ग्रुपमध्ये एकदा अशीच चर्चा सुरु होती मुलींच्या मुलांकडून किती अपेक्षा असतात वैगेरे वैगेरे .. मग काय कुरघोडी सुरु, झाली मुलीपण मागे हटेनात...लग्न झालेल्या, लग्नाच्या तयारीत असणाऱ्या सगळ्या एकमताने आप-आपले अनुभव, ऐकीव माहिती शेअर करत होत्या की प्रत्येक मुलीच्या जशा आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून अपेक्षा असतात तशा मुलांच्याही आपल्या होणाऱ्या बायको बद्दल भरपूर अपेक्षा असतात, ती अशी हवी तशी हवी .. त्यावेळेस हि कविता सूचली, म्हटलं चला नेहमीच्या विषयापेक्षा हटके विषय मिळाला (एक मुलगी म्हणून मुलींच्या अपेक्षा कवितेतून मांडेल असं ग्राह्य धरतात लोक.. म्हणून म्हंटल हटके)
माझी बायको..
प्रत्येक मुलाच एक स्वप्न असत
माझी बायको हि वेगळी असावी
सर्व रंग - गुणांचं मिश्रण
अशी ती इंद्रधनूची छटा असावी
आकाशातील नक्षत्राची चांदणी वाटावी
सोज्वळ-सोबर तिची प्रतिमा असावी
सगळ्यात उठून दिसणारी स्वप्नं मुग्धा
अशी ती मोहिनी असावी
सगुणांच प्रतिक जशी
प्रेम– वास्तल्याची मूर्ती वाटावी
माझ्या ओंजळीत सुख सांडणारी
अशी ती संपदा असावी
शांत, गंभीर ,पोक्त अशी
संस्कारांचा पुतळा असावी
कधी बालिश,पोरकट भासणारी
अशी ती चंचला असावी
चतुर, अभिमानी,काटकसरी अशी
व्यवहार कुशल ती गृहिणी असावी
प्रसन्न, हसतमुख, गरीब गाय
अशी ती कल्याणी असावी
सुखदु:खात साथ देणारी
संकटात आशेचा किरण वाटणारी
निराशेच्या प्रत्येक वाटेवर सोबत करणारी
अशी ती प्रेरणा असावी
क्लेशाला दूर सारणारी
वेदनेवर फुंकर घालणारी
माझ्या चुका पदरात घेणारी
अशी ती हर्षदा असावी
या सगळ्या गुणांचं मिश्रण
अशी ती इंद्रधनूची छटा असावी
कारण ..... प्रत्येकालाच वाटत
माझी बायको हि सगळ्यात वेगळी असावी ... :)
....स्मिता चौगुले
मिपाकरांनी या विषयीचे आपले अनुभव जरूर मांडावेत..:)
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
अय्या ....
अय्या .... :)
म्हणजे अगदि माझ्यासारखीचकी गं :)
:P :D
स्वयंघोषित ... अरे वा ...
In reply to अय्या .... by जेनी...
स्वयंघोषित ... अरे वा ...:)
अय्या ...
In reply to स्वयंघोषित ... अरे वा ... by स्मिता चौगुले
अय्या ...
ते आणि काय असतं गं ?? :(
शुद्ध मराठी शब्द असतो तो. जाउ
In reply to अय्या ... by जेनी...
शुद्ध मराठी शब्द असतो तो. जाउ दे. सोडून दे. :P
काळजी करु नकोस. तुझे कौतुकच करतायत त्या. ;)
(No subject)
In reply to शुद्ध मराठी शब्द असतो तो. जाउ by कवितानागेश
=)) =))
पूजे, तू लिही बरं
In reply to (No subject) by बॅटमॅन
स्व्यंगोशित
(No subject)
In reply to (No subject) by बॅटमॅन
:-/
मलापण
In reply to शुद्ध मराठी शब्द असतो तो. जाउ by कवितानागेश
मला पण एक जाऊ हवी आहे ...
