ह्ळूहळू सुट्टया सुरू झाल्या आणि पाहुणेमंडळी येऊ लागली. त्यानिमित्ताने कोकणातील वेगवेगळे पदार्थ घरी होऊ लागले. त्यातील काही निवडक पदार्थ आपल्यासाठी देत आहे. या आधीचा फणस पुलाव जसा हटके तशीच ही चटणीही!!
साहित्यः चार मोठे कांदे, एक मध्यम कैरी, सुक्या मिरच्या दहा-बारा, एक वाटी ओले खोबरे, एक वाटी गूळ, मीठ चवीनुसार, पाव वाटी तेल, फोडणीचे साहित्य.
क्रुती: सुक्या मिरच्या गरम पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. कांदा, कैरीची साले काढून किसून घ्या. ओले खोबरे, सुक्या मिरच्या मिक्सरला बारिक करून किसलेल्या कांदा कैरीत मिसळा. गुळात खडे असल्यास तेही मिक्सरला बारिक करून गूळ वरील मिश्रणात मिसळा. चवीनुसार मीठ घाला. पाव वाटी तेल तापत ठेवा. मोहोरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी करा. तयार फोडणी चटणीला द्या. मिरच्या भिजवून घातल्यामुळे चटणीला सुंदर रंग येतो. मिरच्यांचा तिखटपणा पुरेसा न वाटल्यास लाल तिखट घालावे. गूळाचे प्रमाणही आपल्या चवीनुसार कमी जास्त करावे.
तांदुळाची गरमागरम भाकरी आणि कांदा कैरीची चटणी... अहाहा!!!!!!!!!!!!
वाचने
14581
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्
खल्लास !
तोंपासु ! तोंपासु ! तोंपासु !
सह्हि...
मस्तं...तोंपासू
+१
In reply to मस्तं...तोंपासू by सानिकास्वप्निल
तक्कू हा शब्दच फार वर्षंनी
In reply to मस्तं...तोंपासू by सानिकास्वप्निल
छान आहे...करुन चाखायला हवी.
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
टक्कू म्हणतात ...त्याला आमच्या भागात, त्याची क्रुती
सहमत
In reply to टक्कू म्हणतात ...त्याला आमच्या भागात, त्याची क्रुती by अनन्न्या
राइट्ट
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
कांदा कैरी
In reply to राइट्ट by अभ्या..
आहेच
In reply to कांदा कैरी by श्रीरंग_जोशी
कंसात लिहिले की
In reply to आहेच by अभ्या..
गार्लिक हॉटेल
In reply to आहेच by अभ्या..
आमच्याकडे तक्कुमध्ये कांदा
In reply to टक्कू म्हणतात ...त्याला आमच्या भागात, त्याची क्रुती by अनन्न्या
मस्त्,मस्त्,मस्त.
अनन्या, हे मी कांदा न घालता
अहाहा
तक्कू
राईट्ट सार
In reply to तक्कू by रमेश आठवले
अभ्या
In reply to राईट्ट सार by अभ्या..
येम रा नितीन
In reply to अभ्या by नि३सोलपुरकर
तांदुळाची गरमागरम भाकरी आणि
भारी दिसतेय चटणी.
आमच्या कडे यालाच तक्कू
पाणी सुटले !!!
सर्वांचे आभार!!
ज्वारीच्या गरम आणि पापडा