जून नमूद केलं. विकिमध्ये भर घालताना काही अडचणी येतात का, असतील तर नक्की कशा प्रकारच्या आणि त्यासाठी काय काय पर्याय उपलब्ध आहेत याबद्दलची छान चर्चाही झाली.
त्यातले काही मुद्दे:
[विकी जगभरातल्या मोठ्या कंपन्यांच्या तुलनेतः]
१. विकी केवळ ६० कर्मचारी आणि ४५० सर्व्हरच्या साहाय्याने इतका मोठा कार्यभार पेलून आहे.
२. विकिपिडिया खरंतर विकिमिडियातर्फे चालवलं जातं आणि आता केवळ पिडियाच नव्हे तर इतर प्रोजेक्ट्सकडेही लोकांना वळवायचं पुढचं उद्दिष्ट आहे. त्यांचे इतर प्रोजेक्ट्सः
कॉमन्स, विकिन्यूज, विक्शनरी,विकिकोट, विकिबुक्स, विकिसोर्स, विकिस्पेसीज, विकिवर्सिटी, आणि मेटाविकि.
३. जगभराच्या तुलनेत भारत हा वाचकसंख्येच्या दृष्टीने सर्वात जास्त झपाट्याने वाढत आहे. [fastest growing region in terms of readership]
४. विकिमध्ये चुकीची माहिती दिल्यास, इतर वाचक व स्वयंसेवी काम करून अॅडमिनस्ट्रेटर बनलेले त्या माहितीची लगेच नोंद घेतात. ती माहिती फ्लॅग होऊन ती परस्पर उडवली न जाता त्या सदस्याला त्यासंबंधी पत्र पाठवले जाते. सात दिवसांत ती माहिती काढून टाकली नाहीतर उडवली जाते.
५. अशा वेळेस वादग्रस्त माहिती दिल्यासही सात दिवसांची वाट पाहिली जाते का, यावर अशी वादग्रस्त पाने व प्रोजेक्ट्स अर्ध अथवा पूर्णसुरक्षित [semi/full protected] ठेवले जातात. तिथली माहिती सतत निरिक्षणाखाली असते. उदा. विकिइंडिया हा पूर्णसुरक्षित प्रोजेक्ट आहे. तसेच इस्त्रायल-पॅलेस्टाईनची बरीच पानेसुद्धा.
६. अशी पावलं उचलल्याने सहसा कायदेशीर बाबींना तोंड द्यावं लागत नाही. सगळे सर्व्हर्स आणि बरेचसे कर्मचारी अमेरिकेत आहेत. तरी जे अमेरिकेत राहात नाहीत त्यांना वेळ पडल्यास आणि ते त्या वादग्रस्ततेस कारणीभूत असल्यास ते कायद्याच्या कचाट्यात कदाचित सापडू शकतात.
७. कार्यक्रमास आलेल्या एका उत्साही कन्नड काकांनी आपल्या अप्रकाशित पुस्तकाबद्दल काही विकिपाने लिहिली होती व त्याचे लेखक म्हणून आपलं पान तयार केलं होतं. तेव्हा त्यांना स्वतःसाठी पान तयार करू नये असा विकिसंदेश आला होता. हे त्या काकांनी सांगताच सदस्यपान आणि व्यक्तिंसाठीची पानं यात कसा भेदभाव आहे आणि तो कसा हाताळायला हवा यावर न कंटाळता सगळ्यांनीच मार्गदर्शन केलं.
८. संपादन करणं अवघड वाटत असेल अथवा आपण आधीच्या माहितीचं वाटोळं करू असं वाटत असेल तर सँडबॉक्स वापरून आधी पूर्वदृश्य करूनच माहिती प्रकाशित कशी करावी हे अगदी उदाहरणासहित दाखवलं.
जरी तिथे बॅरीचं भाषण चालू असेल तरी, कार्य्क्रमाला उपस्थित असणार्या मुंबईतील काही विकि स्वयंसेवकांनीही त्याला वेळोवेळी साहाय्य केलं. त्यामुळे कार्यक्रमात छान खेळीमेळीचं वातावरण होतं. उदाहरणादाखल तयार केलेलं 'सेमिनार हॉल व्हीजेटीआय' हे पान उदाहरण चालू असतानाच चुकीचे म्हणून एक-दोघांकडून फ्लॅग होऊन आलं. साहजिकच अशी अनावश्यक पानं किती झटपट काढून टाकली जातात हे न सांगताच कळलं.
