Skip to main content

आरक्षण

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 15/02/2013 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
अनुसूचित जाती जमातींना शिक्षणात आरक्षण झालं, महिलांना सगळीकडे आरक्षण झालं, आता ठराविक जातींना बढतीत आरक्षण म्हणतायत; असं ऐकलं मी की आणखी काही मंडळी आपापल्यासाठी आरक्षणाचे प्रस्ताव मांडणार आहेत. जसं, जाड्या माणसांना सौंदर्यस्पर्धांमधे आरक्षण नाचता न येणा-यांना नृत्यस्पर्धेत आरक्षण गाता न येणा-यांना गायनस्पर्धांत आरक्षण टक्कल असणा-या लोकांना शॅम्पूच्या अ‍ॅड्स मधे आरक्षण दुचाकीधारकांना कार रेस मधे आरक्षण सॉफ्ट ड्रिंक पिणा-यांना बार मधे आरक्षण.... ...यादी खूप मोठी आहे.

काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने -२

लेखक सस्नेह यांनी शुक्रवार, 15/02/2013 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी काही नामांकित रसायने ही आहेत. शेजारी. हे रसायन स्फोटक नसले तरी अत्यंत उपद्रवी व बरेचसे चिकट असते. याचा शब्द-नाद अत्यंत मधुर असतो. किल्ल्यांपासून कुत्र्याच्या पिल्ल्यांपर्यंत काहीही जबाबदारी यांच्याकडून आपल्याला चिकटवली जाऊ शकते. म्हणून हे रसायन हाताळताना त्याचे अति निकट सान्निध्य टाळण्याची खबरदारी बाळगावी अन्यथा चिकट अनुभव येतो. हे रसायन पाण्यापेक्षाही प्रवाही असल्याने फट दिसली की आत घुसलेच म्हणून समजावे. आपल्या घरी काही खमंग पदार्थ बनत असताना आपल्याआधी याला त्या पदार्थाचा वास पोचतो.

नाचणीचे पौष्टीक लाडू

लेखक अनन्न्या यांनी शुक्रवार, 15/02/2013 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः अर्धा कि. नाचणीचे पीठ, एक मध्यम वाटी(अंदाजे १०० ग्रॅम) सुके खोबरे, दोन वाट्या पोहे, १०० ग्रॅम खारीक पावडर, पाव कि. तूप, अर्धा कि. पिठी साखर, वेलची पावडर स्वादानुसार. क्रुती: अर्धा कि. नाचणीचे पीठ घ्यावे. अर्धी वाटी तूप बाजुला ठेवून बाकीचे कढईत घ्यावे. त्यामध्ये नाचणीचे पीठ घेऊन बेसनाच्या लाड्वाप्रमाणे भाजून घ्यावे. नाचणीचा रंग मुळात काळपट असल्याने भाजताना खमंग वास सुटेपर्यंत भाजावे. (अंदाजे १० ते १५ मिनिटे) भाजलेले पीठ गार करण्यास ठेवावे. सुके खोबरे किसून खमंग भाजून घ्यावे. पोहे भाजून घ्यावे. खारीक पावडर जरा गरम करावी. भाजलेले सुके खोबरे मिक्सरला भरडसर फिरवावे.

माझी बायको..

लेखक स्मिता चौगुले यांनी शुक्रवार, 15/02/2013 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रुपमध्ये एकदा अशीच चर्चा सुरु होती मुलींच्या मुलांकडून किती अपेक्षा असतात वैगेरे वैगेरे .. मग काय कुरघोडी सुरु, झाली मुलीपण मागे हटेनात...लग्न झालेल्या, लग्नाच्या तयारीत असणाऱ्या सगळ्या एकमताने आप-आपले अनुभव, ऐकीव माहिती शेअर करत होत्या की प्रत्येक मुलीच्या जशा आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून अपेक्षा असतात तशा मुलांच्याही आपल्या होणाऱ्या बायको बद्दल भरपूर अपेक्षा असतात, ती अशी हवी तशी हवी .. त्यावेळेस हि कविता सूचली, म्हटलं चला नेहमीच्या विषयापेक्षा हटके विषय मिळाला (एक मुलगी म्हणून मुलींच्या अपेक्षा कवितेतून मांडेल असं ग्राह्य धरतात लोक..

च्याई.s.s.यला परत तिचा फोन आला..

