मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रस्त्यावर वाहन चालविणारे

विवेकपटाईत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
त्या दिवशी सुनीलला भेटायला त्याच्या घरी गेलो. बिछान्यावर पडलेला होता. डाव्या पायाच्या मांडीत लोखंडी रॉड टाकलेली होती. त्याला विचारले, कसं झाले हे सर्व. तो म्हणाला, तुझ्या सारख्या नियम पाळणाऱ्या एका मूर्ख माणसामुळे ही पाळी आली. मी म्हणालो, साला स्पष्ट बोल कि काय म्हणायचं आहे ते. उगाच माझ्या डोक्यावर खापर नको फोडू? तुला माहितच आहे, बाईक चालविताना मी ट्रफिकचे कुठलेच नियम-कायदे पाळत नाही. किक मारल्या बरोबर बाईक हवेत उडाली पाहिजे तरच चालविण्यात मजा. त्या रात्री घरी परतताना असेच हवेत उडत जात होतो. एका ट्रफिक सिग्नल वर लाल बत्ती होती. नेहमीप्रमाणे पर्वा केली नाही. दुसर्या बाजूने येणाऱ्या बाईक ने चक्क मिठी मारली. कदाचित त्या गाढवाला दिल्लीत बाईक कशी चालवावी हे कळत नसावे. अरे हिरवा दिवा झाला तरी काय झाले, सुसाट वेगाने जाणार्या बाईकला रस्ता दिला पाहिजे, एवढे तरी त्याला माहित असायला पाहिजे. त्यानी ब्रेक मारायला पाहिजे होता. आता भोगत असेल आपल्या कर्मांचे फळ म्हणत तो जोरात हसला. आपल्या कष्टापेक्षा दुसर्याचे कष्ट पाहून हसणारा असा हा औलिया. या माणसाला काय म्हणावे मलाच कळेनासे झाले. रस्त्यावर वाहन चालकांच्या तीन श्रेणी आहेत. पहिल्या श्रेणीतले वाहन चालक ट्रफिकच्या सर्व नियमांचे पालन करतात. रस्ता रिकामा असला तरी कधी चुकूनही लाल बत्ती क्रास करीत नाही. पोहचायला उशीर झाला तरी त्यांना चालते. समर्थांच्या अखंड सावधान असावे या उक्तीवर त्यांचा विश्वास असतो. स्वत:च्या चुकीने असे वाहन चालक क्वचितच दुर्घटना ग्रस्त होतात. बाकींना सुनील सारख्या वाहन चालकांच्या कर्माचे फळे भोगावे लागतात. दुसर्या श्रेणीतल्या वाहन चालकांच्या मनात कायदा, कानून नियम यांची भीती असते. पण गंतव्य स्थळी लवकर पोहचण्या करता संधी साधून ट्रफिक नियमांची उपेक्षा करतात. कुणी पाहत नाही पाहून लाल बत्ती क्रास करतात. कधी ट्रफिक पोलीस वाल्याने अडविले तर काय द्या वर त्यांचा विश्वास असतो. देवावर सव्वा रुपया टाकला कि देव क्षमा करतोच. गांधी छाप कागद पोलिसांच्या हातावर ठेऊन सुटका करण्याच्या प्रयत्न करतात. मुंबईचे ट्रफिक पोलीस या बाबतीत इमानदार असतील, पण दिल्ली ट्रफिक पोलीसवाले नोट ही खिशात टाकतात आणि घरी चालान ही पाठवून देतात. नमकहराम कुठले. त्याना पाहून लोकांना गुंडाळणाऱ्या बंगाली बाबांची आठवन येतेच. तिसर्या श्रेणीचे वाहन चालक सुनील सारखे असतात. त्यांच्या मते नियम, कायदे- कानून यांचे पालन करणारे लोक मूर्ख/ मागासलेले असतात. ट्रफिक पोलीसला पाहून शक्यता बाईक थांविणार नाही आणि कधी थांबवावी लागली तर लगेच उगाच हुज्जत (भांडण) घालायला सुरवात करतील. त्यांच्या वर विना कारण शरीफ (?) लोकांना त्रास देण्याचा आरोप करतील. शिकायत करण्याची धमकी देतील किंवा तो मी नव्हेच असे दाखवतील. त्रासून ट्रफिक पोलीसवाला अधिकांश वेळी चालान न कापता त्यांना सोडून देतो. रस्त्यावर वाहन कसे चालवावे हा ज्याच्या-त्याच्या व्यक्तिगत प्रश्न आहे. फक्त एकच बाब विचार करण्याची आहे, आपल्याला गंतव्य स्थळी सुरक्षित पोहोचायचं आहे का? स्वामी त्रिकाळदर्शी म्हणतात ज्याला या कथेचा अर्थ समजेल तो आयुष्यात कधीच दुर्घटनेचा शिकार होणार नाही.

