Skip to main content

दिव्यास्त्रांची मर्यादा आणि अंधश्रद्धा निर्मूलन

लेखक आनन्दा यांनी गुरुवार, 12/12/2013 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
रामायणात एक सुन्दर गोष्ट आहे. विश्वामित्रांनी दशरथाकडून राम-लक्ष्मणांना राक्षसांच्या वधासाठी मागून नेले, तेव्हा त्यांना वनात प्रथम बला-अतिबला या दोन विद्या शिकवल्या. त्यानंतर जेव्हा त्यांना दिव्यास्त्रे देण्याची वेळ आली तेव्हा काही अस्त्रे विश्वामित्रांनी दोघांना दिली आणि त्यानंतर ते म्हणाले, यानंतर काही अस्त्रे मी फक्त रामालाच देणार आहे.

आयुर्वेद मध्ये Infertility वर उपचार आहे का ?

लेखक komal.tejas यांनी गुरुवार, 12/12/2013 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा मध्ये लिहायचा माझा पहिलाच प्रयन्त आहे. मला (खरे तर आम्हाला ) माहिती पाहिजे आहे कि Infertility साठी आयुर्वेद किती फायद्याचे आहे? आमच्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. (बघून कोणाला तसे वाटणार नाही इतके तरुण आहोत अजून ;)) मुलासाठी पर्यंत चालू आहेत पण अजून यश नाही. डॉक्टर IUI आणि IVF सांगत आहेत. पण मला त्याची भीती वाटते. मला जाणून घ्यायचे आहे कि आयुर्वेद मध्ये उपचार केले तर किती वेळ लागतो? पुणे (पिंपरी चिंचवड असेल तर उत्तम) ला चांगले आयुर्वेदिक क्लिनिक आहे का? सध्या तरी इतकेच लिहते? कदाचित मला काय लिहायचे आहे ते नीट लिहिले नसेल तर समजून घ्या?

गुंतवणूक आणि गुंतागुंत

लेखक ज्ञानव यांनी गुरुवार, 12/12/2013 10:49 या दिवशी प्रकाशित केले.
कार्यशाळा संपली की एक अनुभव असा येतो की बरेच जण मला भेटून "आम्हालाही गुंतवणूक शिकवा ओ कशी करतात ती....." इथपर्यंत ठीक आहे मी म्हणतो; पण काही जण म्हणतात "टेक्निकल अन्यालीसीस शिकवा बुवा ते आलेखन (Charting ) आणि काय काय असते ते...." चला शिकवतो पण मग खात्रीने ते तुम्ही आत्मसात कराल ? आणि तुम्हाला बर्यापैकी पैसे मिळतील ? कदाचित मिळतील एखाद्याला, पण सर्वांना नक्कीच नाही. कारण ते खूप गुंतागुंतीचे किचकट क्लिष्ट असे आहे आणि त्याही पेक्षा कुठले निकष कुठे आणि कसे वापरायचे ह्याला त्यात बरेच नियम - उपनियम हि आहेत.

चांदबीबी आणि मादाम पोंपादूर : भारतीय आणि पाश्चात्त्य कलेतील भेद

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 11/12/2013 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीच्या लेखात आपण हिंदु देवादिकांच्या 'सपाट' रंगलेपन पद्धतीच्या चित्रातून हळूहळू पाश्चात्त्य पद्धतीच्या 'खोली' ‘घनता’ आणि 'छायाप्रकाश' दर्शवणार्‍या चित्रांकन पद्धतीकडे झालेली भारतीय चित्रकलेची वाटचाल, आणि त्याच सुमारास तिकडे फ्रांस मध्ये बरोबर याउलट दिशेने होणारी चित्रकलेची वाटचाल बघितली. या लेखात आता आपण पौर्वात्त्य आणि पाश्चिमात्त्य पद्धतीच्या काही चित्रांद्वारे या दोन्ही चित्रपद्धतींमधील फरक बघूया.

समलैंगिकतेला गुन्हा ठरविण्याच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णया विषयी आपले काय मत आहे ?

