Skip to main content

चितळेबाबा सांगतायत स्वरक्षणाच्या युक्त्या

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 07/01/2012 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, पुज्य चितळेबाबांच्या गिरनारची यात्रा आपण वाचलीत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू सादर करत आहे. दरवर्षी चितळेबाबा आमच्याकडे गणेशोत्सवात आरास व मुर्तीच्या दर्शनाला येतात. २०११ मधील उत्सवात, त्यावेळी आमच्या सुनबाईंनी नुकत्याच सजवलेल्या हॉलची पहाणी करायला बाबा आवर्जून आले होते.

बाई माझी, ही तंगडी मोडली

लेखक विदेश यांनी शनिवार, 07/01/2012 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल: बाई माझी, करंगळी मोडली) ऐन दुपारी, नमुना फेरी, गाडी नवी काढली - काढली बाई माझी, ही तंगडी मोडली || धृ || झणी मारून मी कट वळताना कुठून अचानक आला श्वान हा गुपचुप येऊन, पाठीमागून माझी साडी ओढली || बाई माझी ... समोर भुंके कसा आडवा पायच धरला, (-अंगाला घाम फुटायचं ते कारण होतं का?) माझा उजवा मी ओरडले, तिथेच पडले, उठताना मोडली || बाई माझी ...

नायज्जा जेलोफ राईस / पेप्पे चिकन

लेखक गणपा यांनी शनिवार, 07/01/2012 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमच्या नायजेरिया(नायज्जा)मधील एक पाककृती तुमच्यासाठी घेउन आलोय. हा नायजेरियचा राष्ट्रीय पदार्थच आहे म्हणा ना. अगदी लग्ना,बारश्या पासुन ते 'दिवसा'पर्यंत कुठलाही समारंभ असुद्यात मग जेलोफ राईस हवाच हवा. त्याशिवाय पंगत पुर्ण होणे नाहीच. या भाताच्या जोडीला येते ती पेप्पे चिकनची तंगडी नाही तर मग चिकन स्ट्यु किंवा कॅरमलाईज्ड प्लँटीन (राजेळी केळी). थोडक्यात सांगायच तर जेलोफ राईस म्हणजे आपला टॉमेटो राईसच पण किंचीत बदल.

facebook सारख्या social netwarking site office मध्ये कश्या उघडाव्या ?

लेखक kunal.deshpande@gmx.com यांनी शनिवार, 07/01/2012 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रत्तेक जण facebook/twitter/orkut वापरतो. बर्याच ऑफिसमध्ये हि site block करण्यात आली आहे. त्यामुळे हि अधिकृत मार्गाने वापरता येत नाही. तसे अनधिकृत मार्ग अनेक आहेत. माझ्या office मध्ये पण हि बंद आहे. हि website अधिकृतपणे कोणालाही संशय नयेता उघडायची कशी ह्यासाठी मी बराच काळ आंतरजाला वर शोध घेत होतो. शेवटी ह्याचा उपाय सापडला आहे. ती इथे देत आहे. त्यचा तुम्हालाही बराच उपयोग होईल. मला एक website सापडली आहे ज्या वर आपण आपले facebook/twitter/orkut connect करू शकतो. एकदा connect झाले कि आपल्याला ह्या site चे उप्डते इथे दिसतील. तर अश्या बर्याच website आहेत. पण मला hootsuite हि site जास्त आवडली.

1143 वर्षे जुने छापील पुस्तक- वज्र सूत्र

लेखक ए.चंद्रशेखर यांनी शनिवार, 07/01/2012 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
1143 year old printed book- Diamond Sutra एशिया खंडातले चीन, भारत, इराण या सारखे देश आणि भूमध्य युरोपियन देश यांच्यामधे जी काही व्यापारी व सांस्कृतिक देवाणघेवाण प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात होत असे ती 7000 मैल लांबवर पसरलेल्या एका मार्गानेच प्रामुख्याने होत असे. व्यापारी, धर्मप्रचारक, भटके टोळीवाले आणि सैनिक याच मार्गानेच जा ये करत. निरनिराळ्या प्रकारची मालवाहतुक या मार्गावरून होत असली तरी प्रामुख्याने रेशमी वस्त्र, कस्तुरी, सुगंध, औषधे,, रत्ने, मसाले, काच सामान वगैरेसारख्या ऐषारामाच्या वस्तूंचा व्यापार या मार्गावरून होत असल्याने या मार्गाला रेशीम मार्ग किंवा Silk Road असे नाव पडले.

चिकन किसाडिया / किसादिया (Quesadilla)

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 07/01/2012 05:44 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ४ तोरतीया तयार ड्राय चिकनचे तुकडे स्लाईसेस करुन (तंदूरी चिकन, बार्बेक्युड चिकन, मराठमोळा ह्यांचे पेरी-पेरी चिकन सुध्दा चालेल :) ) एका कांद्याच्या पातळ चकत्या करून घेणे १/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ३-४ हॅलेपिनो मिरच्या चिरून ( आवडीप्रमाणे कमी-जास्त) हिरव्या भोपळी मिरचीचे तुकडे आवडीप्रमाणे (रंगीत भोपळी मिरच्याही वापरू शकतो) १ वाटी किसलेले चीज (मी Cheddar चीज वापरले आहे तुम्हाला जर का मेक्सिकन Montary Jack मिळाले तर उत्तम) १ वाटी तयार टोमॅटो सालसा (विकतचा नाही मिळाला तर टोमॅटो बारी

त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (श्रावणबेळगोळ) भाग - ४

लेखक दशानन यांनी शनिवार, 07/01/2012 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भागात आपण बेल्लुर पाहिले. आता म्हैसूरपासून ९०-९५ कि.मी. दूर असलेल्या विंध्यगिरी पर्वतावर जैनधर्मियांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे श्रावणबेळगोळ. मराठी माणसाला श्रावणबेळगोळ व तेथील गोमटेश्वराची मुर्ती माहिती असण्याचे कारण म्हणजे त्या मुर्तीच्या पायथ्यावर मराठीमध्ये केलेले शिलालेखन. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना ही माहिती सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा मान जातो.

बोस्की-इंटीमेट आणि सी -९०

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 06/01/2012 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
१९६९ किंवा ७० साल असावं . एल निनोचं नाव तेव्हा कुणालाच माहीती नव्हतं. नैऋत्य मोसमी वारे आणि खारे वारे -मतलई वारे इतकंच भूगोलाचं ज्ञान होतं.. याच दरम्यान एक नविन वारं खेळायला लागलं. दुबईचं सोनेरी वारं .या वार्‍याची जाणीव आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांना उशीराच झाली . दुपारच्या वेळी पारवळं पकडत उनाड फिरणारी तांबोळ्याची आणि अत्ताराची पोरं दिसेनाशी झाली आणि अचानक वर्षभरात रमझान इदेला झगझगीत पांढर्‍या कपड्यात गले मिलताना दिसायला लागली . इस्माईल पारटेची गाडी उलाल होऊन अंगणात उभी होती पण पारट्याची पोरं दिसेनाशी झाली .खोताची पाड्यावरची जमीन मकबूलनी दामदुपटीनी घेतल्याची आवई कानावर आली .