वाचने 8300 वाचनखूण प्रतिक्रिया 40

नरेन 06/09/2014 - 14:38
आजकाल तर तिसर्या श्रेणी मधील वाहन चालक च जास्त आहेत सगळी कडे. त्याना तसे करण्यातच धन्यता वाटते मग दुसर्याच्या जीवाची पर्वा कोण करतो.

In reply to by प्रभाकर पेठकर

मराठी_माणूस 06/09/2014 - 17:49
सर्व जबाबदारी पोलीसा वर टाकणे चुकीचे. जिथे पोलीस नसेल तिथे अपघात होणार असे गृहीत धरायचे का ? स्वतः कसलीच शिस्त पाळायची नाही का?

In reply to by मराठी_माणूस

एस 06/09/2014 - 18:51
पण निदान भारतात तरी जिथे सविनय कायदेभंगापासून आपण बेधडक कायदेभंगापर्यंत प्रगती केली आहे तिथे तरी कोणी पकडत नाहीच आणि पकडले तरी शिक्षा होत नाही किंवा शिक्षेपासून भ्रष्टाचाराच्या मार्गाने सुटता येते अशी परिस्थिती आहे तिथे अशा गुंड मनोवृत्तीला पोलिसी खाक्याचा धाक थोडातरी आवश्यकच आहे. विचार करून पहा. तुम्ही सिग्नल बिनदिक्कतपणे तोडता आहात. बाकीचेपण तोडत आहेत. पण सीसीटीव्ही कॅमेर्‍यात तुमचा नियमभंग कैद होतोय आणि असा सिग्नल तोडलेल्या प्रत्येकाला कोर्टाची नोटिस येऊ लागलीय. कुठलीही तडजोड न करता थेट एक महिना कैद. पहा, एकाच आठवड्यात ट्रॅफिकचा चेहरामोहरा बदलेल.

In reply to by एस

विजुभाऊ 08/09/2014 - 09:41
कुठलीही तडजोड न करता थेट एक महिना कैद.
बापरे असे झाले तर सगळ्या पुण्याला किमान एक आठवडाभर जेलभरून ओसंडून वाहू लागतील

In reply to by मराठी_माणूस

मराठी-माणूस साहेब, >>>>स्वतः कसलीच शिस्त पाळायची नाही का? ते होत नाही म्हणून तर पोलीसांची गरज भासते. रहदारीचे नियम सर्वजण तंतोतंत पाळायला लागले तर ट्रॅफिक पोलीसांची गरजच भासणार नाही. पोलीस आपले कर्तव्य योग्यप्रकारे बजावत नसतील तर गुंड तर सोडाच सर्वसामान्यांनाही एक थ्रिल म्हणून नियम मोडायचा मोह होतो. आणि पोलीस कडक कायदे अमलात आणतील तर सर्वसामान्य सोडाच गुंडांनाही धाडस होणार नाही नियम तोडायचा.

मुद्दा पटला. "चुकीच्या /फसलेल्या कृतीचा परिणाम प्रामाणिकपणे स्विकारुन त्यात दुरुस्ती करण्याऐवजी त्याचा दोष दुसर्‍या माणसावर ढकलणे किंवा एखाद्या भ्रामक वचनामागे लपवणे" ही एक मोठी समस्या वैयक्तीक आणि सामाजिक समस्या आहे. या बाबतीत पूर्ण सहमती आहे म्ह्णूनच इथे आश्चर्य वाटले होते.

कतार मध्ये, वाहतूकीचे नियम फार कडक आहेत, दंड इतका जबरदस्त आहे की, कतारी माणसाला पण परवडत नाही.असे दोन युरोपियनांकडून ऐकून आहे. आपला सांगोवांगीवर जास्त विश्र्वास नसल्याने, कतारी मिपाकरच प्रकाश टाकू शकतात.