लेखक मारवा यांनी बुधवार, 11/12/2013 18:53 या दिवशी प्रकाशित केले.
ताज्या बातमी नुसार सुप्रीम कोर्टाने २००९ मध्ये दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात निकाल दिलेला आहे. या अनुसार आता दोन समलैंगिक व्यक्तीं मधील लैंगिक संबध हे आता कायद्यानुसार कलम ३७७ नुसार हे गुन्हा मानण्यात येतील. आणि या फ़ौजदारी गुन्ह्यानुसार अशा संबध ठेवणारया व्यक्तीला अधिकात अधिक १० वर्षांच्या शिक्षेची कायद्यात तरतुद आहे. या निकाला मुळे अनेक वर्षांपासुन आपल्या मुलभुत मानवी हक्कांसाठी लढा देणारया समलैंगिकाच्या चळवळीला जबर धक्का बसलेला आहे.

Cognitive Dissonance ची थेअरी

लेखक कुमारकौस्तुभ यांनी बुधवार, 11/12/2013 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
सानंदा चा कल्ट मानसशास्त्रज्ञ लिऑन फ़ेस्टींजर ने ही कॉग्नीटीव्ह डिसोनन्स ही थियरी विकसित केली. त्याच्या उगमाची कथा इंटरेस्टींग आहे, १९५६ मध्ये प्रकाशीत त्याच्या व्हेन प्रॉफ़ेसी फ़ेल्स या पुस्तकात ही विस्ताराने दिलेली आहे ती अशी. मारीयो कीच या लेकसीटी मिनिओपोलीस मध्ये राहणारया एका साध्या गृहीणीला अचानक एक दिवस एक मेसेज सानंदा नावाच्या देवाकडुन आला, की २१ डीसेंबर च्या मध्यरात्री अटलांटीक महासागरात प्रलय होईल आणि संपुर्ण जग त्यात बुडुन जाईल, अवघा रशिया तर एक समुद्र होऊन जाईल इ.

लाल निळ्या रंगाचा इंगा

लेखक योगविवेक यांनी बुधवार, 11/12/2013 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
लाल निळ्या रंगाचा इंगा  तंजावूरच्या तमिल विश्वविद्यालयाचा भव्य प्रांगण. ओकसर व मी तेथील मॅन्युस्क्रिप्ट डिपार्टमेंटच्या हेडना  भेटायला आम्ही जूनच्या घामफोडू गरमीत डॉ. अदियमन यांच्या ऑफिसचा शोध घेत दुसऱ्या मजल्यावर पोहोचतो; चौकटीच्या बुशकोटातील व्यक्ती म्हणते झाले, 'येस व्हाट डू यू वांट? ' कम टू मीट यू सार.. ' ओके. टेल... आम्ही काही लोक पुण्यातील इंडॉलॉजिकल विषयक अभ्यास करत आहे. काही हस्तलिखिते आम्ही मिळवली आहेत. त्याचे विश्लेषण करायला  आपल्या विश्वविद्यालयात सोय करता येईन का यावर चर्चा करायला आपण थोडा वेळ द्याल अशी आशा आहे.

दिवा आणि ती

लेखक अमेय६३७७ यांनी बुधवार, 11/12/2013 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
सजतानाही थिजलेली ती  रोज मनाचे द्वंद्व मनाशी  भिंतीवरती बापुडवाणा  दिवा एकटा जळे स्वतःशी  बोथटलेली जुनी वेदना  जशी काजळी दिसे दिव्याची जळता अवचित विझून जाणे  हीच वंचना जन्मभराची  अशा तमातुन प्रकाश कोठे  कुणी कुणाचा ना कैवारी दिवा जळो वा शील, सुखाचे    मोल सारखे त्या बाजारी  तिजला ठावे दैव स्वतःचे  आयुष्याच्या सरत्या वाती   जोवर आहे तेल वाहते  दाह सोसणे उरले हाती  -- अमेय

गूढ भाषा नयनांच्या !!

लेखक बाळअमोघ यांनी बुधवार, 11/12/2013 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ भाषा नयनांच्या मृदुल आसवे झेलीत ओंजळ हृदयी जागल्या स्वप्नांच्या .... मौनाहूनही मूक असे हृदयबिंबही तरी दिसे धुंद मनाने छेडीत जाव्या अगणित तारा देहाच्या .... गूढ भाषा नयनांच्या परी कधीतरी अश्रू ढळावे कधी ज्योतीवर पतंग जळावे मनी साचल्या कृष्णघनांतून सरी बरसाव्या दु:खाच्या .... गूढ भाषा नयनांच्या आयुष्याच्या स्वप्नंझुल्यावर शोधीत जावे आकाशी घर डोळे मिटुनी हात गुंफुनी मिठीत मिटावे सजणाच्या .... गूढ भाषा नयनांच्या