Skip to main content

झुंई...

लेखक गवि यांनी शुक्रवार, 09/03/2012 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
ऑर्विल आणि विल्बर या दोन राईट ब्रदर्सनी १७ डिसेंबर १९०३ या दिवशी पहिलं विमान उड्डाण केलं.. असं आपण सर्वांनीच ढोबळपणे ऐकलेलं असतं..तारीखवार कदाचित माहीत नसेल, पण राईट ब्रदर्सचं नाव विमानांशी जोडलं गेलंय हे आपल्याला माहीत आहे. तसं पाहिलं तर राईट ब्रदर्स हे विमानोड्डाण करणारे किंवा त्यावर प्रयोग करणारे पहिले मुळीच नव्हते. त्यापूर्वीही अनेक जणांनी हे प्रयोग केले होते. बलून्स, ग्लायडर्स अशा अनेक प्रकारच्या उडू शकणार्‍या यंत्रांनी हवेत तरंगण्याची युक्ती आधीच जमलेली होती. मग राईट जोडगोळीने काय नवीन केलं? तर त्यांनी हवेपेक्षा जड विमानाला नियंत्रित करत उडवण्याचं तंत्र शोधून काढलं..

लावणी: शिटी मारून

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 09/03/2012 06:12 या दिवशी प्रकाशित केले.
लावणी: शिटी मारून
{{{रंग माझा गोरा मदनाला दावतोय तोरा रती मी सुंदर आहे मदभरली अप्सरा नका जवळ येवू नका ओळख दाखवू मी नार नखर्‍याची होईल पाणउतारा }}} (चाल सुरू) भरल्या बाजारी गर्दी जमली अहो भरल्या बाजारी गर्दी जमली तिथं शिटी तुम्ही का मारता? अहो पाव्हनं शिटी मारून शिटी मारून येड्यावानी काय करता? ||धृ|| कोरस: शिटी मारून, हातवारे करून येड्यावानी काय करता? हो दाजी शिटी मारून येड्यावानी काय करता?
काव्यरस

मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी शुक्रवार, 09/03/2012 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक महिला दिनाच्या सर्व वाचक स्त्री-पुरुषांना शुभेच्छा. महिला दिनाला साधारण १०० वर्षांचा इतिहास आहे. स्त्रीमुक्तीची चळवळ आणि महिला दिन साजरा करण्याचा संबंध घनिष्ठ आहे. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, निवडणूका लढवण्याचा हक्क मिळावा, समान वेतन, समान वागणूक मिळावी इत्यादी मागण्यांमुळे स्त्री चळवळ सुरू झाली आणि वाढली. बहुसंख्य देशांमधे या मागण्यांबाबत गेल्या शतकात मोठी प्रगती झालेली दिसते. तरीही स्त्री-समानता संपूर्णतः आलेली आहे असे आम्हांस वाटत नाही. मोठ्या प्रमाणावार मुलींनी शिकायला सुरूवात केलेली असली तरीही अजूनही सुशिक्षितांमध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण समसमान नाही.

" वांझ .."

लेखक जेनी... यांनी गुरुवार, 08/03/2012 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव वरच्या सर्व स्त्री सभासदाना ' जागतिक महिलादिना ' च्या हार्दिक शुभेछा ..!! __________________________________________________ " वांझ .....!!" लागतो ना हा शब्द? तोडतो कुठेतरी आत ,अस काहीतरी करून जातो ,कि परत उभारी घेण कदाचितशक्यच होत नाही. दोन अक्षर एका अनुस्वराला घेवून दिमाखात समोर येतात ,एका असह्य स्त्रीच्या तिच्या भावना तिच्या संवेदना ह्यांच्यावर जोरदार वार करतो ,तोही एका फटक्यात .मागचा पुढचा विचार न करता . तिला काय वाटेल? तिच्या मनाला लागेल का?? तिला नकोय का मातृत्त्व? तिला नकोय का एका इवल्याश्या शरीराची उब .?

बार बार देखो हजार बार देखो !

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 08/03/2012 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या काळात हेमंत कुमार, नौशाद, सचिन देव बर्मन, रोशन, शंकर जयकिशन हे लोक प्रसिद्धिच्या शिखरावर होते त्या काळातही प्रसिद्धिपासून दूर राहून काम करणारी काही माणसे होती कलाकारापेक्षा त्याची कला अधिक प्रसिद्ध व्हावी असं भाग्य फ़ार थोड्यांच्या वाट्याला येतं. संगीतकार रवी, जयदेव हे त्यापैकीच रवी यांचे काल मुंबईत निधन झालं. पण ते रसिकांसाठी अनेक सुरेल आठवणी मागे ठेवून गेले आहेत. हिंदीमधे राहुलदा, लक्ष्मी प्यारे असे अनेक संगीतकार आहेत ज्यांचं काम प्रचंड आहे पण त्यातलं श्रवणीय काम मात्र कष्टाने शोधून काढावे लागेल याउलट आहे रवी यांचे जरा त्यांच्या कलाकृतीवर नजर टाकूया दिल की थी आरजू की कोइ ये

स्वप्नांस बाप आहे .!

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 08/03/2012 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, ही आमची प्रेरणा misalpav.com/node/20935 अन ही आमची प्रतिभा (इथं आमची आदरार्थी नसुन अनेकवचनी आहे ) अवलीच छंद आहे, स्वप्नाकडे पहाणे.. स्वप्नास बाप आहे, घनदाटशा मिशांचा.. रुतले उरी नि पार्श्वी, ते रात्री मार खाणे. झाला सराव आता, बांबूस सारण्याचा.. स्वप्नास रोग आहे, झोपेत चालण्याचा.. बापास शाप आहे, रात्रीस जागण्याचा.. गेल्या कितीक रात्री, उलटून जागताना. झाला सराव आता, झोपेस टाळण्याचा.. त्या बापसास वाटे, तो यार मीच आहे. स्वप्नास धाक देतो, आवशीस सांगण्याचा.. नजरेतले इशारे, जरि जाणिले तिच्या मी. आहे खडा पहारा, गल्लीत सासर्‍याचा.. गच्चीत कोपर्‍याला , ती आज येत आहे. तो खास बेत