Skip to main content

वृक्षारव

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 12/04/2013 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
पाचोळा माझाच पेटला झळा लागुनी दग्ध विशाखा अंगावर जळली पाने पण आत अबाधित बहर अनोखा ना सूडाचा लेश तसूही ना रिपुकांचा जंगम विळखा डाव मांडला ऋतुचक्राचा ना कोणी मज आपला परका कुणी न माझा असो तरीही "मी" माझ्यातिल उत्कट झोका पवनाचे हुंकार झेलतो जरी कधी असतो तो धोका .........................अज्ञात
काव्यरस

आजी

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 12/04/2013 05:32 या दिवशी प्रकाशित केले.
"लिव्ह योर बेस्ट लाइफ" या "ओ - द ऑपराह मॅगझिन" च्या अंकामधील एका लेखाचे भाषांतर. हा लेख त्यातील लहान लहान वाक्यशैली व मसुद्यामुळे मला खूप आवडला. _______________________________________ बालपणी, उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली रे झाली की मी व माझी बहीण आजोळी चक्कर मारत असू. कॅलिफोर्नियामधील "पॅरडाइज" नावाच्या गावात माझी आजी रहात असे.गाव नावाप्रमाणेच देखणे, वनश्रीने नटलेले खेडे होते.आमच्या सुटीमधील वास्तव्यात आमच्या आजीने आम्हाला काय शिकविले नाही?शिवणकाम म्हणा, विणकाम म्हणा की घरगुती डोनट बनविणे म्हणा सर्व काही शिकविले.

ब्राउजर एक्स्टेंशन्स

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 11/04/2013 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,सुझेच्या अ‍ॅन्ड्रॉइड धाग्यात अ‍ॅप्स देताना,विचार केला की इथे क्रोम आणि फायरफॉक्स वापरणारी बरीच मंडळी आहेत्.तेव्हा मला माहित असलेले आणि इथल्या अन्य टेक-सॅव्ही मंडळींना माहित असलेले ब्राउजर एक्स्टेंशन शेअर करण्यास काय हरकत आहे. तर आता मी वापरत असलेले वरील दोन्ही ब्राउजर्सचे एक्स्टेंशन्स इथे देत आहे. *************************************************** ब्राउजर एक्स्टेंशन हे अगदी छोटे सॉफ्टवेअर असते ज्यामुळे तुमच्या ब्राउजरची फंक्शनॅलिटी वाढवता येते. आता सर्वात प्रथम मी जे एक्स्टेंशन्स इथे देणार आहे ते प्रायव्हसी इनहान्स करणारे आहेत.प्रायव्हसी बाबतीत बरेचसे इंटरनेट युजर्स जागरुक न

पाळ्णा

लेखक Bhagwanta Wayal यांनी गुरुवार, 11/04/2013 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा सण पहिला । गुढी उभारुन साजरा केला । नविन वार्षास प्रारंभ झाला । ये श्री दत्ता ये ये ॥ दुसरा सण व्यासपौर्णिमा । सद्गुरु स्वारीचा गाऊ महिमा । त्रीजगती नाही उपमा । ये श्री दत्ता ये ये ॥ तिसरा सण पंचमी आली । नागराजाची पुजा ही केली । झोका खेळाया जमल्या मुली । ये श्री दत्ता ये ये ॥ चौथा सण रक्षाबंधन । भाऊरायाला राखी बांधीन । आई बाबांना प्रथम वंदन । ये श्री दत्ता ये ये ॥ पाचवा सण गोपाळ काला गोप्गोपींचा मेळा जमला हांडी फोडण्या त्वरे निघाला ये श्री दत्ता ये ये ॥ सहावा सण श्रावण पोळा । बैलांच्या गळ्यात घुंगरमाळा । शेतकरीदादाला आनंद झाला । ये श्री दत्ता ये ये ॥ सातवा सण गणे

सैर भैर २

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 11/04/2013 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
१९९० सालची गोष्ट असेल. मी नौदलाच्या कुलाब्याच्या अश्विनी रुग्णालयात मनोविकार विभागात विभाग प्रमुख कर्नल पेठे यांच्या बरोबर बसलो होतो. त्यांनी पुढच्या रुग्णाला बोलावले. पुढचा रुग्ण एक वरिष्ठ कर्नल आपल्या पत्नीसमवेत आत आला. कर्नल साहेब ४५ ते ५० च्या मध्ये होते आणि ते गणवेशात होते.ते कुलाब्याच्या थळ सेनेच्या महाराष्ट्र गुजरात आणि गोवा विभागाच्या मुख्यालयात कामाला होते. त्यांची अंगकाठी सडपातळ आणी चालण्यात रुबाब होता. पत्नी साधारण ४० च्या आसपास होत्या.टापटीप आणि छान पोशाख केलेल्या. मी विचारात पडलो कि यात रुग्ण कोण? पेठे सरानी पत्नीला विचारले कि काय म्हणताय आणि साहेब काय म्हणताहेत?

