दिन्याचा राजा
दिन्याच्या राजाला काळी प्यांट इन केलेला शर्ट घालून एका उंच स्टुलावर चढून आपल्या तीन वर्षाच्या मुलाला घराच्या पत्र्यावरून काढताना पाहून मजा वाटली. दुसरा कोणी असता तर लक्ष्य गेलं नसतं पण हा दिन्याचा राजा होता दिन्याचा राजा.
हा तसा माझ्या हून वयाने लहान.
आम्ही घर बदलून ह्या वस्तीत येऊन नुकतेच राहू लागलो होतो. नवे मित्र बनवत होतो.
आमच्या क्रिकेट खेळायची जागा म्हणजे दारा समोरून जाणारी वाट.
तिच्या शेवटी भंगारचा धंदा करणार्या खान अंकलचं घर आडवं गेलेलं.
त्याच्या भिंतीला लागला की सिक्स.
सगळी घरं बैठी.
मिसळपाव