नुकत्याच एका ऐतिहासिक ठिकाणाला दिलेल्या भेटीत पुन्हा एकदा लोकांच्या भावनाहीनतेचं, चंगळवादाचं, मगरुरीचं, अहंकाराचं प्रदर्शन बघायला मिळालं. तसं ते वाण्याकडून चार साबण आणायला गेलो तरीही बघायला मिळतं; पण अशा विशेष ठिकाणी, किंवा काही विशेष सण-समारंभात ते जरा ‘विशेष’ असतं. रस्त्यावर गाडी चालवताना तर आपण जगाचे राजे हा भाव तनामनात घेऊन लोकं वावरतात. म्हणजे सांगायचंच झालं, तर त्यांच्या वाटेमधे साधं पाखरू जरी आलं तरी त्याची आई-बहीण काढतात.
आता रांग आहे, म्हणजे आपल्या पुढे लोकं असू शकतात. पण आपण जगाचे राजे म्हटल्यावर आपल्या मधे कुणी येऊच कसा शकतो? मग अरेरावी करणे; चार शिव्या देणे किंवा ज्याचं आपल्याला बाळकडू मिळालंय तो भ्रष्टाचार करणे (संबंधित व्यक्तीस चार पैसे टेकवावेत, की... हं !) हे बघायला मिळतं. पैसे ही कमवण्याची, साठवण्याची, (देण्याची वगैरे सोडाच) गोष्ट नसून ती दाखवण्याची गोष्ट आहे; हे इथलं तत्वज्ञान आहे.
हा विषय मोठा आहे; पण थोडक्यात कसं आहे, की वर नमूद केल्याप्रमाणे जे वागतात, त्यांना ते चूक आहे हे कळण्याची बुद्धी नसते, आणि ज्यांना ते चूक आहे के कळण्याची बुद्धी असते, त्यांना तसं वागवणा-यांना थांबवणं शक्य नसतं.भारत म्हणूनच मागे आहे आणि सदैव राहील.
‘लायकी नसलेल्यांकडे पैसा आहे; आणि हिंमत नसलेल्यांकडे अक्कल आहे; हेच भारताचं खरं दुर्दैव आहे.’
- अ. ज. ओक
‘लायकी नसलेल्यांकडे पैसा आहे; आणि हिंमत नसलेल्यांकडे अक्कल आहे; हेच भारताचं खरं दुर्दैव आहे.’
- अ. ज. ओक
वाचने
5606
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे अ ज ओक कोण. पु ना ओकांचे
ज्याचं त्याचं मत.
In reply to हे अ ज ओक कोण. पु ना ओकांचे by विजुभाऊ
मुतपीठीय लेख
बर!
In reply to मुतपीठीय लेख by lakhu risbud
काही पटलं
रतन टाटा आणि बाकी सग्गळे
In reply to काही पटलं by पैसा
आपल्या मधे कुणी येऊच कसा शकतो
पहाड साहेब, अगदी बरोबर ओळखलंत
In reply to आपल्या मधे कुणी येऊच कसा शकतो by काळा पहाड
अच्छा!!
In reply to पहाड साहेब, अगदी बरोबर ओळखलंत by वेल्लाभट
न म्हटलेलं कसं हो वाचलंत
In reply to अच्छा!! by तुषार काळभोर
थोडंसं...
In reply to न म्हटलेलं कसं हो वाचलंत by वेल्लाभट
मला एक कळत नाहीये; जणु काही
In reply to थोडंसं... by तुषार काळभोर
सगळ्याच जातीत हे लोक असतात
In reply to आपल्या मधे कुणी येऊच कसा शकतो by काळा पहाड
>>>>>नुकत्याच एका ऐतिहासिक
हा तो प्रसंग
In reply to >>>>>नुकत्याच एका ऐतिहासिक by पाषाणभेद
असा विचार
अनियंत्रित झालेली प्रजा आणि
काय हो आज सकाळी सकाळीच?!
"एका ऐतिहासिक स्थळी
हाहाहा! सप्रे साहेब ते काय नि
OK. I missed it..
In reply to हाहाहा! सप्रे साहेब ते काय नि by वेल्लाभट
.