Skip to main content

कोबीची कोशिंबिर

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 28/11/2012 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- १ लहान,कोवळा कोबीचा गड्डा,१ लहान सिमला मिरची,१ हिरवी मिरची,अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे,१ मोठा चमचा दाण्याचे कूट,१ मोठा चमचा तेल,फोडणीचे साहित्य,मीठ,साखर,कोथिंबिर कृती- कोबी किसून घ्या. कोबीचा लहान गड्डा न मिळाल्यास मोठ्या कोबीचा साधारण ३ वाट्या कीस घ्या. सिमला मिरची किसून घ्या.तीही साधारण वाटीवर असू द्या. कोबी,सिमला मिरचीचा कीस एकत्र करा, मिरची बारीक चिरुन घाला. दाण्याचे कूट घाला. फोडणी करुन ती त्यावर ओता. मीठ, साखर, कोथिंबिर आणि डाळिंबाचे दाणे घाला व कालवा. .

वाचने 37605
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

सहीच...!! एकदा करून बघायला हवी :) :)

आवडली एकदम सिंपल पाकृ. करायलाच पायजे एकदा. दही चालत नाही का?

माझी पत्नीसुद्धा अशाच एका वेगळ्याप्रकारे कोबीची कोशिंबीर बनवते. तिला सांगुन त्याची रेसेपी आणी फोटो चिकटवतो.

मस्त! मी ही अशीच (वजा डाळींबदाणे) करतो आणि फोडणीत जरा जास्त हिंग घालतो (कोबीचा वास कमी होऊन मस्त वास सुटतो ;) ) कोबी-मुळा-मेयो अशी विदाऊट विस्तव कोशिंबीरही छान लागते.

या लिंबाच रस घातल्यास अधिक चांगला स्वाद येतो.

एकूणच कोबीचा तिटकारा असला तरी इतर घटक पदार्थांमुळे ही कोबीची कोशिंबिर चांगली लागत असावी असं वाटतंय. ;)

कोबीची कोशिंबीर अगदी छान दिसतेय :) कोबी कच्चा, शिजवलेला कसाही आवडतोच त्यामुळे आजच करुन बघते :) धन्यवाद

छान दिसतेय कोशींबीर. कोबी उग्र असेल तर खिसून झाल्यावर पाणी काढून टाकलेले बरे होइल असे वाटतय..

जबर्‍यादस्त ग तै. एकदम आवडेश.

साधी सोपी पाकृ. डाळिंबाचे दाणे आणि भोपळी मिरची यामुळे दिसतेय छान आणि चव पण वेगळी आली असणार!

आजच डब्यात पोळी = दिली होती आईने. ह्यालाच पचडी असेही एक नांव आहे. फार फार आवडीचा प्रकार आहे :)