In reply to by मुक्त विहारि

मस्कत मध्ये हल्लीच जवळ जवळ सर्व मुख्य रहदारी नियंत्रकांवर (सिग्नल्सवर) छायाचित्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे. लाल दिवा ओलांडला तर आपोआप फोटो काढला जातो. वेग मर्यादा ओलांडली तरी फोटो काढला जातो. तुमच्या वाहन क्रमांका पुढे हे गुन्हे नोंदले जातात तसेच तुमच्या वाहन चालविण्याच्या परवान्याच्या (ड्रायव्हिंग लायसन्स) समोरही ह्या गुन्ह्यांची नोंद होते. पैसे भरून वाहनतळाचा उपयोग करावा लागतो. अन्यथा, तिथेही फिरता नगरपालीकाकर्मी तुमच्या नांवाने चलान फाडतो. तो दंड नगरपालीकेत ३० दिवसांच्या आत नाही भरल्यास वाहन पंजीकरण केंद्रात (व्हेहिकल रजिस्ट्रेशन कार्यालयात) त्याची नोंद होते. दरवर्षी पंजीकरण नुतनीकरणासाठी (रजिस्ट्रेशन रिन्यूवल) तिथे जावे लागते. तेंव्हा हे सर्व जमा झालेले दंड भरल्याखेरीज पुढील कसलीच कार्यवाही (जसे वाहन पंजीकरण नुतनीकरण, वाहनचालविण्याच्या परवान्याचे नुतनीकरण, वाहन मालकी बदल) होत नाही. ऐकीव माहितीनुसार, रहदारीचा लाल दिवा ओलांडल्यास पोलीसांच्या कार्यालयात त्याची नोंद होऊन ३ दिवस लॉकअप मध्ये बसावे लागते. पोलीसांचा तुम्हाला फोन येतो. 'अमुक दिवशी अमुक ठिकाणी तुम्ही रहदारीचा लाल दिवा ओलांडल्याचा गुन्हा केला आहे. शिक्षा म्हणून तुम्हाला ३ दिवस लॉकअप मध्ये बसायचे आहे. ह्या आठवड्यात तुम्हाला कधी सवड आहे?' असा फोन आला तर जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा लागतो. अजून प्रत्यक्ष शिक्षा भोगलेला कोणी ओळखिचा भेटलेला नाही त्यामुळे शहानिशा करता येत नाहिये. पण दिवा लाल असताना रहदारी नियंत्रकांना ओलांडणार्‍या वाहन चालकांमध्ये लक्षणिय घट अनुभवास येते आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

व!! मस्स्त्त मराठी शब्द वापरलेत हो तुम्ही 'वाहन पंजीकरण नुतनीकरण, वाहनचालविण्याच्या परवान्याचे नुतनीकरण, वाहन मालकी बदल'...मला जाम आठवेनात टाईप करतांना.

In reply to by माझीही शॅम्पेन

माझ्या माहितीनुसार पंजीकरण = रजिस्ट्रेशन, पंजीकृत = रजिस्टर्ड नूतनीकरण = रिन्यूवल. कांही चुकत असेल तर सांगावं. ज्ञानात योग्य तो बदल करण्यास नेहमीच तयार आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

तुमचे अर्थ बरोबर आहे पण ते हिंदी शब्द आहेत अस वाटताय registration = नोंदणी registered = नोंदणीकृत registration renewal = नोंदणी नुतनीकरण चू भू दे घे

In reply to by माझीही शॅम्पेन

'पंजीकरण' हा शब्द तर मी महाराष्ट्रात, मुंबई महानगरपालिका कार्यालयातील एका पाटीवर पाहिला आहे. तिथे आग्रहपूर्वक मराठी शब्द वापरतात. असो. ह्या शब्दाची अधिक माहिती मिळवीन. हा शब्द नक्की मराठी आहे की हिन्दी हे पाहावे लागेल.

In reply to by माझीही शॅम्पेन

registration = नोंदणी registered = नोंदणीकृत registration renewal = नोंदणी नुतनीकरण हे तिन्ही शब्द स्विकारार्ह आहेतच हे सांगायचे राहून गेले.