भारतात प्रोग्रॅम असल्याने भारतीय भाषांचा विषय निघणं साहजिक होतं. विकिचे अंगिका भाषेचे विकि अॅडमिनिस्ट्रेटर कुंदन अमिताभ यांनी कोणकोणत्या भाषांमधून विकि उपलब्ध आहे, आणि कोणकोणत्या भाषा अजून येत आहेत याबद्दल सांगितलं. त्याचबरोबर फक्त इंग्रजीतच नाही, तर सगळ्यांनी आपापल्या मातृभाषेत विकित भर घालण्यासाठी आवाहन केलं. टंकनासाठी इन्स्क्रिप्ट कळफलक एकदा लक्षात ठेवला की झालं असं त्यांचं म्हणणं होतं. [अर्थात यावर तिथे चांगलाच काकू झाला. फोनेटिक्सवर आधारित गुगल टूल्स, बरहा, गमभन वापरू नयेत असं त्यांचं म्हणणं , तर आम्हा वापरकर्त्यांचं तो कळफलक लक्षात राहात नाही, वर आम्हाला इंग्रजी की-लेआऊट सवयीचा झाल्याने तिथं लिहिण्याचा वेग जास्त असं मत होतं.]
कुंदन अमिताभ:
पुण्याच्या या मुलाने विकिचा २.३ जीबीचा ऑफलाईन बॅक-अप घेतलाय. त्याने तो नानापेठेतल्या एका छोट्या शाळेत दिलाय. आंतरजालाच्या जोडणीशिवाय आणि आता सवय झाल्यानं कुणाच्याही मदतीशिवाय त्या शाळेतली मुलं त्यांना हवी ती माहिती विकिवरून शोधून काढतात. कोणतीही नवी कल्पना समोर मांडून, तिला सरकारने आर्थिक मदत करावी आणि सरकारनेच चालवावी अशा अपेक्षेने तिची वाट लावून घेण्यापेक्षा असं स्वतः पुढाकार घेणं खरंच प्रशंसनीय, नाही का?
टीआयएफआरच्या संगणक विभागाचे प्रमुख नागार्जुन सर GNU लायसन्स बद्दल सांगताना:
बॅरीने येताना कपड्यांवर लावता येतील अशी बटनं आणली होती:
मी यातलं तिरंग्याचं-त्यावर देवनागरीत विकिपिडिया लिहिलं आहे ते आणि एक विकि ग्लोबचं अशी दोन बटन्स घेतली. (फोटो काढायचा कंटाळा!!!)
लॅपटॉपवर लावण्यासाठीची स्टिकर्सही होती. त्या माझ्या दुसर्या बटनावर हेच चित्र आहे.
बॅरीच्या भाषणानंतर बरेचजण निघून गेले होते. शेवटी उपस्थितवृंदः

वाचने
7627
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
F1...F1....F1
सुरेख...
उत्तम कार्यक्रम झाला की...
मस्त ग. छान वृत्तांत दिलास
धन्यवाद
दहा वर्षे....!!
विकी च्या बड्डे च्या मकी ला
In reply to विकी च्या बड्डे च्या मकी ला by Nile
+१
चांगला वृत्तांत
धन्यवाद
उत्तम वृत्तांत!!
धन्यवाद मस्त कलंदर, अतिशय छान
In reply to धन्यवाद मस्त कलंदर, अतिशय छान by ५० फक्त
सोपं आहे
अरे वा,
मस्त माहितीपुर्ण आढावा घेतला
In reply to मस्त माहितीपुर्ण आढावा घेतला by परिकथेतील राजकुमार
+१
छान वृ.
छान वृतांत मकीताई.. विकिला
छान !
विकीचे खंदे कार्यकर्ते
मस्त वृत्तांत
सुंदर वृतांत.
खुपच छान माहिती...
खुपच छान माहिती...
खूप चांगली माहिती दिली आहे पण
In reply to खूप चांगली माहिती दिली आहे पण by निनाद मुक्काम …
आपण
छान माहिती...
आपल्या विषयाचे प्राथमिक पान तरी सुव्यवस्थित असले पाहिजे
सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे धन्यवाद..
In reply to सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे धन्यवाद.. by मस्त कलंदर
योग्य पब्लीसिटी केली असती तर
वा!
उत्तम
इथे मला एक प्रामाणिक शंका आहे
वृत्तान्त उत्तम, पण विकिपीडिया ला "विकि" म्हणणे खटकले