सामान्य ज्ञानाची छोटीशी चाचणी
सामान्य ज्ञानाची छोटीशी चाचणी
(लोक्सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर)
जितेन्द्र आव्हाड (राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष)
भास्कर जाधव (राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष)
गणेश नाइक (नवी मुंबई, मंत्री)
विनायक मेटे ( राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष)
संजय निरुपम (खासदार)
छगन भुजबळ (सार्वजनिक बांधकाम, गृह अशी खाती सांभाळलेले मंत्री)
विनायक निम्हण(आमदार, पुणे)
आणि
नारायण राणे(मंत्री)
या सर्वांमधे एक समान धागा आहे, कोणता ते ओळखा
व्य. नि. करा
कल्की
कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे
असे म्हटले जाते की
कलियुगा मध्ये अशी
वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी
कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल
तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील.
डॉक्टर झाकीर नाईक …
तु नळीवर बरेच विडीयो उपलब्ध असतात. असेच काही विडीयो पाहत असताना ह्या महाशयांचे काही समुपदेश प्रकारचे विडीयो पहाण्यात आले.
त्यातील काही विडीयो इथे डकवत आहे.
सल्ला – एक अगत्याचे घेणेदेणे
मला याची जाणीव नव्हती, पण माझ्या आसपासचा आसमंत अतिशय कनवाळू, विद्वत्तापूर्ण, अभ्यासपूर्ण अन सदैव पर-मदतीस तत्पर अशा सज्जन सल्लागारांनी प्रथमपासून परिपूर्ण असत आला आहे. ‘पर-मदत’ अशासाठी, की यांना स्वत:ला अनादी अनंत काळापासून कोणत्याच मदतीची कधी गरज पडली नसावी, अशी शंका येण्याइतपत स्वयंसिद्ध स्वयंपूर्ण असे हे महाभाग होत. पुन्हा, हे विद्वान लोक सर्वव्यापी होत. याचा पुरावा म्हणजे वर्तमानपत्रे अन मासिके यातून झालेला ‘ताईचा सल्ला ’, ‘माईचा सल्ला’, ‘काकांचा सल्ला’, इत्यादिंचा झालेला बोलबाला !
तसे तर आयुष्यात असंख्य प्रसंगी या सल्लावंतांनी मला तारून नेले आहे.
स्विकार...
तुझे मुलायम मउ दोन्ही हात
आजही ह्रुदयापाशी घट्ट कवटाळुन ठेवले आहेत मी..
कधी कधी प्रचंड एकटं वाटल्यावर
शोधुन काढतो अडगळीत गेलेल्या फाइल सारखं...काही क्षण!
माहित असतं नंतर ..
पुन्हा तोच एकाकीपणा मला
छळायला येणार आहे...
आणि पुन्हा काही काळ त्याचा हिशेब चुकता झाल्यावर.... पुन्हा तुझ्या हातांची..त्यामागल्या स्पर्शांची वेडी हुरहुर!
कधी कधी मला प्रश्न पडतो... मानवी मन... नाते ... संबंध... त्यातील व्यवहार... हे सर्व या दोन टोकांच्या मधल्या ताटातुटीवर बेतलेले आहे का गं?
मग येते काही क्षणांची विमनस्कता... त्यावरची काही उत्तरं...
काव्यरस
(कश्या कश्याला मुकलो ते...)
आठ दिवसांनी गावावरुन मुंबईला आल्यावर चाळीतल्या संडासाकडे गेलो..
समोर लोकांची रांग, मुठीत नाक धरुन.
हाती पाण्याने भरलेला डबा.
आपला नंबर येण्यासाठी आतूर डोळे
कुणालाच आत जाऊन मोकळे होण्याशिवाय काहिच सुचत नव्हते..
माझा नंबर आल्यावर आतून भींती पाहील्या अन उमगले,
कश्या कश्याला मुकलो ते...
काव्यरस
नाचणीचे झटपट डोसे
आंतरराष्ट्रीय भाषा दिनाच्या निमीत्ताने एकुश्येचे मनोगत
एकुश्ये म्हणजे बंगाली भाषेत २१.
"घर गृहस्थी"
घर गृहस्थी
हि मी मुंबईच्या अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयात काम करत असतानाची गोष्ट आहे. मी तेथे नौसैनिकांच्या कुटुंबियांच्या वार्ड चा प्रमुख होतो. एक दिवस एक १०४ ए डी( एयर डिफेन्स) रेजिमेंट या कालिन्याला असलेल्या लष्कराच्या रेजिमेंट मधून एक शिपाई आपल्या बायकोला भरती करण्यासाठी घेऊन आला.( या रेजिमेंट मध्ये विमानविरोधी तोफा आहेत आणि मुंबई विमानतळाचे हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्या कडे असते.
त्याचे नाव राजबीर सिंह आणि बायकोचे नाव (बहुधा) राजकुंवर (वय २२-२३ असावे) होते. हे राजस्थानातील झुनझुनू गावचे होते.
मिसळपाव
