Skip to main content

धागा का गोठविता ... ??? (वि.अ.टु.प्र.)

लेखक मोदक यांनी गुरुवार, 29/11/2012 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
(अवांतराला वैतागून) धागा का गोठविता ...??? प्रेरणा--- गरज हाय का..??? :-D र ला ट जोडले कसेतरी यमक जुळले बसल्या बसल्या कविता पडली हे मलाच कसे नाही कळले??? अर्थहीन शब्दांची तोडफोड, लीलया जमत आहे.. कोणत्याही विषयावर कविता पडते, हीच तर खरी गंम्मत आहे. ताकाला पण उ-कळ्या फुटतील, पूर्वार्धातले प्रतिसाद पाहून, पण उत्तरार्धात बसेल, धागा वाचनमात्र होवून... यदाकदाचित माझ्या काव्यप्रसवक्षमतेला, प्रथम प्रथम तु म्हणशील ईऽऽ ईऽऽ ईऽऽ... पण मी प्रतिसादांचा पा-ऊस बघून, असा हसेन---''ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!ह्ही ह्ही...!'' *(वि.अ.टु.प्र. = विडंबनाचा एक अतिटुकार प्रयत्न!! हलके घ्या आणि जमल्यास भर घाला)

राजे संभाजी

लेखक अनिल तापकीर यांनी गुरुवार, 29/11/2012 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
धगधगता अंगार होता अतुलनीय वीर होता वाघासारखा शूर होता *****संभाजीराजा जेवढा हळवा कवी होता तेवढाच कणखर बाणा होता रणांगणी धधडणारा वणवा होता ***** संभाजीराजा धर्माचा अभिमानी होता मराठा असण्याचा गर्व होता शूर सिंहाचा छावा होता ***** संभाजीराजा मातृपितृ भक्त होता भवानीमातेचा दास होता स्वराज्याचा प्राण होता ***** संभाजीराजा राजे तुमचा आम्हाला अभिमान वाटतो अनिल तापकीर

नेहेमीच असं होतं, असं नाहि !

लेखक जेनी... यांनी बुधवार, 28/11/2012 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमीच असं होतं ,असं नाहि.. पण जेव्हा होतं ,तेव्हा सगळ बेचैन होतं कुठल्याशा एका अनामिक भितीनं , सगळच जग हळुहळु व्यापून जातं ... अश्यावेळी मायेच्या एकाच शब्दाची फुंकरहि बास होते पण ती भोवताली घुटमळणार्‍या कुठल्याच मुखातुन येत नाहि. असं का?.. अगदी कासाविस ..! बराच वेळ जातो ,सुचत मात्र काहिच नाहि , आजुबाजुला खळखळुन हसणारं कुणीतरी हवय असं वाटु लागतं ..पण ..पण आत्ता कुणीच नाहि ! कुठेतरी शुन्यात नजर लागते,फार उशिर झालाय ह्याचीहि तेव्हा काळजी नसते.. कुठे जायचय ?
काव्यरस

जेथे जातो तेथे तु माझा सांगाती

लेखक अर्धवटराव यांनी बुधवार, 28/11/2012 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्तक - प्रकटन लेखनप्रकार मुद्दामच निवडला या लेखासाठी. कारण जे काहि टंकलय ते दिसायला जरी धार्मीक वगैरे असलं तरी ते आहे "टंकाव्या चार ओळी अधुन मधुन" याच उद्देशाने. सध्या क्लिंटन राव देवाच्या रिटायर्मेण्ट सारख्या अत्यंत ज्वलंत आणि जागतीक सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन अत्यंत संवेदनशील अशा उद्योगात पार गुंतुन गेलेत. देवांचा खजीनदार कुबेर अगदी ब्लँक चेक घेऊन क्लींटनरावांच्या दारी आला व "आमची नोकरी वाचवा हो" अशी आर्त विनवणी करु लागला. काय करणार बिचारा...

आई, अशी कशी ही दिवाळी !