सरंजामशाही संपली आहे का?

लेखक शैलेंद्रसिंह यांनी बुधवार, 10/04/2013 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हणायची पद्धत आहे. शाहु-फ़ुले-आंबेडकर प्रभुतींची नावे घेतली, शिवरायांचा जयजयकार केला की आपोआपच पुरोगामी विचारसरणीचे पाईक होता येते. अशा ह्या महाराष्ट्रात भूमाफ़िया निर्माण व्हायला लागले तेव्हा वाटायचं की महाराष्ट्राची अवस्था वाईट होत चाललेली आहे. पण हा प्रकार खुप जुना असल्याचं आजच एका धक्कादायक बातमीमुळे कळालं. शिवरायांचे १३वे वंशज उदयनराजे भोसले ह्यांचे जवळपास ११ हजार ४७० एकर शेतजमिनीवर भोगवटादार म्हणुन सातबाराच्या उताऱ्यात नाव आहे आणि जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांचा कुळ म्हणुन उल्लेख आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना जमीनीचे व्यवहार करतांना त्रास होतो.

वेडी....

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 10/04/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे ९० चं दशक असेल.. ठाणे स्थानकावर एक वेडसर भिकारीण दिसायची.. नेहमी तिच्या हातात एक तान्हं मूल असे..तिच्या हावभावावरून, वागणुकीवरून ती वेडसर होती हे निश्चित.. रहायचीही स्थानकाच्याच परिसरात.. आता सतत अगदी जातायेता तिच्यावर लक्ष जायचं असं नव्हे..परंतु ती दिसायचीच.. ती दिसली की माझ्यासारखे अनेक जण कदाचित तिला नोटीस करत असतील आणि अनेक जण नसतीलही.. या गोष्टीला, म्हणजे तिच्या अशा नेहमी दिसण्याला माझ्या आठवणीप्रमाणे ५-६ वर्ष तरी सहज झाली असतील.. त्यानंतर एकदा केव्हातरी देवेन्द्र मिश्राशी बोलताना अगदी सहजच तिचा विषय निघाला होता..

कधी वाटतं..

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 10/04/2013 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
कधी वाटतं.. नाशिकला तात्यासाहेब शिरवाडकरांच्या घरी भरणा-या सामान्य लोकांच्या दरबारात सामिल व्हावं.. तर कधी वाटतं... भाई आणि सुनिताबाईंच्या सोबत एखादी संध्याकाळ घालवावी...त्यांच्याकडून कविता ऐकाव्या.. कधी वाटतं.. बाबूजींच्या पायाशी बसून 'झाला महार पंढरीनाथ..' किंवा 'निजरुप दाखवा हो..' असं काहितरी शिकावं.. तर कधी वाटतं.. थेट उठून पेडररोडला दीदीच्या घरी जावं.. आणि तिच्या पायांना मिठी मारावी.. कधी वाटतं... हळूच, पावलांचा आवाज न करता कलाश्री बंगल्यात शिरावं... आतून भन्नाट जुळलेल्या निषादाच्या तानपु-यांच्यात अण्णांनी सुरू केलेला पुरिया कानी पडावा.. वाटलंच तर हळूच हिंमत करून आत जाऊन चुपचाप

'लेह' वारी, अंतिम भाग

लेखक मनराव यांनी बुधवार, 10/04/2013 14:56 या दिवशी प्रकाशित केले.

बाजारभाव (४-११-२००९)

लेखक Bhagwanta Wayal यांनी बुधवार, 10/04/2013 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसमध्ये बायका मारत होत्या गप्पा महगाईचा विषय होता साधा आणि सोपा काल बाई जेंव्हा मी मार्केटला गेले भाज्यांचे भाव बघुन हैराणच झाले पंधरा रुपयाला एक होती मेथीची जुडी एक रुपयाला एक कोथिंबीरीची काडी एक रुपयाचे लिंबू पाच रुपयाला झाले कांदे व बटाटे पंचविस रुपयावर गेले बारा रु.पाव किलो वांगी व कारले फ्लॉवर कोबी बघुन डोकेच फिरले वीस पंचवीस रुपये किलो होते तेथे गहू तंदुळ म्हणाला मला हातच नका लाऊ शंभर रु.किलो झाली तुरीची डाळ भडकलेले होते हरभरे आणि वाल साखरेचा भाव तर पस्तीसवर गेला तेलाचा डबा पण किती महाग झाला दुध झाले महाग चाळीस रुपये लिटर विचारायलाच नको चीज आणि बटर सगळीकडेच भडकली अशी ही महागाई