Skip to main content

त्रेधा

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 02/04/2013 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
एक एक श्वासात ध्यास मज बिलगुन आहे राधा नसून भासे सोबतीस ठायी ठायी ही बाधा .............. स्वरे कोकिळा गाई वसंत ................अनाम सार्‍या विविधा ................मदन गंध पवनासंगे ................एकांती कुंठित मेधा खोल निळाई अथांगासवे क्षितिज बांधते वाडा जन्म सांडतो संमोहातच धाव धावतो वेडा .................वलये वलये लाटा लटा .................मनभर तिरपिट त्रेधा .................काय कशास्तव हे भिजलेपण .................सय-श्रावण सण साधा ......................अज्ञात
काव्यरस

अ‍ॅन्डरॉईड घेणार्‍यासांठी

लेखक कंजूस यांनी सोमवार, 01/04/2013 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी नवीन ओपरेटिंग सिस्टिम असलेला फोन घेण्याच्या विचारात असतांना "तुमच्या अ‍ॅन्डरॉईडसाठी"हा धागा दिसला .पण ही चर्चा वाचून हे काहितरी किचकट यंत्र तर नाही ना असे वाटू लागले . कारण पाच पासून पन्नास हजार रुपयांचे पर्याय आहेत आणि प्रत्येकाचा अमुक फोनपेक्षा तमुक कंपनीचा घेतला असता तर बरे झाले असते असा रिंगटोन वाजतो आहे . मला असे विचारायचे आहे १)अॅपस् ऑफलाईन चालतात का ? २) वेबपेज झटकन सेव करता येते का ?

कांदा कैरीची चटणी

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 01/04/2013 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
ह्ळूहळू सुट्टया सुरू झाल्या आणि पाहुणेमंडळी येऊ लागली. त्यानिमित्ताने कोकणातील वेगवेगळे पदार्थ घरी होऊ लागले. त्यातील काही निवडक पदार्थ आपल्यासाठी देत आहे. या आधीचा फणस पुलाव जसा हटके तशीच ही चटणीही!! साहित्यः चार मोठे कांदे, एक मध्यम कैरी, सुक्या मिरच्या दहा-बारा, एक वाटी ओले खोबरे, एक वाटी गूळ, मीठ चवीनुसार, पाव वाटी तेल, फोडणीचे साहित्य. क्रुती: सुक्या मिरच्या गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. कांदा, कैरीची साले काढून किसून घ्या. ओले खोबरे, सुक्या मिरच्या मिक्सरला बारिक करून किसलेल्या कांदा कैरीत मिसळा. गुळात खडे असल्यास तेही मिक्सरला बारिक करून गूळ वरील मिश्रणात मिसळा. चवीनुसार मीठ घाला.

राजकीय पक्ष आणि संरचना

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 01/04/2013 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
काल भाजपामधील नव्या अध्यक्षांनी आपली नवी 'टीम' घोषित केली. या निमित्ताने प्रत्येक पक्षातील अंतर्गत संरचना कशी असेल असे कुतूहल होते. थोडी शोधाशोध केल्यावर भाजपा, काँग्रेस आणि डाव्यांमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची रचना जशी माझ्या लक्षात आली तशी येथे देत आहे. या धाग्यामुळे विविध बातम्यांत वेळोवेळी उल्लेख होणार्‍या पदांविषयी अधिक डोळस समज निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. ========================
भारतीय जनता पार्टी (भाजपा):
भाजपा या पक्षामध्ये 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो.

॥पक्षिणीचे प्रेम॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी सोमवार, 01/04/2013 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी निवांत, बसलो होतो सोफ्यावर । अचानक नजर गेली , चिमणीच्या खोप्यावर॥ तिची ती दोन पिल्ले , चिवचिवाट करत होती । चिमणी ही मोठ्या प्रेमाने, त्यांना दाणे चारत होती ॥ तितक्यात घरत लक्ष गेले..... माझी ही दोन मुले, रडुन रडून सांगत होती। खाण्यासाठी आईकडे, कहीतरी मागत होती ॥ घरात होते सर्व पण, झोळी तिची खाली होती। कामावर जाण्याची, घाई तिला झाली होती॥ करिअर व पैशापुढे, आईचे ते प्रेम विरले। माणसाच्या प्रेमापुढे, "पक्षिणीचे प्रेम" श्रेष्ठ ठरले॥

भान

लेखक आतिवास यांनी सोमवार, 01/04/2013 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
गोधूळ लेऊन देह मनावर अक्षरांची तरली आण. आकाशाने उचलून घेता तरारले मग अवघे रान. पंचम पंचम मध्यावरती सुरेल, हळवी नाजूक तान. जपले आहे मुठीत इवल्या अव्यक्ताचे अफाट भान.

आज फिर मरनेका इरादा है ......!!!

लेखक जेनी... यांनी सोमवार, 01/04/2013 04:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज तो जीने की तमन्ना है........... हा लेख विजुभाऊंना समर्पित ...... ******************************************************************************************************************************************************* आज फिर मरनेका इरादा है! . . . . काल डायवोर्स पेपर वर सह्या करताना तुझा हात एकदा तरी थरथरेल ,नजर बिथरेल असं वाटलं होतं, पण नाही ,एका अर्थी बरंच झालं. तुला मोकळ्या आभाळाखाली मोकळा श्वास हवा होता, आणि तुला श्वास घेताना मला पहायचं होतं.

उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर १२ : ओस्लो नगरी (३, मुक्तसफर)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 01/04/2013 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
==================================================================== उत्तर ध्रुवीय प्रदेशाची सफर : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६...

सोत्रींचा दारूवरचा लेख आणि मी

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/03/2013 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
सोमवारी मिसळपाववरचा सोत्रींचा दारूवरचा लेख वाचला. दारू म्हणजे काय या हे समजवून देणे काही सोपे काम नाही. ते दारू पिण्याइतकेच महत्त्वाचे आणि अवघड काम सोत्रीसारख्या माणसाने खुपच सोप्या पद्धतीने सांगितले आहे. आजकाल लिहीणे सोपे झाल्याने जो तो आपआपले अनूभव लिहीत बसतो. कुणी किल्यावर भटकंतीचे लेख लिहीतो, कुणी वेगवेगळे पदार्थ कसे करायचे ते सांगतो. हे असले अनुभव वाचल्यामुळे इतरांना किती त्रास होत असतो याची लिहीणार्‍याला काय कल्पना? लगोलग दारूवरचे सगळे लेख वाचून काढले.

एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 31/03/2013 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुलाखत: गप्पाटप्पा शिळबाबांसोबत श्रोतेहो, आज होळीनिमीत्त आपल्या स्टुडीओमध्ये प्रसिद्ध शिळपादक श्री. शिळबाबा आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या छंदाबाबत माहीती करून घेवूया. निवेदकः नमस्कार शिळबाबा. होळीनिमीत्ताने आपणाला शुभेच्छा. शिळबाबा: नमस्कार, नमस्कार. आपणालाही होळीच्या शुभेच्छा! निवेदकः शिळबाबा, संपूर्ण राज्यात आपल्या शिळपादनाची किर्ती पसरलेली आहे. गावोगावी आपल्या शिळपादनाचे कार्यक्रम होतात. या सर्व कार्याबद्दल आपल्याला काय वाटते? शिळबाबा: माझ्यासारख्या एकमेव शिळपादकाला मिळालेली किर्ती पाहून मला खुपच समाधानी वाटते.