Skip to main content

चेरी टोमॅटो सलाड विथ थाई चिली ड्रेसींग.

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 12/12/2012 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
cherry tomato salad साहित्यः २५० ग्रॅम मिक्स सलाड पाने (लेट्युस, रोमैन, रॉकेट, पार्स्ले इ.) १ सफरचंद, फोडी केलेलं १ वाटी चेरी टोमेटो १ क्यूब प्रोसेस्ड चीज किंवा १०० ग्रॅम पनीर , छोटे तुकडे थाई चिली ड्रेसींगसाठी साहित्यः १ टीस्पून लिंबाचा रस २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल १ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर १ टेबलस्पून चिली फ्लेक्स १ टेबलस्पून साखर ५ पाकळ्या लसूण, सोलून बारीक चिरलेल्या मीठ व मिरपूड चवीनुसार कृती : ड्रेसिंग च्या सर्व सामग्री ला एका छोट्या काचेच्या बाटलीत (उ.दा. जॅम ची बाटली) घालून, एकजीव होईपर्यंत हलवावे. सलाड लीव्ह्स, सफरचंद, चेरी टोमेटो व चीज ला एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यावर थोडा मीठ व मिरपूड घालावे मग त्यावर थाई चिली ड्रेसींग ओतून हलक्या हाताने मिक्स करावे. लगेच सर्व्ह करावे.

वाचने 21251
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

थाई, विशेषतः थाई करी, म्हणजे आपल्या मालवणीच्या जवळ जाणारं असल्याने फार आवडतं. या सॅलडचा फ्लेवरही भारी असणार यात शंका नाही. :)

एवढी रंगीबेरंगी डिश बघूनच खावीशी वाटतेय लग्गेच!

पाकृ आवडली नक्की करून बघणार :) थाई चिली ड्रेसींग तर अहाहा...क्या बात है :)

सॅलड हा प्रकार मी कधी कधीच खात असलो तरी हे सॅलड लगेच खावेसे वाटत आहे. अवांतर - एकेकाळी सॅलड खाणार्‍यांना मी 'काय हा पालापाचोळा खाताय?' असे चिडवत असे. आजकाल मलाही खाताना कॅलरीजचा विचार करावा लागतोय. काव्यगत न्याय ;-).