Skip to main content

दिवा आणि ती

लेखक अमेय६३७७ यांनी बुधवार, 11/12/2013 या दिवशी प्रकाशित केले.
सजतानाही थिजलेली ती  रोज मनाचे द्वंद्व मनाशी  भिंतीवरती बापुडवाणा  दिवा एकटा जळे स्वतःशी  बोथटलेली जुनी वेदना  जशी काजळी दिसे दिव्याची जळता अवचित विझून जाणे  हीच वंचना जन्मभराची  अशा तमातुन प्रकाश कोठे  कुणी कुणाचा ना कैवारी दिवा जळो वा शील, सुखाचे    मोल सारखे त्या बाजारी  तिजला ठावे दैव स्वतःचे  आयुष्याच्या सरत्या वाती   जोवर आहे तेल वाहते  दाह सोसणे उरले हाती  -- अमेय
लेखनविषय:

वाचने 2759
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

खूप सुंदर लेखन. येऊ देत अजून. अवांतरः छळ मांडलाय या माणसानं.. अरे किती भिडणारं लिहिशील? तू कविता करून मोकळा आणि आम्ही विचार करून सर्द! :)

In reply to by राघव

राघवाशी पूर्ण सहमत! @छळ मांडलाय या माणसानं.. अरे किती भिडणारं लिहिशील? तू कविता करून मोकळा आणि आम्ही विचार करून सर्द! Smile >>> तंतोतंत!

जबरदस्त! भावना थेट काळजात नेऊन भिडवतो हा माणूस. टोपी काढली आहे.

अमेयराव , सुंदर कविता लिहित आहात आपण !! अप्रतिम !!

कमी शब्दात कमाल आशय व्यक्त केलायंस!

वा!