Skip to main content

अर्थक्षेत्र भाग - २ (पहिल्या लॉस नंतरची सुरुवात )

लेखक ज्ञानव यांनी शुक्रवार, 20/12/2013 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================================== अर्थक्षेत्र भाग १ (शेअर मार्केटमधला पहिला लॉस ) =================================================================================== बापट आशेने आले होते. मला माझा पहिला ट्रेड आणि पहिला लॉस आठवला कुणा एका डीलरने मला असेच हिंदुस्तान मोटर्स मध्ये दोन दिवस प्रोफिट करून दिला आणि चटक लागल्यावर गंडवले. पण असे बरेच बापट (बापट ह्या शब्दाचा अर्थ एके काळी अर्धा असा होता.. हल्ली काय आहे माहित नाही.)मी तेव्हा पासुन आज पर्यंत पाहतो आहे.

चिर अनंत

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 20/12/2013 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा सुखे परतून न येती पानांवर जैसे दंव मोती ओघळल्या स्वप्नांचे अंती व्रण कांचेचे उरती परा शरांचे ढंग निराळे छटा उमलुनिया वावरती विमल कोवळे पराग गंधित माल्य फुलांवर लवलवती परम अलौकिक सण नियतीचे दरवळती वाटेवरती क्षणभंगुर वैभव हे पण अस्वाद कुणी घेती ना घेती पसा असू दे याचकसम आमंत्रक सदा नयन भरती आसपास चिर अनंत कोटी अमृतमय कण भिरभिरती धुंद सरोवर कुंद सभोवर शकुनांचे मेणे अवती माया ईश वराची अवघी चराचरावर ओघवती ……………… अज्ञात
काव्यरस

चीनला हवीत मुले

लेखक अमित खोजे यांनी शुक्रवार, 20/12/2013 03:36 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीपासून आपल्या देशातली घाण आणि भ्रष्टाचार याला आपली लोकसंख्या जबाबदार आहे हा विचार माझ्या डोक्यात अगदी पक्का बसला होता. नेहमी मला वाटायचे कि अमेरिकेत असते तशी स्वच्छता, टापटीपपणा, कमी भ्रष्टाचार, वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी हे सर्व आपल्याकडे का नाही तर जनसंख्या. एवढी लोकं असताना कुणाकुणाला आणि कधी शिस्त लावणार? त्यामुळे आपल्या देशात जर चीन सारखी "हम दो हमारा एक" अशी योजना जर केली तर किती बरे होईल!

नेहमीचंच !

लेखक सुहास.. यांनी शुक्रवार, 20/12/2013 01:34 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी आली की मारवाडी रेशनच्या दुकानासमोर एक पलंग टाकतो, पलंगावर एक सतरंजी, काही फळांची रिकामी झालेली लाकडी खोकी खाली-वर पायर्‍यांसारखी चढण करुन विक्रीसाठी फटाक्याची रास लावतो. संध्याकाळी सात साडे-सातच्या सुमारास लक्ष्मीपुजनाचा तो दिवस, सगळी दुनिया सजलेली असते, सजवलेली असते, सगळ्यांच्या अगांत नवीन कपडे, घरा-घरातुन फराळाचा सुगंध, कुठे धुप तर कुठे दीपमाळ, कुठे लायंटिंग तर कुठे १००० फटाक्याची लड लावलेली !! चैतन्यमय आणि प्रसन्नचित्त वातावरणामध्ये 'ती' मारवाड्याच्या दुकानापुढे उभी रहाते.

चला व्हिएतनामला ०९ : मेकाँगचा त्रिभूज प्रदेश आणि विन् त्रांग पॅगोडा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 19/12/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== चला व्हिएतनामला : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

गुन्हा ?

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 19/12/2013 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.firstpost.com/india/no-muslims-ad-in-99-acres-starts-fresh-d… वरील बातमी च्या संदर्भाने विचार करताना असा प्रश्न उद्भवला , की सगळीकडे मोहल्ले ,आहेत त्या मोहल्ल्या मध्ये इतर धर्मियांना रहाणे सोडाच ,पण एखाद्या कामासाठी आत जाणेही मुश्किल वाटते .

पोलिसांचा ढिसाळपणा

लेखक मंदार कात्रे यांनी गुरुवार, 19/12/2013 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये एका मुलीच्या विनयभंगाचा प्रयत्न झाला . गेल्या वर्षी दिल्लीत एवढे कांड होवूनही पोलिसांनी या प्रकरणात जो ढिसाळपणा दाखवला ,तो पाहता कोणाही जागरूक नागरिकाला संताप आणणारा आहे ! सन्दर्भ- http://prahaar.in/maharashtra/konkan/164988 मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणा-या एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या तरुणीने दाखवलेल्या निर्भयपणामुळे हाणून पडला. ठाणे- मत्स्यगंधा एक्स्प्रेसने प्रवास करणा-या एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न या तरुणीने दाखवलेल्या निर्भयपणामुळे हाणून पडला.

कथा :- मी जिंकलो, मी हरलो (२)

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 19/12/2013 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
कथा :- मी जिंकलो, मी हरलो (१)
अनामिका
ताईने मला अचानक का बोलावून घेतले ते समजले नाही. नाही म्हणायला भावोजींनी तिच्या आजाराची कल्पना आम्हाला दिलीच होती. मी आई बाबांबरोबर वेळ मिळेल तशी वरचे वर येत होते. पण काल मला तिने फोनवरून तातडीने बोलावून घेतले. जरा काळजीत वाटली . मी आले तेव्हा भावोजी तनयाला आणायाला शाळेत गेले होते. शेजारच्या घोलेकाकूंनी दरवाजा उघडला. " ये गं वेळेवर आलीस " " काकू, कशा आहात तुम्ही? आणि ताई कशी आहे?" " माझं बरं आहे. आताच आमचा चहा झाला, आता तू आलीयेस तर मी निघते.

श्री -भाग 2

लेखक मीता यांनी गुरुवार, 19/12/2013 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
आई रागावली कि रूम मध्ये जाऊन दार लावून बेड वर अंग टाकून द्यायचं आणि आपल्याचं डोक्यावर थापटत बसायचं ..मीता च नेहेमीचच होत हे .. अशीच एकदा रूम मध्ये असताना फोन वाजला . श्री चा तिला आलेला पहिला फोन . श्री - नमस्कार .मी श्री बोलतोय .मीता आहे का ? मीता - हो बोलतेय . श्री - मी तुम्ही काढलेलं चित्रं पाहिलं ओर्कुट वर आणि मला ते आवडलं .तुमचा फोन नंबर मिळाला समीर कडून . ते चित्र विकत घ्यायची माझी इच्छा आहे . मीता- तुम्हाला चित्र आवडलं त्याबद्दल Thanks .पण मला चित्र विकायचं नाहीये . असं म्हणून मीतानी फोन ठेवून दिला . "काय कटकट आहे ..सुखानी रडू पण देत नाही " मीता स्वतः: शी बोलली.