जाऊ ??
In reply to मलापण by प्रसाद गोडबोले
जाऊ ??
अय्या :) ... पण माझं ठरलय गं :(
अय्या ...ते आणि काय असतं गं ??
In reply to अय्या ... by जेनी...
अग स्वयंघोषित --- स्वत:च
In reply to अय्या ... by जेनी...
अग स्वयंघोषित --- स्वत:च ठरवणे... :)
नाही हो,
In reply to अग स्वयंघोषित --- स्वत:च by स्मिता चौगुले
ती मिपाघोषित :
आहे.... बाकीचं फोटोत पाहा .
एक जुनी म्हण आठवली...
बायको चार जणांत ऊठुन दिसणारी असावी... चार जणांचा ***णारी नाही.
कविता चांगली आहे .
विडंबन करायला खूप स्कोप आहे.
एक राहिलं
मुक्ता बर्वेसारखी. :D :P
पण एक्झॅक्ट तशी नाही.
In reply to एक राहिलं by पैसा
पण एक्झॅक्ट तशी नाही. =))
नाही नाही !!
In reply to एक राहिलं by पैसा
मुक्ता बर्वे, उर्मिला कानिटकर, केतकी माटेगांवकर यांचं मिश्रण करुन जे काय तयार होईल तशी असावी. ;)
गंगू चालती का?
In reply to नाही नाही !! by सूड
मिश्र्णातून निर्मिती सावंत निघालीय. चालेल का? ;)
गूड वन...
In reply to गंगू चालती का? by अभ्या..
गूड वन...:)
हिमालयात
In reply to गंगू चालती का? by अभ्या..
जायचा रस्ता माहित आहे का बे?
हिहिहिहि
In reply to हिमालयात by सूड
नेतीय कडेवर घेऊन =)) =)) =))
हम्म...
कणेकरीमधलं, "तुमची बायको सुंदर, कलासक्त वगैरे वाटायला हवी असेल तर सर्वप्रथम तिचं तुमच्या शेजार्याशी लग्न करून द्या" हे आठवलं. :)
ते नाय जमलं तर जिजस म्हणतो तसं
In reply to हम्म... by दादा कोंडके
शेजार्याच्या बायकोवर प्रेम करा
छान....
मस्तच सूचली आहे कविता..
नक्की किती बायका हव्यात?
नक्की किती बायका हव्यात? ;)
फक्त अजुन एक
In reply to नक्की किती बायका हव्यात? by प्यारे१
"फक्त अजुन एक "
असं उत्तर देतील ...चावट मेले
नाही हो
In reply to फक्त अजुन एक by प्रसाद गोडबोले
एकावर एक
मस्त
मस्त
वा! छान जमलीय कविता !
वा! छान जमलीय कविता !
आजकाल (अपवाद असतील, क्षमस्व) मुलींच्या चेकलिस्ट फार स्पष्ट व्हायला लागल्यात. १,००,००० महिना पगार हवा (मग दिसायला कसाही का असेना मुलगा).. अमूक अमूक शहरात घर असायला हवं... क्वालिफिकेशनहई सिलेक्टिव्हच चालतात... असो.
मुलं आपली अजूनही त्यांची चेकलिस्ट स्वप्नातल्या परिशी टॅली करायचा प्रयत्न करत असतात. (अपवाद असतील अर्थातच, पुन्हा क्षमस्व)
असो.
गुड बन!
येनकेनप्रकारेण भरपूर पैसा आहे
In reply to वा! छान जमलीय कविता ! by वेल्लाभट
येनकेनप्रकारेण भरपूर पैसा आहे की नाही इतकेच हो, बाकी नुसत्या बातां.
अशी ती मोहिनी असावी
अशी ती मोहिनी असावी
अशी ती संपदा असावी
अशी ती चंचला असावी
अशी ती कल्याणी असावी
अशी ती प्रेरणा असावी
अशी ती हर्षदा असावी

एव्हढ्या महागाइत्,इतक्या सार्या
साउथ सुपरस्टार्स सिनेमातल्या हिरोइनची सर कोनाचाच बायकोला नय!
