एक मुद्दा मांडायचा प्रयत्न करते - आम्हाला जेव्हा शाळेत लैंगिक शिक्षण मिळालं तेव्हा फक्त "मासिक धर्म" या विषयावर सांगीतले गेले. अजूनही भारतात तीच स्थिती आहे की आता गुप्तरोग/ एडस आदि रोगांची माहीतीदेखील सांगीतली जाते?
कारण चित्रपट, कादंबर्या आदिंमधून सहजीवनाअची एक इमेज निर्माण केली जाते जी अतिशय रोझी असते, खरं तर वास्तवापासून दूर असते. सततच्या भूलभुलैय्याच्या भडीमारामुळे , हार्मोनल बदलांमुळेदेखील मुलामुलींचे मन भरकटू शकते. शाळा/ विद्यालयांमधून वास्तवाची जाण करुन देण्याचे किती प्रयत्न होतात?
वास्तव म्हणजे 'सेफ सेक्स" काय, "लो रिस्क बिहेव्हिअर" कशाला म्हणतात.