हळुच मंद मालवे, कालचा नवा शशी,
हळुच धुंद पैंजणे, वाजती मनी कशी...
विरत रात्र विझतसे, विरत ना तरी स्मृती,
फिरत फिरत नेतसे, स्मरत तुज तवप्रती,
तरल धुंद मोहकसे, अननुभुत मधु पिशी..
मनास ओढ लावते, एक खिन्नशी भिती,
झरत झरत जातसे, अस्फुट्शी कालगती,
फिरुन परत येतसे, भ्रमीत मुग्ध नेणीवशी..
आहेस जरी मजसवे, तिच तुच, तव प्रीती
नाहीच का राहीलो, मीही तोच, जगरीती?
धुसर का होतसे, हे सत्य स्वप्न शुक्राशी..
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2006
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून खुलवता आली असती.
मान्य, थोडासा प्रयत्न केलाय..
In reply to अजून खुलवता आली असती. by दत्ता काळे
छान कविता
मस्त!!
प्रकाटाआ
In reply to मस्त!! by मिसळलेला काव्यप्रेमी
थोडासा प्रयत्न केलाय सुधरायचा
तरल
बरोबर, पुढच्या वेळी सुधरायचा
In reply to तरल by राजेश घासकडवी
आवडली!
दखल घेतल्याबद्दल सगळ्यांचे