सकाळी भल्या पाहटे उठणारी
देव दर्शनाला साडि चोळी वरुन देवळात जाउन
पुजा मारुन मुलांना शास्त्रिय संगित व नृत्य शिकवणारी
आचार विचार वागणुकिने भारतिय परंपरा जोपासणारी...
नम्र विनयशील प्रसन्न प्रेमळ सात्विक
ड्रिम सिक्वेस्न्स सॉगमधे तोटक्या कपड्यात
मॅडोना लाजेल अशी कंबर झटकणारी
रस्त्यावरच्या लहान मुलांना फुलं फळं वाटुन मग
सिन्सीअरली मेडिकल कॉलेज अटेंड करणारी.
=))
In reply to साउथ सुपरस्टार्स सिनेमातल्या हिरोइनची सर कोनाचाच बायकोला नय! by अग्निकोल्हा
'पेग मारुन' असे म्हणायचे आहे का?
:)
In reply to =)) by परिकथेतील राजकुमार
पुजा मारुनच, पेग तर व्यवस्थित तयार केला जातो.
असो
In reply to :) by अग्निकोल्हा
जर पेग मारणार्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास "मारुन" च्या जागी "करुन" असे बिंधास्त समजावे.
बाकी नेमके, पण
In reply to साउथ सुपरस्टार्स सिनेमातल्या हिरोइनची सर कोनाचाच बायकोला नय! by अग्निकोल्हा
बाकी नेमके, पण
पार फुटलो राव. =))
एssssss,आमच्या "पूजा"
In reply to बाकी नेमके, पण by बॅटमॅन
एssssss,आमच्या "पूजा" मारायच्या नाहित हं ! :-/
पूजावाले गुर्जी
In reply to एssssss,आमच्या "पूजा" by अत्रुप्त आत्मा
कुणाला कशाचं तर कुणाला कशाचं :(
गुर्जी सोडा आता पूजा. ;)
लौकर लाडू द्या. :)
पार फुटलो राव
In reply to बाकी नेमके, पण by बॅटमॅन
त्याच साठी तो शब्द योजला होता...
एखादी गोश्ट किती एग्झॅगरेटेड असावी याचं साउथ सुपरस्टार्सच्या चित्रपटातिल होरिइन्स या एक उत्तम उदाहरण ठराव्यात. असलि अतिशयोक्ति दाखवण्यामागे ते पारंपारीक, आधुनिक, ग्रामिण व शहरी भागातिल प्रेक्षकवर्ग मात्र एकाच दमात सांभाळणे हा महत्वाचा हेतु मात्र ते साध्य करतात म्हणूनच त्यांच कौतुक.. नाय तर आपली मराठी मरतुकडी व्यावसायीक चित्रपट सृष्टी... :(
हे बाकी खरंय. सौथचे पिच्चर
In reply to पार फुटलो राव by अग्निकोल्हा
हे बाकी खरंय. सौथचे पिच्चर निव्वळ गल्लाभरू असतात.
सौथच्या हिरोईनी पण गल्लाभरू
In reply to हे बाकी खरंय. सौथचे पिच्चर by बॅटमॅन
सौथच्या हिरोईनी पण गल्लाभरू असतात. :)
अश्लील प्रतिसाद
In reply to सौथच्या हिरोईनी पण गल्लाभरू by llपुण्याचे पेशवेll
अश्लील प्रतिसाद =))
>> पुजा मारुन मुलांना
In reply to साउथ सुपरस्टार्स सिनेमातल्या हिरोइनची सर कोनाचाच बायकोला नय! by अग्निकोल्हा
>> पुजा मारुन मुलांना शास्त्रिय संगित व नृत्य शिकवणारी
नुसतं "मारून मुलांना शास्त्रिय संगित व नृत्य शिकवणारी" असं असेल!
