Skip to main content

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 14/07/2013 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

ग बाई तुन्ह नाव शे सुपडाबाई

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 14/07/2013 03:39 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी खालील गीत हे अहिराणी भाषेत (खानदेशी नव्हे) लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ही भाषा मला ऐकून ओळखीची आहे परंतु त्यावर माझे प्रभुत्व नाही. यास्तव काही शब्द कमीजास्त असतील तर ते सांगावेत.
Taxonomy upgrade extras

चारोळी

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 13/07/2013 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य शोधण्या हवे मन कोमल हास्य शोधण्या हवे मन निर्मल प्रेम शोधण्या हवे मन गंभीर दुखः झेलण्या हवे मन खंबीर काव्य हे स्फुराया हवे हास्य हे फुटाया हवे विचार हे प्रगटाया हवे भाव हे फुलाया हवे
काव्यरस

पेरी-पेरी (बटरफ्लाय) चिकन

लेखक गणपा यांनी शनिवार, 13/07/2013 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो. उद्या रविवार त्यात परत एकादशी, संकष्टी वैग्रे ही काही नाही. तेव्हा कोंबडी हाणायला कुणाची हरकत नसावी. काय म्हणता ? ;) ईथे बाहेर मस्त धो धो पाऊस कोसळतोय. काही तरी झणझणीत चापायची इच्छा होतेय. आज फार दिवसांनी मुड ही लागलाय.

केस

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 13/07/2013 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
' केस ' 10 April 2013 तारखेला 11:58 AM वाजता डोक्यावरचे केस हा प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वाचा महत्वाचा भाग असतो. काही लोक निव्वळ केसांमुळे ओळखले जातात आणि प्रसिद्ध होतात. काही निव्वळ केस नाहीत म्हणून ओळखले जातात. अनेक सेलिब्रिटींचे केस हीच त्यांची ओळख असते. उदा. बच्चन, अनुपम खेर वगैरे. एपीजे अब्दुल कलाम आणि तत्सम महान लोक यांचा आपण इथे अपवाद करुयात. कारण हे लोक त्यांच्या कर्तृत्वाने जेवढे ओळखले जातात, तेवढेच त्यांच्या केसांमुळे ! समजा अनुपम खेर यांच्या डोक्यावर शोले चित्रपटातील बच्चनच्या केसांचे रोपण केल्यास कसे वाटेल ?

< निशःब्द >

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 13/07/2013 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा http://misalpav.com/node/25136 सुरेश चे लग्न जमत नसते त्यामुळे तो टेन्शन मधे असायचा. आज बुधवार होता. बुधवारी एक कविता करणे हा सुरेशचा नियम होता त्यामुळे तो आजतरी बाहेर जाणार नव्हता. मात्र लग्न जमत नाही या तेन्शन मुळॅ त्याच्या बुधवारच्या कविता आटल्या होत्या. इतक्यात रमेश चा फोन आला " काय अरे सुरेश बाबांची प्यान्ट टेलरकडुन आणायची विसरलास.

भारताचं खरं दुर्दैव

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 13/07/2013 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच एका ऐतिहासिक ठिकाणाला दिलेल्या भेटीत पुन्हा एकदा लोकांच्या भावनाहीनतेचं, चंगळवादाचं, मगरुरीचं, अहंकाराचं प्रदर्शन बघायला मिळालं. तसं ते वाण्याकडून चार साबण आणायला गेलो तरीही बघायला मिळतं; पण अशा विशेष ठिकाणी, किंवा काही विशेष सण-समारंभात ते जरा ‘विशेष’ असतं. रस्त्यावर गाडी चालवताना तर आपण जगाचे राजे हा भाव तनामनात घेऊन लोकं वावरतात. म्हणजे सांगायचंच झालं, तर त्यांच्या वाटेमधे साधं पाखरू जरी आलं तरी त्याची आई-बहीण काढतात. आता रांग आहे, म्हणजे आपल्या पुढे लोकं असू शकतात. पण आपण जगाचे राजे म्हटल्यावर आपल्या मधे कुणी येऊच कसा शकतो?

" बया आज माझी नसे वात द्याया .."

लेखक विदेश यांनी शनिवार, 13/07/2013 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
. (चाल : प्रिया आज माझी नसे साथ द्याया -) बया आज माझी नसे वात द्याया असो बंद डोळे मिटो पापण्या या.. नको गाणी आता जरा झोपतो मी सुरांची तिच्या आज ती हूल नाही बयेवीण ना त्रास होईल आता.. किती छान म्हटले तरी त्रास होतो जरी कान बंदी तरी बोल येतो शिरा त्या गळ्याच्या फुगाव्या किती त्या.. न भांडी धुवाया,न कामा उशीर कसा आज हातास येईल जोर मुखी यातना रात्र जागेल गाया.. किती आठवू मी अशा भांडणांसी पुरे लाटण्यावीण शब्दांस खाशी कशाला उभी ती मनीं महामाया..! .
काव्यरस

माया ही पात्तळ-१"बेशर्त स्वीकृती"

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 13/07/2013 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
ढीश्श....क्लेमर!!! >>> आंम्हास तसे सर्व काही साधे सरळ रुचते,आणी पचतेही! वेळच आली तर,वेडे/वाकडेही पचवू कदाचित.,,, पण... सरळ होणारे पदार्थ मुद्दाम कोणी जड करून खावयास दिले,आणी वरून मी सांगतो तितके वेळाच चाव,आणी मी म्हणतो तसेच गिळ! असे म्हटले तर ते आमच्या लेखी(इथे लिहायच्या नव्हे! ;) ) गिळगिळीतच होइल. म्हणून आंम्हास "त्यानी" जे सुचविले,ते यांना बोधप्रद होवो,अशी "जड" प्रस्तावना करून ही जिल्बी तळायला-सोडत आहे.