Skip to main content

निशाणी

लेखक शैलेन्द्र यांनी शनिवार, 03/09/2011 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
छेडूनी धुंद ओली , हळवी तुझी विराणी , मी मागतो पुन्हा का, फिरुनी नवी निशाणी. पावूस चांदन्यांचा भिजवून काल गेला, ग्रीष्मात मोगरयाने फसवून वार केला, हे जाणुनी पुन्हा का, मनमोर गात गाणी, होतो अतृप्त जरी मी अव्यक्त खंत होती , निशब्द वेदना ही मुरली निवांत होती , का छेडली पुन्हा तू, ती रागिणी दिवाणी , अव्यक्त भावनांचे मी गूढ गीत गातो, स्वरमेळ ना तयाला तो तुझ्यातुनी वाहतो, ओठांत गुंफुनी माझ्या दे आता नवी कहाणी..
काव्यरस

"दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी!"

लेखक सुधीर काळे यांनी शनिवार, 03/09/2011 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांच्या आंदोलनात सरकारची फजीती! परिस्थिती अंगाशी आल्यावर माणूस काय नाहीं करत? पण ती तशी अंगावर येईपर्यंत कांहींच न करणारा माणसाला काय म्हणावे? कदाचित् अशा व्यक्तींसाठीच "दिवस गेला रेटारेटी, चांदण्यात बसून कापूस वाटी![१]" ही म्हण रूढ झाली असावी! एप्रिलच्या मध्यापासून ऑगस्टच्या मध्यापर्यंत केंद्र सरकारने ’रेटारेटी’त घालविलेले दिवस आणि १६ ऑगस्ट ते २७ ऑगस्टच्या दरम्यान चांदण्यात बसून (घाईघाईने) वळलेल्या वाती हे या म्हणीचे सार्थ उदाहरण आहे!

गणपती बाप्पासाठी खिरापती २) पंचखाद्य --

लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 03/09/2011 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
पंचखाद्यात ख अक्षराने सुरु होणारे पाच पदार्थ असतात. साहित्य- खारीक पूड, खोबरे, खसखस, खिसमिस, खडीसाखर. कॄती- खोबरे किसून घ्या व भाजून घ्या व हाताने कुस्करुन घ्या, खसखस भाजून पूड करा, सर्व एकत्र मिसळा...झाले पंचखाद्य तय्यार. :)

फ्रायडे टाईमपास

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 02/09/2011 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकधी माझ्यातच पाहतो मी एक बेहद्द नाममात्र घोडा पाठीवरती जीन मखमली पायी रुपेरी तोडा म्हणे कुणासाठी, कुणासाठी, कशासाठी, कुठवर इमानाने जन्मभर रेटायचा ऐसा गाडा ? कधीकधी माझ्यातच पाहतो मी भव्य हिमालय तुमचा अमुचा ज्याच्या छातीचा फोडुनिया कोट , गुलाम केले गेले जयाने लोक तीस कोट. बोलेना तो खळ मैंद म्हणती बळकट धश्चोट कर्मठ जो प्राणी तो पोंचट. कधीकधी माझ्यातच पाहतो मी गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा जो नुसतिच काडी नाही खर्चिली कवडी दमडी नाहि वेचिला दाम श्रीराम जयराम जयजय राम. कधीकधी माझ्यातच पाहतो मी षंढ सारी लेकरे लेकरे उदंड जाली अरुण उगवला पहाट झाली झाले मोकळे आकाश आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झ

१४ किल्ल्यांची प्रतिकृती - दुर्गसृष्टी

लेखक सुनिल पाटकर यांनी शुक्रवार, 02/09/2011 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या किल्ल्यांची काळानुसार पडझड होत आहे.परंतु तरिही या किल्ल्यांचा इतिहास प्रत्येकाच्या मनामनात आहे. किल्ल्यांचा प्रतिकृतीतून इतिहास कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याचे काम पोलादपूर येथील तरुणांनी हाती घेतले आहे. ट्रेकिंग आणि भटकंतीच्या हौसेतून या तरुणांमध्ये किल्ल्यांविषयी निर्माण झालेली आवड दुर्गसृष्टीच्या रूपाने मुंबई -गोवा महामार्गावर पोलादपूर येथे साकारत आहे.

चष्मावाला, गायवाला

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 02/09/2011 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
काय म्हणताहात मंडळी कसा काय चाल्ल्लाय तुमचा गणेशोत्सव? हो. हो. हो. नियम माहीत आहे मला. आधी आपले सांगा मग विचारा. ........................................................................................................................................................... आदला दिवस "जरा शेजार्‍यांना चपलांचा त्रास होणार नाही हे बघा हो. कळ सोसा म्हणावे पाच दिवस." मोदकाच्या दिवशी जेवायला बोलव. "ते तर बोलवणारच आहे. पण तु आधीच सांगुन ठेव. आणि जरा नम्र पणे. आपली गरज आहे" चालेल. "आणि तु सुट्टी घे. आणि हो. तो मिक्सर बिघडलाय. ओवर लोड झाला असेल. लगेच पाहीजे. उद्या देतो म्हटले तर चालणार नाही.

गेल्या चार वर्षातले मिपावरील संग्रहणीय, अक्षर, सर्वोत्कृष्ट लेखन कोणकोणते ?

लेखक चित्रगुप्त यांनी शुक्रवार, 02/09/2011 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या मते गेल्या चार वर्षातले मिपावरील संग्रहणीय, अक्षर, सर्वोत्कृष्ट लेखन कोणकोणते ? बरेच मिपाकर वेळेअभावी अधून मधून काही काळ मिपावर येऊ शकत नाहीत, या मधल्या काळातील चांगले दुवे खाली गेल्याने सहजगत्या मिळत नाहीत. अनेक धागे तात्कालीन महत्वाचे असले, तरी कालांतरने तसे वाटत नाहीत... त्यामुळे मिपाकरांच्या पसंतीस उतरलेले, कायम महत्वाचे धागे कोणते ? हे कळल्यास/ उपलब्ध झाल्यास फार सोयीचे होईल, असे वाटते.

पुणेरी हायकू -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 02/09/2011 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ते डांबरी जाहिरात सामोरी... ...

’शुक्रतारा’ निखळून पडला......

लेखक अभिजीत राजवाडे यांनी शुक्रवार, 02/09/2011 08:35 या दिवशी प्रकाशित केले.
‎"शुक्रतारा, मंद वारा, चांदणे पाण्यातुनी.. चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी...." आज पहाटे हा ’शुक्रतारा’ निखळून पडला...... ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचे दु:खद निधन. आपल्या लाडक्या खळे काकांना भावपूर्ण श्रद्धांजली.