पुजा मारून
पुजा मारून
ओ साहेब, असं जर पूजेला मारायला लागलात तर ती बरी सोडेल?
बघ की
In reply to पुजा मारून by रेवती
बघ की :-/
ठिक आहे ठिक आहे...
In reply to बघ की by जेनी...
मग तिथं पुजा उरकुन असं समजा...
असं नै गिल्फुकाका तुमी आधीच
In reply to ठिक आहे ठिक आहे... by अग्निकोल्हा
असं नै गिल्फुकाका :-/ तुमी आधीच असं नै बाबा लिवाय पाय्जेल हुतं :-/
आता मला कुणी मारुन गेलं म्ह्न्जे ?? :( :-/
त्ये सम्द सौदात घडतं...
In reply to असं नै गिल्फुकाका तुमी आधीच by जेनी...
अगं तु सौदी होरोइन्स थोडीच हैस ?
अय्या ... म्ह्न्जे मी सौदीत
In reply to त्ये सम्द सौदात घडतं... by अग्निकोल्हा
अय्या ... म्ह्न्जे मी सौदीत गेली तरच मला मारतिल काय ??
इकडे नै मारणार का मग ??
मन्ग ठिके गिल्फुकाका ....
मारा सौदिच्या पूजाला :P
:D
बोर मारु नकोस
In reply to अय्या ... म्ह्न्जे मी सौदीत by जेनी...
नाय तर इकडं पन मारतिल!
(No subject)
In reply to बोर मारु नकोस by अग्निकोल्हा
:-/
छान. कविता मजेदार वाटली.
छान. कविता मजेदार वाटली.
आणि एक महत्वाचे, झुरळास
आणि एक महत्वाचे, झुरळास घाबरणारी नसावी, कसें?
स्मिताताई कविता छान जमली आहे.
असहमत. बैको झुरळाला
In reply to आणि एक महत्वाचे, झुरळास by अधिराज
असहमत. बैको झुरळाला घाबरल्याने एरवी चान्स नसला तरी त्यासंदर्भात तरी तिच्यासमोर वीरश्रीचे प्रदर्शन करायला मिळते हे विसरलात होय =)) =))
कविता आवडली. इतकी
कविता आवडली. इतकी सर्वगुणसंपन्न मुलगी - कठीण आहे.
आं?
In reply to कविता आवडली. इतकी by शुचि
कन्या राशीची सहाव्या घरातील शुक्रवाली पण नाही चालणार? ;)
ते लग्न करायचय का आयटेम साँग यावर
In reply to आं? by उपास
अवलंबून आहे
कठीण आहे !
कठीण आहे !
सिलेक्षन (म्हणजे निवड ..) साठी इतके फिल्टर्स लावले तर रिझल्ट काय मिळणार?
खरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचे मत नसलेली आणि आज्ञाधारक, अशी पाहिजे... बाकी सगळ्या निव्वळ कविकल्पना.
सॉरी स्मिता ताई अवांतरच पहिल्यांदा लिहिले ..
कविता छान आहे बरं का .
बरी आहे कविता. आता उलट्या
बरी आहे कविता. आता उलट्या बाजूने लिहा.
येव्ह्ढ लांबलचक काव्य
येव्ह्ढ लांबलचक काव्य लोहिण्यापेक्षा सरळ 'मुकी* बायको ' पाहिजे असे लिहायचे ना ;)
मुकी म्हणजे मुकीच ;)
हो...
In reply to येव्ह्ढ लांबलचक काव्य by सुहास..
आणि आंधळी सुद्धा. ;)
धन्यवाद प्रतिसादाबद्द्ल
धन्यवाद प्रतिसादाबद्द्ल
????
आंधळी आणि मुकी बायको? कशाला? त्यापेक्षा लग्नच नका . फ्री बर्ड फॉर एव्हर !! :)
बाकी कविता छानच झाली आहे.
(No subject)
:)