In reply to by मुक्त विहारि

कतार मधे २००९ पर्यंत वाहतुकीचे नियम होते पण अति-कडक नव्हते. झाडून सगळ्या सिग्नल्स वर कॅमेरे बसवलेले नव्हते. त्यामुळे सिग्नल विरहीत कॅमेरे लोकांना चांगले माहित असायचे. सिग्नल लाल होणार असा अंदाज आला की उरलेले लोक सुसाट वेगाने गाड्या पळवायचे. विशेषतः ईजिप्शीअनांच्या या सवयीवर बरेच जोक्स ही प्रचलीत होते. पण नंतर असलेल्या कायद्यांमधे प्रचंड सुधारणा झाली. ट्रॅफिक वायोलेशन चे दंड भरमसाठ वाढले. पॉईंट सिस्टीम आली. लायसेन्स रद्द होण्याची भिती वाढली. नियम तोडणारे पकडण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे यंत्रणा आली. कॅमेर असले खतरनाक आहेत की त्यांनी टिपलेल्या छबीवर कसलाही वाद घालण्याची सोयच नाहिये. तोडलेल्या नियमांची सुचना ४-१२ तासात फोनवर दिसू लागली. दरवर्षी वाहनाचे इन्सपेक्शन आणि रेजिस्ट्रेशन अनिवार्य झाले.आणि अश्या चुकार लोकांचे धाबे दणाणले. पुर्विचे दंड आणि आत्तच्या दंड रकमांची थोडी झलक, कतारी रीयाल आणि रु. मधे. लाय्सन्स रिन्यु ना करणे पुर्वी ५०० आत्ता १५००, रु.मधे सुमारे २५०००/- चुकीचे पार्किंग पुर्वी २०० आत्ता ५००, रु.मधे सुमारे ९००० लेनची शिस्त न पाळणे पुर्वी २०० आत्ता ५००, रु. मधे सुमारे ९००० नो एंट्री मधे गाडी घुसविणे पुर्वी १००० आत्ता ६०००, रु.मधे सुमारे १,००,००० जड वाहन स्र्वात उजविकडे ना ठेवणे आता ३०००, रु.मधे सुमारे ५०,००० लाल दिवा तोडणे पुर्वी १००० आत्ता ६०००, र.मधे सुमारे १,००,००० साहजिकच हे भरमसाठ दंड आता कतारी लोकांनाही परवडत नाहित. शिवाय जितके तोडलेले नियम जास्त तितके पॉईंट्स पण मिळतात आणि लायसन्स रद्द होण्याचा धोका पण वाढतो. कडक नियम आणि त्या नियमांची तितकीच कडक अमंलबजावणी यामुळे सगळेच सुतासारखे सरळ आलेत. अर्थात सगळं काही स्वर्गिय नाहिये पण वाहतुकीमधे कमालीची सुधारणा झालिय.

In reply to by स्वप्नांची राणी

उफ्फ्फ...मस्कत मध्ये एव्हढे भरमसाठ दंड नाहित हे आमचे नशिब म्हणायचे. पण ३३ वर्षात २-३ पेक्षा जास्त वेळा दंड भरायची वेळ आली नाही. (भविष्यातही येऊ नये एव्हढी काळजी घेईनच.)

दशानन 07/09/2014 - 01:12
पोलिसांच्या नावे खडे फोडणारे हलकट व निर्लज्ज असतात. अश्याच मूर्खाच्या कारणीमुळे आयुष्यातील अनमोल असे माझे काही दिवस वाया गेले आहेत.

विवेकपटाईत 07/09/2014 - 11:14
या लेखात स्वामी त्रिकाळदर्शी आहे,थोड वेगळा विचार पण करा प्रथम श्रेणीतले वाहन चालक = श्रद्धावान लोक नियम कायदे कानून सामाजिक मर्यादा पाळणारे, देवावर विश्वास ठेवणारे. दुसर्या श्रेणीतले वाहन चालक = धर्मभीरु पण पुढे जाण्याच्या नादात नियम कायदे पाळत नाही. पुढे जाण्यासाठी कर्माएवजी (व्यवस्थित गाडी चालविणे) देवाला रिश्वत देऊन खुश करणारे, तंत्र मंत्र, जादूटोणा वर विश्वास ठेवणारे. अश्या लोकांचे कर्म वाया जाते आणि दंड तर भोगावाच लागतो. तिसरी श्रेणी = कुठलेही नियम कायदे न मानणारे नास्तिक किंवा xxxxx.

