Skip to main content

प्रॉन्स - मशरुम करी

लेखक दिपक.कुवेत यांनी बुधवार, 12/12/2012 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रॉन्स - मशरुम करी बायको: काय रे उद्या डब्याला काय हवयं? मी: काहीही चालेल (हे आपलं मोघम उत्तर पण ती काय देणार आहे ह्या कडे हळुच कानोसा :) तशी मला खोडी नाही पण नुसते परतलेले मुग म्हणा कींवा नुसती भेंडी घश्याखाली नाही जात...गेलाबाजार नीदान त्यात किमान कांदा तरी हवा. काय करणार जीभेचे चोचले... असो, तर सर्व पर्याय संपले की बायको हळुच प्रेमळ विनंती वजा आदेश करते...ठिक आहे मग तुला हवं ते तु कर. थोडक्यात मला (बायकोला) आराम दे. मग तसा ४/५ दिवस भाज्या खाउन मलाही कंटाळा आलेला असतो...अशा वेळि मासे / प्रॉन्स मनापासुन आवडत असल्याने ते अशा आणिबाणिच्या वेळेस कामाला येतात.

अपने होने पे मुझको यकीन आ गया...

लेखक मोदक यांनी बुधवार, 12/12/2012 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
********************************************************************************* सदरचा लेख मिपावर प्रकाशित करण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल सुचेता कडेठाणकर यांचे खास आभार. "महा अनुभव" या मासिकामधून साभार. ********************************************************************************* चीनच्याही पलिकडे आहे मंगोलिया. या देशातल्या गोबीच्या वैराण वाळवंटातून तब्बल सोळाशे किलोमीटर चालून आलीय सुचेता कडेठाणकर. सलग ५२ दिवस चाललेल्या या कष्टप्रद पायपिटीतून ती तावून सुलाखून निघालीय. गोबी हे आशियातलं सर्वाधिक लांबीचं वाळवंट. ते अंतर पायी पार करणं म्हणजे भल्याभल्या गिर्यारोहकांनाही आव्हान वाटतं.

चेरी टोमॅटो सलाड विथ थाई चिली ड्रेसींग.

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 12/12/2012 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
cherry tomato salad साहित्यः २५० ग्रॅम मिक्स सलाड पाने (लेट्युस, रोमैन, रॉकेट, पार्स्ले इ.) १ सफरचंद, फोडी केलेलं १ वाटी चेरी टोमेटो १ क्यूब प्रोसेस्ड चीज किंवा १०० ग्रॅम पनीर , छोटे तुकडे थाई चिली ड्रेसींगसाठी साहित्यः १ टीस्पून लिंबाचा रस २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल १ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर १ टेबलस्पून चिली फ्लेक्स १ टेबलस्पून साखर ५ पाकळ्या लसूण, सोलून बारीक चिरलेल्या मीठ व मिरपूड चवीनुसार कृती : ड्रेसिंग च्या सर्व सामग्री ला एका छोट्या काचे

<<< सांभाळ गो बाय, उत्साहित कळ्यांना >>>

लेखक सुहास.. यांनी बुधवार, 12/12/2012 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
रॉ मटेरियल दुखवु नका ना , नाकी नऊ आणली जरी साभांळ गो बाय, उत्साहित कळ्यांना चेपुच्या सवयींना , अभिव्यक्तीच्या स्पंदनाला, फुकाच्या बॅन्डविथाला, जिलेबीरूपी चारोळ्यांना हे कायदे वाचकीय, का लावता नवोदितांना उत्साह वाढवा की, रोजच्या टाकसाळ्यांना पहिले पान उघडताना, बंदुक हाती यावी खवचट प्रतिसाद का, फुसक्या गोळ्यांना या लेखन जुलाबांनी, सज्जनास जाग यावी संस्थळबंध खुलावेत, अनुभवी टवाळ्यांना .. साभांळ गो बाय, उत्साहित कळ्यांना ज्योकाकुंस समर्पित ;)
काव्यरस

मेडोविना (Medovina) ग्लु वाईन

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 12/12/2012 03:27 या दिवशी प्रकाशित केले.
मेडोविना म्हणजे मधाची वाईन. चेक रिपब्लीक व स्लोवाकिया येथे हि वाईन ख्रिसमस मार्केट मधे खुप प्रसिद्ध आहे. हि वाईन मधापासुन बनवलेली असते. त्यात फळांचा जुस, फळे, मसाले व साखर टाकुन हि वाईन गरम केली जाते. ख्रिसमस मार्केटमधे मस्त थंडी (साधारण पणे -10 ते -15 degree celcius) असताना हि मेडोविना प्यायला खुप छान वाटते. हि प्यायल्या नंतर थंडी पुर्ण पणे गायब होते ;) मिपाकरांना आवडेल अशी आशा आहे.

चावडीवरच्या गप्पा - बळीराजा आणि रामगिरी

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 11/12/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee चिंतोपंत“शेतकर्‍यांनी म्हणे हल्लाबोल केला रामगिरीवर, पोलिसांशी चकमक झाली त्यांची.”, चिंतोपंत चावडीवर प्रवेश करत. “आजकाल काय कोणीही उठते आहे आणि कायदा हातात घेते आहे, काय चालले आहे ते त्या विश्वेश्वरालाच ठाऊक”, घारुअण

काटो सें खीच के ये आचल ...

लेखक रविंद्र रुपन् यांनी मंगळवार, 11/12/2012 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
कुसुमाग्रज म्हणाले होते- सर्वात सुंदर आवाज कुठेतरी कोणाच्या तरी पायातील बेड्या खळ्ळकन तुटल्याचा
देव आनंद हा किमान चार पिढ्यांचा लाडका चॉकलेट हीरो. राज व दिलीप ह्या समकालीनांप्रमाणे त्याने कधी अभिनयकौशल्याचा दावा केला नाही. त्या काळातील नायिका जे करीत, किंबहुना कोणत्याही काळातील हिंदी चित्रपटाच्या नायिका जे करतात, ते त्याने नायक म्हणून केले. उदा. –छान छान कपडे घालून स्टाइलिश दिसणे व बागेत, डोंगरदऱ्या त गाणे म्हणत नाचणे. त्याने गंभीर भूमिकांना फारसा हात घातला नाही. त्याला विनोदाचे अंग नव्हते. वीर व करुण हे हिंदी चित्रपटातील महत्त्वाचे रस.

रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की!

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 11/12/2012 20:53 या दिवशी प्रकाशित केले.

रामगिरीवर हल्लाबोल : शेतकरी-पोलिसांची धक्काबुक्की!

(पुण्यनगरीच्या सौजन्याने)