Skip to main content

रागावणे – समजावणे

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 14/10/2013 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
........................१............................. रागवलेली ती, समजूत काढणारा मी रागवलेला मी, समजूत काढणारी ती या दोन विरुद्ध गोष्टी आहेत . ती रागावली कि तिची समजूत काढणे सोपे आहे ते जमते आजकाल मला पण तिच्यावर रागावून ती समजूत काढत असतांना रागावलेलेच राहणे फार अवघड असते ते अजूनही जमलेले नाही मला . कसं असतं ना, समजूत काढणारा नेहमीच समजूतदार असतोच असे काही नाही पण सांगणार कोणाला? ........................२............................. रागावलेली ती लगेच लक्षात येते रागावलेला मी तिला कळतोच असे नाही कां कळूनही वळत नाही? . आपल्या माणसावर रागावणे हा आपला हक्क जरूर आहे . पण आपलं माणूस आपल्यावर राग
काव्यरस

ऐका इंटरनेट देवा तुमची कहाणी - ३ (ARPANET चा अस्त आणि TCP/IP चा उदय)

लेखक नानबा यांनी सोमवार, 14/10/2013 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
भाग - १ भाग - २ १९६९ मध्ये प्रो. क्लाईनरॉक यांनी ARPANET साठी पहिला संदेश पाठवला आणि इंटरनेट संकल्पनेला मूर्त स्वरूप येण्यास सुरूवात झाली. ARPA नंतर जगभरातील संगणक अभियंत्यांनी आणखी आधुनिक, जलद आणि जास्त क्षमतेच्या संदेशवहन नेटवर्क्सवर संशोधन सुरू केलंच होतं. १९७२ मध्ये संगणक अभियंता रॉबर्ट काह्न हे DARPA च्या Inoformation Processing Technology Office मध्ये रुजू झाले.

साल्ला यकु....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/10/2013 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे फेसबूकचे पान उघडले. सवईप्रमाणे आज कुठल्या कुठल्या मित्रांचे आणि मैत्रीणींचे वाढदिवस आहेत ते बघीतले. पहिलेच नांव वाचले आणि न विसरता."Happy Birth Day." लिहून मो़कळा झालो. काही माणसांचे काही-काही विचारच असे असतात की, जे चिरकाल टिकतात.हा यकू पण तसाच विचार करायचा.

अव्यक्त…

लेखक मेघनाद यांनी सोमवार, 14/10/2013 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग लिहून बरेच दिवस झाले असल्यामुळे येथे पहिल्या भागाचा दुवा येथे देत आहे. इच्छुक वाचकांनी दोन्ही भाग अनुक्रमे वाचावेत हि विनंती. --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आणि गाणं पूर्ण होत न होत तोच तो नाजूक चेहरा पुन्हा राजीवच्या डोळ्यासमोर अवतरला…आता ती सुंदरी तिच्या शुभ्र कपड्यांमध्ये तर अगदी परीवाणी भासत होती. राजीवच्या नजरेस तर आता दुसरं काही दिसतंच नव्हतं.

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 14/10/2013 00:48 या दिवशी प्रकाशित केले.

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ? (मला समजलेले गांधीजी भाग २ )

गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ? ********************************************************************************* संदर्भ स्पष्टीकरण : धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्राची दहावी आवृत्ती संदर्भ म्हणुन वापरली आहे . खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रही संदर्भाला घेतले आहे - ( खैरमोडे ३-६७) हा संदर्भ खैरमोडे लिखित चरित्रातील तिसर्या खंडातील ६ ७ वे पान असा वाचावा . बहिष्कृत भारत या पत्रातले बाबासाहेबांचे लेख उद्धृत केले आहेत त्यापुढे वर्तमान पत्राचा दिनांक दिला आहे.

शहापूर येथील गतिमंद विद्यार्थ्यांनी बनविलेले दिवाळी साहित्य

लेखक यशोधन वाळिंबे यांनी रविवार, 13/10/2013 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
. या आधी दिलेल्या ह्या उपक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचेच धन्यवाद..

शर्ट ची गोष्ट

लेखक हर्षद खुस्पे यांनी रविवार, 13/10/2013 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
मला एक लिनेन चा शर्ट चा कापड भेट म्हणुन मिळाले. देणाऱ्याने काहीतरी १५०० - २००० रु. चे कापड आहे हे सांगून, चांगल्या शिप्याकडे शिवायला टाक असा सल्लाही दिला. अर्थात असे महागडे कपडे भेट म्हणुन मिळाल्यावरच घालायला बरं वाटतं हा भाग निराळा. अर्थात मध्यमवर्गीय विचारसरणी मुळे ही असं वाटत असेल. असो, तर मी काय सांगत होतो. कापड घेऊन मित्रा ने सुचविलेल्या नारायण पेठ पुणे येथील शिंप्याकडे गेलो. गडबड असल्याने ट्रायल न घेता मस्त पैकी शर्ट शिवून आणला, ज्या कार्यक्रमासाठी शर्ट लागणार होता त्या दिवशी शर्ट घातला तर तो बऱ्यापैकी मोठा झाला.

दुबई सफरनामा - भाग 3 व 4

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 13/10/2013 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
दुबई सफरनामा - भाग 3 गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या - धौ बोटीवरील धमाल 1 अल् सलुजावरील नौकानयन मंद मंद डुलत जाणाऱ्या बोटीतून एका हातात ड्रिंक व दुसऱ्यात स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही गप्पाटप्टातून एकमेकांची ओळख करून घेत होतो. आमची दुबईची सफर खऱ्या अर्थाने सुरू झाली ती इथे. साईदत्तच्या प्रमोद शेवडेंनी काहींच्यासाठी नंतर खास नॉन वेजचे पदार्थ पेश करून आपल्या व्यावसायिक सराईतपणाची चुणूक दाखवली.

ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. आप्पा परब यांसोबत शिवनेरी किल्ल्यास भेट

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 13/10/2013 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक उत्साही मिपाकरांना हे सांगण्यावाचून मला राहवलं नाही. तरीही संपादक मंडळास या धाग्याबाबत आक्षेप नसेल अशी आशा. असल्यास क्षमस्व. नमस्कार मिपाकर, आपणापैकी अनेकास माहित असलेले/नसलेले ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. आप्पा परब, यांच्यासोबत एक दिवस शिवनेरी किल्ल्यास भेट देण्याची, व पर्यायाने इतिहासाची पानं उलगडून बघण्याची संधी मी आपणासोबत शेअर करू इच्छितो. दिनांक २७ ऑक्टोबर २०१३ रविवार रोजी या संधीचा आपण लाभ घेऊ शकता. माझ्या परिचयाचा एक तरुण दुर्गभटक्या विक्रांत जाधव ही भेट आखत आहे.