In reply to by विवेकपटाईत

एस 07/09/2014 - 21:10
कुठलेही नियम कायदे न मानणारे नास्तिक किंवा xxxxx.
नास्तिकांची अशा पद्धतीने केलेली भलामण आणि गुन्हेगारांच्या रांगेत बसवण्याचा खटाटोप अयोग्य आणि अस्थानी आहे असे म्हणून मी आपला सौम्य निषेध नोंदवू इच्छितो.

In reply to by माम्लेदारचा पन्खा

असंका 08/09/2014 - 01:27
सरसकटीकरण का कायसं म्हणतात ते हेच का? रच्याकने, ती स्व्यंशिस्त कितीच्या गाडीने येत आहे?

In reply to by असंका

भिंगरी 09/09/2014 - 23:17
स्व्यंशिस्त कितीच्य गाडीने येणार ते म।हीत नाही,पण कोणती गाडी ते माहीत आहे. गुजराथ एक्सप्रेस व्हाया दिल्ली..........

In reply to by माम्लेदारचा पन्खा

ज्या देशांत लोक नियम पाळतात ते त्यांच्या शिस्तीवर असलेल्या प्रेमामुळे / आदरामुळे आणि नियमभंग पकडून शिक्षा होईल याची खात्री असते या दोन्हीमुळे ! एखाद्या जागेवर शिस्तीचे पारडे वरचढ की शिक्षेचे हे "व्यक्तीगत माणसावर" आणि "त्या देशातील कायदा-सुव्यस्थेची स्थिती किती सबळ आहे यावर" अबलंबून आहे. उदा: भारतात दर कोपर्‍यात पिचकार्‍या मारणारा माणूस सिंगापूरच्या चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळवर उतरण्याअगोदरपासून चॉकलेटचे वेस्टनही चुकून हातातून खाली पडू नये याची काळजी घेतो. मुळातच शिस्तीचा भोक्ता असलेल्या एका जर्मन माणसाच्या तोंडून "हाच मानसिक दबाव त्याच्यावर येतो" असे मी ऐकले आहे ! दुसरे महायुद्ध संपले तेव्हा सिंगापूर एक कोळी लोकांचे गाव होते. तिथल्या लोकांना त्यांच्या पहिल्या राष्ट्रपतीने (ली क्वान यू) ही शिस्त कायद्याचा कडक बडगा उगारूनच शिकवलेली आहे. याच कडक शिस्तीत गेले काही दशके वाढलेले असल्यामुळे ती शिस्त बहुसंख्यांच्या स्वभावाचा भाग झाला आहे आणि उरलेले इतर जण दंडाच्या मोठ्या रकमेच्या धसक्याने ती पाळतात !

In reply to by माम्लेदारचा पन्खा

विवेकपटाईत 09/09/2014 - 10:35
सिंगापूर येथे काचर्या फेकनार्याला २०० डालरचा दंड पडतो. सुरवातीला शिक्षा पाहिजेच नंतरच सवय होते. तिथे भारतीय ही कचरा फेकत नाही किंवा थुंकत नाही.

वेल्लाभट 08/09/2014 - 14:54
आपण आपलं काम करत रहायचं. नियम पाळायचे, दुस-यांना पाळायला सांगायचे, नाहीच पाळले तर नको पाळूदेत. ज्याचे त्याला ! हा नियम लक्षात ठेवायचा. बाकी नियमांचं म्हणाल तर ९९% लोकांना घंट्टा पडलेली नसते नियमांची. किंबहुना, ते मोडण्यातच धन्यता असते. मग येतं असं अंगाशी. हा तुमचा मित्र जो असं म्हणत होता, की आपण पाळतच नाही नि अमूक तमूक... त्याला चार शिव्या घालण्याचं तुमचं कर्तव्य होतं. ते तुम्ही करूनही त्याने असंच केलं असेल तर, पुन्हा ज्याचे त्याला. पण ते नसाल केलं तर अजूनही वेळ गेलेली नाही. मित्राला नाही तर काय ति-हाईताला जाऊन सांगणार? पण एक मात्र खरं. ते अमेरिकेचं युरोपाचं सांगू नका. तिथल्यासारखं इथे होणंं केवळ अशक्य आहे. ही काळ्या डोंगरावरची पांढरी पायवाट आहे. ती आशा सोडा. त्याच्या ५०% जरी शिस्त आली तरी भरून पावेल भारतमाता. इंडियन मेंटॅलिटी ! रिडिक्युलसली रिडिक्युलस.

