धोतर फ़ाटेपाव्तर : नागपुरी तडका
धोतर फ़ाटेपाव्तर : नागपुरी तडका
मारखुंड्याच्या घरामंधी पारखुंडा गेला
धोतर फ़ाटेपाव्तर सोटे खाऊन आला ...॥१॥
गाढवाम्होरं भगवद्गीता वाचून काय होते?
माणसाची अक्कल तरी भायच उतू जाते
राखडीमंदी लोळू नको, सांगासाठी गेला
उसण उतरेपाव्तर लाथा खाऊन आला ...॥२॥
मुद्दे आटून गेले की, हातघाईवर येणार
शिवीगाळ करता करता, गुद्दे हाणून देणार
माणुसकीच्या गोष्टी त्याले समजवाले गेला
येता येता ढोरावाणी, रट्टे खाऊन आला ...॥३॥
पोशाखाच्या आधाराने, पारख होत नसते
कपड्याच्या आतमंदी, नंगे लपून बसते
मांडी उघडी दिसली म्हणून, झाकासाठी गेला
होती नव्हती थेय आपली, अब्रू देऊन आला ...॥४॥
अरधकच्चं ग्यान लई,
लेखनविषय:
याद्या
1972
काव्यरस
'पानिपत' पुस्तकाच्या आठवणी आणि श्री. विश्वास पाटील यांची मुलाखत
'रामायण'कार वाल्मिकी ऋषी आणि 'महाभारत'कार व्यास मुनी यांचे भारताच्या इतिहासामध्ये जे स्थान आहे तेच स्थान महाराष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात श्री. विश्वास पाटील यांना दिले पाहिजे. असे मराठी घर नसेल, असा मराठी उंबरा नसेल, असे मराठी मन नसेल की जे पानिपतच्या पराभवाच्या आठवणीने कातर होणार नाही. अर्थातच या महायुद्धाच्या इतिहासाला ही जी उंची लाभली आहे ती प्राप्त करुन देण्याच्या श्रेयाचे हक्कदार नि:संशयपणे श्री. पाटील हेच आहेत. मनामध्ये भावनांचा कल्लोळ माजवून देणारे त्यांचे लिखाण कुठेही वास्तवातले तपशील सोडत नाही आणि अतिरंजित सुद्धा वाटत नाही हे विशेष.
याद्या
6685
शनिवारची रोजनिशी
शनिवार दि. २२ जाने २०११
वेळ पहाटे २:०० स्थळः अंथरूण
खिडकीवर कबुतरांची टकटक.. खडबडून जाग आली.. पुन्हा झोपण्याच असफल प्रयत्न.. इ-सकाळ चाळून झाला.. सीएनएन.. एकमेव इंग्रजी वाहिनी.. फक्त अमेरिकेच्या बातम्या.. बहुतेक ५ वाजले.. टीव्हीच्या आवाजाने पुन्हा झोप चाळवली.. टीव्ही बंद केला.. डोक्यावरून क्विल्ट ओढले.. ट्रिंग ट्रिंग.. काय कटकट आहे.. इतक्या पहाटे कुणाचा फोन.. हॅलो.. अरे केसू कितीवेळा बेल वाजवतोय दार उघड.. दिनेशचा फोन.. बापरे ८ वाजले..
वेळ सकाळी ८:३० स्वाती दिनेश यांचे घर
कॉफी आणि केक.. व्हेन इन जर्मनी बिहेव लाइक जर्मन.. हा हा..
याद्या
10077
चिनम्मा,चिलकम्मा...
दुबई, एक स्वप्न नगरी...अनेकांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणारी एक रुपेरी पडद्यासारखी, झगमगाट असणारी नगरी. दुबईला मोठमोठी तारांकित हॉटेल्स आहेत, दुकाने आहेत आणि मोठ्या पगारावर नोकर्या करुन घर चालवण्यार्या मंडळींची संख्या सुद्धा इथे कमी नाही. इथे तर खरेदी उत्सव भरतो...खरेदी आणि विक्री. अशाच एका खरेदीची ही एक दर्दभरी कहाणी आहे.
रमेश एका सॉफ्टवेअर कंपनीत कामास होता आणि काही वर्ष नोकरी झाल्यावर त्याला त्याच्या कंपनीने १ वर्षासाठी कामानिमित्त दुबईला पाठवायचे ठरवले.
याद्या
3449
डिफायन्स
२००८ साली आलेला हॉलीवूडचा डिफायन्स हा सिनेमा दुसर्या महायुध्दातील एका सत्यकथेवर आधारीत आहे. जर्मनीच्या ताब्यात आलेल्या पोलंड आणि बेलोरूशियामध्ये एसएस स्क्वाड स्थानिक पोलीसांच्या मदतीने ज्यूंच्या धरपकडी आणि अमानुष हत्या सुरू करते. बेलोरुशियामधील एका खेडेगावातील बेल्स्की कुटुंबातील तिघे भाऊ या हत्यासत्रातून वाचतात; पण त्यांच्या वडीलांचा यात बळी जातो. ज्यू दिसला, की त्याला पकडून यातना शिबिरात टाकणे किंवा तिथल्या तिथे गोळ्या घालणे असे धोरण असते. बेल्स्की कुटूंबातील तिघे भाऊ जंगलात पळून जाण्यात यशस्वी होतात.
याद्या
2235
सिनेमा...सिनेमा!
`भानुविलास' टॉकीजची परवाच्या अंकातली बातमी आणि आजचा म.टा.मधला अभिजित थिटेचा लेख वाचून माझ्याही आठवणींना धुमारे फुटले.
अभिजितनं "भानुविलास'च्या आठवणी छानच जागवल्या आहेत. आपली गोची हीच असते, की जुन्या आठवणी सोडवत नाहीत आणि नव्याही हव्याशा वाटतात. आपल्या बालपणाच्या वेळची शाळा, मित्र-मैत्रिणी, घरं, रस्ते, ते वातावरण, तो गणवेश, सगळं सगळं तसंच राहावंसं वाटत असतो. आपण मात्र खूप बदललेलो असतो. आणि ही बदललेली स्थिती आपल्याला सोडायची नसते. पण जुनंही सगळं हवंहवंसं वाटत असतं.
याद्या
3565
सिनेमा...सिनेमा!
`भानुविलास' टॉकीजची परवाच्या अंकातली बातमी आणि आजचा म.टा.मधला अभिजित थिटेचा लेख वाचून माझ्याही आठवणींना धुमारे फुटले.
अभिजितनं "भानुविलास'च्या आठवणी छानच जागवल्या आहेत. आपली गोची हीच असते, की जुन्या आठवणी सोडवत नाहीत आणि नव्याही हव्याशा वाटतात. आपल्या बालपणाच्या वेळची शाळा, मित्र-मैत्रिणी, घरं, रस्ते, ते वातावरण, तो गणवेश, सगळं सगळं तसंच राहावंसं वाटत असतो. आपण मात्र खूप बदललेलो असतो. आणि ही बदललेली स्थिती आपल्याला सोडायची नसते. पण जुनंही सगळं हवंहवंसं वाटत असतं.
याद्या
927
मिसळपाव