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 15/02/2013 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी साडेसातच्या सुमारास घर सोडले. डॉकयार्डहून बेलापूर ट्रेन पकडली. फर्स्टक्लासचे कंपार्टमेंट अन नेहमीची विंडो सीट. कॉटन ग्रीन यायच्या आधी सवयीने डोळा लागला. अर्थात तेच बरे असते, कारण पुढे वडाळ्याला कॉलेजला जाणार्‍या अठरा ते चोवीस वयोगटातील ललना (गेली दहा वर्षे मी यांवरच डोळा ठेऊन असतो) चढल्या की पापणीला पापणी भिडवावीशी वाटत नाही तिथे झोपणार काय. मग बेलापूर आल्यावर परतीच्या एका प्रवाश्याने नेहमीसारखे माझी जागा पटकावण्यासाठी मला न चुकता उठवले तेव्हाच काय ती जाग आली. तसेच अर्धवट सर्धवट मिटलेल्या डोळ्यानी पाच-एक मिनिटांची पायपीट करत ऑफिसला पोहोचलो.

मोबद्ला

लेखक भावना कल्लोळ यांनी शुक्रवार, 15/02/2013 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपा वर माझे हे पहिले लेखन आहे, तरी तुमच्या प्रतिक्रिया, सुचना चे स्वागत. साभार : गारवा आज काम जरा जास्त आहे असे रोज ऑफिसात गेल्यावर वाटते, लंच टाईम पर्यंत खपून सुद्धा टेबलावर एवढे काम साठते , तरी बोटे चालतात, डोके मात्र चालत नाही, back ground मध्ये घरच्या कामाशिव्या काही चालत नाही, तितक्यात नवऱ्या चा फोन येतो, संध्याकाळी बिर्याणी कर म्हणून हुकुम सोडून जातो, रागाचा माझ्या हि तिथेच असाच पारा चढतो , मन हे नुसते घडाळ्याच्या का ट्या वर सैरा वैरा पळत सुटते, ५.११ च्या लोकाल साठी मी हि जीव घेऊन धावत सुटते , लोकल पकडून शुरू होतो कामाच्या आखणीचा खेळ, विचार करता करता घरी पोहचून मी

क्विक विडंबन: कळीदार कपूरी पान

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 15/02/2013 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
क्विक विडंबन: कळीदार कपूरी पान शनिवार... शनिवार, चांदणी बार एसी थंडगार डीजे धडधडा झिंगला त्यात बेवडा झिंगला त्यात बेवडा नाचतो वेडा भान हरपून भान हर...पून शनिवार...
काव्यरस

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 15/02/2013 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता...।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालदिवा” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता... ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता... ॥

सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं

अधीर उपाशी

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 15/02/2013 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
नोकरीत बढती मिळत नाही, पैशाची चणचण मिटत नाही, घरगुती वातावरण अशांत, अशी समस्यांची चेकलिस्ट घेऊन अमूकगावातला एक माणूस तमूकगावातल्या एका खूप मान्यता असलेल्या गणपतीच्या देवळात हजर झाला. त्याच्याच आयटी कंपनीत काम करणा-या एका मित्राने हे देऊळ त्याला ‘रेफर’ केलं ‘रेफर’. तर साहेब लगोलग गाडी बुक करून तमूकगावाला रवाना झाले आणि देवळात पोचले. ‘जे जे शक्य आहे ते ते करून बघू’ असं म्हणून. "देवा, फार लांबवरून तुझ्याइथे आलोय. तू सगळ्यांकडे बघत असतोसच. तुला माझीही अवस्था दिसत असेल. माझी स्वप्न कशी अर्धवट राहतायत, त्यांच्या पूर्ण होण्यात कशा आणि कुठल्या अडचणी येतायत, हे दिसत असेल. तरीही.

गोतांबीर

लेखक साबुदाणा खिचडी यांनी शुक्रवार, 15/02/2013 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
हा कोकणी पदार्थ सहसा "दैवज्ञ ब्राह्मणांकडील" लग्नात आढळतो. लग्नात दुसर्‍या दिवशी "तिखट" जेवण असतं तेव्हा सोबत गोतांबीर करतात. साहीत्य - २ वाट्या गव्हाचे पीठ, १ वाटी साखर, १ वाटी नारळाचे घट्ट दूध, २ वाट्या नारळाचे पातळ दूध, वेलची, २ मोठे चमचे तूप कृती - तूप एका कढईत घाला. त्यात मंद आचेवर गुलाबीसर होईपर्यंत गव्हाचे पीठ भाजून घ्या. छान सुरमट (खमंग) वास दरवळतो. नंतर त्यात पातळ नारळाचे दूध हळूहळू घाला. गुठळ्या होऊ नयेत याची दक्षता घ्या. नंतर जाड दूध व साखर घाला. भज्याच्या पीठासारखे होते. त्यात वेलची घाला. फार घट्ट वाटल्यास पाण्याने सरसरीत करुन घ्या. पण हे साधारण श्रीखंडासारखे दिसते.