कविता समजुन घेतांना- भाग १
वाचनाचं वेड असल्याने आणि कविता हा प्रकार प्रचंड आवडता असल्याने अधाशासारखा मिळेल ती कविता वाचत सुटायचो. कधी फ़ार च सुंदर तर कधी फ़ार च टुकार कविता भेटायच्या. पण सुंदर ग्रेट कविता असा काही अनोखा आनंद देतात की ज्याची काही तुलनाच करु शकत नाही. याच नादातुन समीक्षा ही वाचु लागलो मग मात्र थोडा मुळ कविता वाचनाचा आनंद डीस्टर्ब झाला. विनाकारण एक नेणीवेच्या पातळीवर इव्हॅल्युएशन व्हायला सुरुवात झाली. मग कन्फ़्युज झालो मग थोडी चिडचीड ही होउ लागली. ती अशी की अरेच्च्या इतकी सुंदर कविता होती यावर विचार करण टाळुन नुसती फ़ीलींग लेव्हल वर च रेंगाळु दिली असती तर कीती छान झाल असत.
मिसळपाव