मदनबाण 08/09/2014 - 17:26
ह्म्म्म... हल्ली १० सेकंदाचा इंडिकेटर दिसला की वाहने जायला सुरु होतात, सगळेच नियम तोडतात... अगदी एसटी आणि परिवाहन निगमच्या गाड्या देखील. बाकी सिग्नल हा तोडण्यासाठीच असतो असे सर्व सिग्नलांवरच लिहुन ठेवावे असे मला वाटायला लागले आहे. अनेकवेळा मी मागचा सांड गाडीवाला पॅपॅपॅ करत असला तरी थांबुन असायचो, पण हल्ली धीर सुटायला लागला आहेत. सिग्नल मोडलेला परवडला पण हे पॅपॅपॅ नको असे वाटायला लागले आहे. :(

मदनबाण.....

आत्ताची स्वाक्षरी :- दिल ये जिद्दी है... :) Mary Kom

In reply to by मदनबाण

>>>>सिग्नल मोडलेला परवडला पण हे पॅपॅपॅ नको असे वाटायला लागले आहे. मी हलत नाही. खिडकीची काच खाली करून मागच्याला 'डोक्यावरून उडत जा' अशी खुण करतो. तसेच, माझ्याकडे मो़कळा वेळ असेल तर गाडी बंद करून खाली उतरतो आणि त्याच्याकडे जाऊन 'गाडी बंद पडली आहे, जरा धक्का मारणार का?' अशी विचारणा करतो. त्याने गाडी माझ्या गाडीच्या बरीच जवळ घेतलेली असल्याने आणि मागच्या गाड्या त्याला चिकटलेल्या असल्याने तो जाऊ शकत नाही. आणि एक सिग्नल फुकट गेल्यावर मी माझ्या गाडीत जाऊन बसतो. तो हॉर्न वाजवत नाही. दुसर्‍या सिग्नलच्या वेळी माझी बंद पडलेली गाडी चालू होते आणि मी सावकाश निघून जातो.

In reply to by प्रभाकर पेठकर

मदनबाण 09/09/2014 - 09:46
खिडकीची काच खाली करून मागच्याला 'डोक्यावरून उडत जा' अशी खुण करतो. हॅहॅहॅ... अगदी अगदी मी देखील असेच करतो. पण दुचाकी स्वार असल्याने मागचा सांड कारवाला सिग्नल सुटल्यावर रागाने कधी तरी "कट" मारतो असा अनुभव असल्याने भ्या वाटते इतकेच !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

In reply to by मदनबाण

आयला, नवेच कांही ऐकतो आहे. कारवाल्यासाठी, दुचाकी स्वारासारखी डोकेदुखी नाही. कसाही नियम तोडा, कसेही चारचाकीवाल्याला छळा, अगदी वाटल्यास आय-माय काढून शिव्या द्या आणि भरगच्च रहदारीत गायब व्हा. (हं! मोकळ्या रस्त्यावर, रात्रीच्यावेळी असा प्रयोग करू नये.)

काळा पहाड 08/09/2014 - 19:27
आपण तसेही बहुसंख्य बाबतीत तळाशीच आहोत. बाकी काही दिवसांनी आपली तुलना सोमालिया आणि नायजेरिया या देशांबरोबरच आहे. राजकारण्यांना व त्यांना बहुमतानं निवडून देणार्‍या जनतेला आपण तळाशी असलं तरी काय फरक पडतो? चोर राजा आणि अडाणी प्रजा. इतकी मोठी लोकसंख्या असताना व त्यातल्या बहुसंख्य लोकांना शिस्तीबद्दल काही पडलेलं नसताना, प्रबोधनानं काही होणार नाही. वाहतूकीचे नियम तोडणार्‍यांना (व कसलेच नियम तोडणार्‍यांना) पब्लिकली कायमची मुक्ती दिल्याशिवाय लोकांना ती शिस्त लागणार नाही. एखादा हुकुमशहा सत्तेवर येवून त्यानं हे केलं तरच शक्य होईल. लोकसंख्या कमी करण्याचा पण हा फक्कड उपाय होईल.