(वडा म्हणे मढ्याला)
खुलासा : कोणत्याही जातीवर चिखलफेक करण्याचा इरादा नाही. इनो घेऊन विडंबन वाचावे ही विनंती.
प्रेरणा १ , २
वडा म्हणे मढ्याला, 'भलताच खास आहे'
भात आहे बासमती, त्याचीच रास आहे.
केले आहे पिंड, ठेवले आहे नदीकाठी
अगं म्हशी, पण त्याला शिवणार कावळाच आहे.
करे कधी सव्य अन कधी अपसव्य
असे ते जानवे त्याला नेहमी हवेच आहे.
दानं, फळे, सुपार्या अन् दक्षिणा भटाला,
(जाणारे)पैसेच फक्त माझे? हा शुद्ध माज आहे!
मिसळपाव