Skip to main content

ना केले

लेखक वैभवकुमारन यांनी शनिवार, 21/06/2014 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
कीती पाप केले, कीती पुण्य केले कोणा हास्य दिले , कुणा शून्य केले जरी जींकता मी हा डाव रडीचा कधी हारण्याचे मी प्रयत्न ना केले असा पोरका मी , जरी पोरका मी मी तेव्हां त्या मातेला धन्य ना केले जेव्हां सोडला तीक्ष्ण शब्दांचा मारा तेव्हां भावनांचे मी काव्य ना केले जरी चुकला कोणी दाही दिशांना तरी वाटाड्याचे मी काम ना केले दिल्या देवाने सुख सुमनांच्या माळा तरी मुखी नाम मी 'राम' ना केले

उत्तर सापडेना आज?

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 21/06/2014 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
(अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि त्यांची निर्घुण हत्या होते. अश्या घटना देशात घटत आहेत. मग दिल्ली असो किंवा बदायूँ. प्रश्न अनेक आहेत पण उत्तर सापडत नाही. कुठे चूक झाली आमच्या पिढीच्या हातून कि आजची तरुण पिढी वासनेच्या आहारी जात आहे) कुणी पायदळी तुटवली एक नाजूक कळी आज? मध्यान्हन उन्हाळी पसरली का स्मशान शांतता आज? ममतेचा कोखात निपजली का रक्त पिशाचे आज? माय बहिण भार्या नाती का निरर्थक झाली आज? वासनेच्या डोहात तरंगती का नव तरुणाई आज? काय जाहली चूक आमची उत्तर सापडेना आज?
काव्यरस

मनमोहक बाली : ०३ : 'पुरा बेसाकी', अगुंग पर्वतावर वसलेली बालीतील मंदिरांची माता

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 20/06/2014 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== मनमोहक बाली : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७...

चांदोबाचा दिवा- (बालकविता)

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 20/06/2014 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
' आई ग आई , चांदोबाचा दिवा किती चांगला - उंच उंच आकाशात कुणी टांगला .. आई ग आई , चांदण्यांच्या पणत्या किती चांगल्या - उंच उंच आकाशात कुणी लावल्या .. आई ग आई , दे ग शिडी मला उंच उंच चढून - चांदोबा-चांदण्या आणीन मी काढून .. आई ग आई , चांदोबा-चांदण्या ठेऊन अंगणात - रात्री छान खेळेन त्यांच्या प्रकाशात .. .
काव्यरस

श्रीरंग जोशी यांच्यासोबत पुणे कट्टा- रविवार दि. २२ जून

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 20/06/2014 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर श्रीरंग जोशी नुकतेच पुण्यात आले आहेत. त्यांना आपल्या सर्वांना भेटायची इच्छा आहे. आताच त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार हा जाहीर धागा टाकत आहे. कट्ट्याची ढोबळमानाने रूपरेषा पुढीलप्रमाणे राहील. कट्ट्याची वेळ: रविवार दि. २२ जून २०१४. दुपारी चार वाजता. ठिकाण: शनिवारवाडा ज्यांना शक्य होईल त्यांनी दुपारी ४ वाजता शनिवारवाड्यापाशी जमावे.

तांत्रिक मत"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 20/06/2014 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे सहा हजार वर्षापुर्वि एक मत भारतात उदयास आले होते..ज्याचे नाव " तांत्रिक मत" ह्या मताचा उदय बंगाल मधे झाला व त्याचा विस्तार बर्मा.तिबेट चिन पर्यंत होत गेला.. पुढे या विचाराचे अनेक ग्रुप्स झाली..व मतमतांतरे वाढत गेली समाज सुधारकानी पण या तान्त्रिंक मतावर तुफान हल्ले चढवले व आज हे मत..

अविस्मरणीय ग्रीस - भाग १ - अथेन्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 20/06/2014 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
अविस्मरणीय ग्रीस प्रस्तावना सकाळी लवकर उठून , मस्तं नाश्ता करून आम्ही नऊला हॉटेलमधून बाहेर पडलो. थेट टॅक्सी करून आम्ही अ‍ॅक्रोपोलीसला गेलो. तिथे पोहोचताच आम्हाला दुरूनच Parthenonचे दर्शन झाले. भराभर थोडे वर चढून तिकिट काढायला गेलो , तिथे थोडी रांग होतीच शिवाय नऊनंतर अनेक पर्यटक बसमधून Parthenon बघायला मोठ्या प्रमाणात येतात त्यामुळे गर्दी होतेच. पटापटा तिकिटं काढून आम्ही वर चढायला सुरुवात केली, वातावरण मध्येच ऊन मध्येच ढगाळ असे होते त्यामुळे पाऊस येतो की काय असे उगाच वाटून गेले.

'कुणी घर देता का घर' - नटसम्राटाचा टाहो

लेखक जीएस यांनी शुक्रवार, 20/06/2014 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या विविधरंगी नाट्यप्रयोगांनी गेली दोन वर्षे जनतेचे अथक मनोरंजन करणार्‍या नटसम्राटाने अखेर 'कुणी घर देता का घर' असा आर्त टाहो फोडला आहे.

जडण-घडण...2

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 20/06/2014 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेतले दिवस, मित्रमंडळी, अभ्यास, स्पर्धा सगळंच मस्त होतं. प्रत्येक वर्षी वर्गशिक्षक आणि विषयानुरूप शिक्षक बदलत असले तरी सगळेच शिक्षक ओळखीचे होते. त्यामुळे पुढच्या वर्गात मित्रमंडळीही तीच आणि शिक्षकही ओळखीचे. अगदी खरं सांगायचं तर पहिली ते सातवी इयत्तेची सात वर्षं वेगवेगळी आठवतंच नाहीत, मोठ्ठच मोठ्ठं लांबलचक एकच वर्षं असावं ते, असंच वाटतं. तसंच आठवतं... शाळा, परीक्षा आणि परीक्षेनंतरची सुट्टी. मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलं की गोंधळात टाकणारा पहिला अनुभव म्हणजे, अरेच्चा, सुट्टी इतक्यात कशी संपली? थांबा, थांबा. थोडं उलगडून सांगते. माझं गाव कोकणात. मुंबईहून गावी पोहोचायला किमान 12 तास लागायचे.

अखेर

लेखक आतिवास यांनी शुक्रवार, 20/06/2014 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी तिला पाहते तेव्हा सकाळचे नऊ वाजले आहेत. अर्थात लाकडाची मोळी डोक्यावर वाहताना तिचा चेहरा खाली झुकला आहे त्यामुळे मला तो दिसत नाही. stree तिची आणि माझी ओळख नाही आणि मी तिच्याशी बोलत नाही, त्यामुळे ती ओळख होतही नाही. स्वत:च्या कामात मग्न असणा-या त्या अनोळखी स्त्रीचा फोटो काढणं खरं तर योग्य नाही, ते एका अर्थी तिच्या खासगीपणावर आक्रमण आहे याची मला जाणीव आहे. पण तरीही मी हा फोटो काढते.