Skip to main content

तिची नशा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 08/05/2011 06:24 या दिवशी प्रकाशित केले.
थंड झुळका अंगावर येत असाव्यात, शहराच्या गजबटापासून दूर एखाद्या शांत तळ्याकाठी तो दिलनशी बार असावा, अगदी आतल्या अंधाऱ्‍या परमिट रुम ऐवजी बाहेरच हिरवळीवर अड्डा जमवण्याची मुक्त मुभा असावी, संध्याकाळची वेळ, पुनवेचा चंद्रप्रकाश, डीश भरुन ओसंडणारा आवडता चटपटीत चकणा अन् निमुळत्या ग्लाससोबत आवडीच्या ब्रँडची 'ती' उभी असावी! मित्रांनो आलं ना ध्यानात? अशा आल्हादक वातावरणात चंद्रकोरीसारखी शनैःशनैः काळजावर चढणारी तिची मऊ मुलायम नशा शब्दांत पकडता कशी येईल?

माणसान्चा देव

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 08/05/2011 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
माणसान्चा देव रात्र झालि बाप्पा झोपला,माणसान्वरति भरपुर कोपला, दिवसभर देतात त्रास,काढुन ठेवतात एकच घास.
काव्यरस

मालवणी फिश करी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 07/05/2011 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः पापलेट स्वच्छ करून तुकडे करणे १ वाटी खोवलेले खोबरे १ मध्यम कांदा बारीक चिरून २-३ लसुण पाकळ्या ३-४ आमसुलं १ टेस्पून धणे ५-६ बेडगी किंवा संखेश्वरी मिरच्या (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त) मीठ चवीनुसार १ टीस्पून गरम मसाला (ऐच्छिक) तेल ६-७ तिरफळं , आतील काळी बी काढुन टाकावी , तिरफळं पाण्यात भिजवावी, मग ठेचुन त्याच पाण्यात घालावी.

तत्काळ चित्रकार ( Instant Artist) बना.

लेखक शरद यांनी शनिवार, 07/05/2011 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
झटपट चित्रकार फोटोशॉपचा असाही उपयोग मध्ये आपण त्यात चित्रे कशी काढता येतात ते पाहिले. पण त्यात मी एक अट घातली होती .."इच्छा व वेळ पाहिजे ". आता इच्छा बर्‍याच जणांना असली तरी हल्लीच्या धकाधकीच्या काळात "वेळ" कसा पैदा करणार ? तर आज पाहूं वेळ नसणार्‍या लोकांनाही "Instant Atist " कसे बनता येते. फोटोशॉपने त्यांचीही सोय केली आहे.पुढे दिलेली चित्रे मुद्दाम काळजीपूर्वक निवडलेली नाहीत. प्रत्येक चित्राला साधारणत: ३ ते ४ मिनिटे लागतात.

लोकसत्ता मध्ये मिपा गौरव आणि दखल.

लेखक कलंत्री यांनी शनिवार, 07/05/2011 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layo… वेबजगत खमंग मिसळ-पाव पुणे असो वा सातारा, कोल्हापूर असो वा नाशिक.. गरमागरम आमटी, कांदा, फरसाण आणि वर लिंबू पिळलेली ‘खमंग मिसळ’ पावासोबत खाण्याची लाइफ स्टाइल’ आजही लोकप्रिय आहे. ही मिसळ-पाव खाताना सोबत कुटुंबीय किंवा दोस्त असले तर गप्पांची लज्जत आणखी वाढते. फर्मास ‘मिसळ-पाव’मध्ये विविध चवीचे पदार्थ असतात व अस्सल मराठीपण असतो. हेच नाव धारण केलेली मराठमोळी, धमाल वेबसाइट आहे.

मराठी लावण्या सुचवाव्यत

लेखक सुनिल६९ यांनी शनिवार, 07/05/2011 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
"पिंजरा कला केंद्रात" बैठकी साठी ठसके बाज लावण्या सुचवाव्यत.मला माहित असलेल्या तुरळक लावण्या...... १.पदरावरती जर ..... २.दिसलाग बाई दिसलाग....... ३.तुझ्या उसाला ...... ४.छबीदार छबीदार.......... ५.नका तोडू पाहून जरा .............. (मराठी लोक कला प्रेमी)

लोकल शोध-

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 07/05/2011 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
आंबिवली ठाकुर्ली डोंबिवली विक्रोळी ढुंडाळली चिंचपोकळी दातीवली कळंबोली आयरोली घणसोली उमरोली धाव घेतली कांदीवली खोपोली डोळावली केळावली आंबिवली बघून झाली घुमुन घुमुन मायला इज्जत गमावली छोकरी हाती नाय आली पुरब पश्चिम भेंडी पालथी घातली लोकलची गुंतावळी हार्बर मार्गावर कुणी नव्हतीच मुळी आपलेवाली घरवाली लोकल पोरगी शोधायला दरदर भटकलो चारो ओर मरमर भोईसर दहिसर अगदी पार खारघर वरी देख्खानी उल्हासनगर कोंबून लोकलमधे चिंबून खारावली पांढरी पॅन्ट झाली काळी आंबिवली ठाकुर्ली डोंबिवली विक्रोळी नव्हतीच अपल्या साली भाळी
काव्यरस

Two Friends

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 07/05/2011 06:02 या दिवशी प्रकाशित केले.
Two Friends
Little John was thin and boney; His fat friend had a name Tony ||1|| Once both were gone in the woods; They had school bags without any food ||2|| Tony feels hungry in the after noon; John said I'll get the food very soon ||3|| John climbs on a Mango tree as he saw; a watchman came while plucking up mangoes raw ||4|| John jumped down and ran away fast; Watchman caught Tony at the last ||5|| - Pashanbhed (Stone breaker) 07/05/2011 4:15AM
"अर्रर्रर्रर्र...
काव्यरस

काही छायाचित्रे

लेखक विकास यांनी शनिवार, 07/05/2011 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
कडाक्याच्या थंडी आणि बर्फाच्या हंगामानंतर जरा बरी हवा झाल्याने, संधी मिळताच, काही काढलेली छायाचित्रे. सुधारणा अवश्य सुचवा.