लेखक विदेश यांनी बुधवार, 28/11/2012 10:57 या दिवशी प्रकाशित केले.
आई, अशी कशी ही दिवाळी येते पटकन, सरते झटकन, अभ्यासाला पुन्हा जुंपते दहा दिवस का जाती चटकन ! फराळाच्या डब्यात मोठ्ठ्या गोड गोड का तसेच उरते ? चकली चिवडा चट्टामट्टा पोटामध्ये भरकन जिरते ! भुईचक्र अन् टिकल्या आता कंटाळा मज येइ उडवता - धमाल दिसते मोठया हाती बॉम्ब नि रॉकेट आवाज करता ! सुट्टी असते किती ग हट्टी ठरल्या दिवशी येते जाते - मित्रमंडळी गोळा होता धमाल अमुची मनीं रहाते ! दिवाळी संपुन सुट्टी संपता जुनाट दिसती नवीन कपडे... आई, सांग ना दिवाळीस ग बारा महिने थांब, तू इकडे ! . .
काव्यरस

ह्या गाण्याची माहिती हवी आहे

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 28/11/2012 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
गायिका कोण? गीतकार व संगीतकार कोण? चित्रपटगीत असल्यास कुठला चित्रपट? http://www.dhingana.com/rusala-kanha-song-lata-majhi-aavadti-gaani-1-ma… आठवणीतील गाणी वगैरे नेहमीची स्थळे शोधली पण काही माहिती मिळाली नाही. ह्या आल्बममधे सगळी गाणी लता मंगेशकरांनी गायली असल्याचे म्हटले आहे पण ते साफ चूक आहे. हा संग्रह म्हणजे लताबाईंची आवडती गाणी आहेत असे त्याच्य नावावरून वाटते. (हे खरे का खोटे तो मंगेशच जाणे! असो.)

कोबीची कोशिंबिर

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 28/11/2012 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- १ लहान,कोवळा कोबीचा गड्डा,१ लहान सिमला मिरची,१ हिरवी मिरची,अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे,१ मोठा चमचा दाण्याचे कूट,१ मोठा चमचा तेल,फोडणीचे साहित्य,मीठ,साखर,कोथिंबिर कृती- कोबी किसून घ्या. कोबीचा लहान गड्डा न मिळाल्यास मोठ्या कोबीचा साधारण ३ वाट्या कीस घ्या. सिमला मिरची किसून घ्या.तीही साधारण वाटीवर असू द्या. कोबी,सिमला मिरचीचा कीस एकत्र करा, मिरची बारीक चिरुन घाला. दाण्याचे कूट घाला. फोडणी करुन ती त्यावर ओता. मीठ, साखर, कोथिंबिर आणि डाळिंबाचे दाणे घाला व कालवा. .

१२.१२.१२

लेखक खटासि खट यांनी मंगळवार, 27/11/2012 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
चर्चाप्रस्तावाचे कारण - विषयाशी संबंधित समर्पक बाफ उपलब्ध नसणे चर्चेचा हेतू - अत्यंत महत्वाच्या विषयाकडे सदस्यांचे लक्ष वेधून घेणे सध्या केंद्रातील सरकारवर एकामागून एक आरोप होत असतानाच एकामागून एक घोटाळे उजेडात येत आहेत. त्यामुळे अर्थातच सरकार धास्तावले असावे, निवडणुकीच्या भीतीने पस्तावले असावे अशा नंदनवनात राहत असतानाच मित्राने जाहीर केले कि २०१२ या वर्षात कधीतरी जगबुडी होणार असल्याने सरकार निर्धास्त आहे. मंत्रालयातल्या आगीत होरपळून जिवानिशी वाचलेल्या सरकारास अशा रितीने जगबुडी ही इष्टापत्ती वाटावी याचे नवल वाटले.

जो आवडे सर्वांना तोचि,

लेखक अनिल तापकीर यांनी मंगळवार, 27/11/2012 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
देव बोलतो बाल मुखातून' कोणा एका गीतकाराच्या गीतातील वाक्य, याची प्रचीती मला आली ती आमची 'ननु' म्हणजे चुलत भावाची मुलगी बोलायला लागल्यानंतर. तिचे बोबडे बोल, खुदकन गालावर खळी पडून हसणे. तिचे चिमुकले हात ती गळ्यात टाकून मान डोलवत बोलणे सगळेच लाजवाब होते. दिवसभर कितीही काम केले कितीही थकलो तरी ननुच्या नुसत्या जवळ येण्यानेच सारा थकवा दूर व्हायचा. वाड्यातील सर्वच जणांना तिने जणू भुरळ घातली होती. तिच्याबरोबर बोलताना बहुतेक जन आपापली बोबडे बोलण्याची हौस भागवून घ्यायचा. बाकीचे इतर सख्खे , सख्खे चुलत भाऊ देखील स्वताच्या मुलांना कपडे आणताना ननुला देखील कपडे घ्यायचे .