Skip to main content

काहि बालके खुप गोड क्युट असतात

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 04/10/2015 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
काहि बालके खुप गोड क्युट असतात काहि बालके खुप गोड क्युट असतात .. म्हणुन वैशाख वणव्याचा भडका थांबत नाहि श्रावण सर धरतिवर कोसळत असतेच. वठलेल्या वृक्षाला त्याचे काय? . माजघरात बसलेली ति निपुत्रीक बाई थिजलेल्या डोळ्याने सारे पहातच असते

गांधीजयंती निमित्त गझल

लेखक चिमणराव वरवंटे ऊर्फ चिमू यांनी रविवार, 04/10/2015 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
बापू जिकडे तिकडे हिंसा आता दिसते बापू जनतेला या गरिबी अजून पिसते बापू जेव्हा जेव्हा लूट पाहतो मी सत्याची तुझीच प्रतिमा मनात माझ्या वसते बापू शेतीचाही कणा मोडला दुष्काळाने शेतकय्रांचे जीवन झाले सस्ते बापू मातीमोल रे तुझी अहिंसा झाली आता सदा मनाला चिंता याची डसते बापू भिंतींवरचे फोटो नुसते नावापुरते जनता तुजला जयंतीलाच पुसते बापू खोटे नाटे सारे हे व्यवहार चालती कुठे कुणीही आज कसे रे फसते बापू? खरेच जर तू आठवला असता देशाला खून, दरोडे, बलात्कारही नसते बापू चुकलो आम्ही घे पदराला गुन्हे आमचे दाव खर्‍याचे सर्वांना तू रस्ते बापू मला दिलासा नको कुणाचा जगण्यासाठी हेच मला आधार जगाचे "हसते बापू"
काव्यरस

जमलंच तूला तर....!!

लेखक चिमणराव वरवंटे ऊर्फ चिमू यांनी रविवार, 04/10/2015 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
जमलंच तुला...... तर जमलंच तुला...... तर करुण दू: खानं ओथंबलेल्या डोळ्यांना धागा (सुखाचा) दे विसावण्यासाठी या लोकशाहीला थोड़ी जागा दे प्रसवण्यासाठी त्यामुळं उघड्यावर होणारे तिचे प्रसव टळतील नाहीतर उगाच लोक बड़बड़तील काहीही अन कुठेही ? जमलंच तुला...... तर कान फूंक त्या बलातकाय्रांचे दे पाणी त्यांना मर्दानी कर्तुत्वाचं ! एरवी गंज चढलाय त्यांच्या माणूसपणाला पौरुषत्वाची एक ठिणगी असते कायम पण तीही पेट घेते फ़क्त वासनेच्या वाय्रानेच त्यांचा पुरुषार्थ शोभून दिसतो टेबलावरच्या कागदी फुलांच्या ताटव्यांत अगदी गुबगुबीत, गुलाबासारखा ना गंध, ना वास! फूल आहे, तेवढा भास ! जमलंच तुला......

पहाट.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 04/10/2015 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
“पाऊल पुढे टाकायला ही पहाट मला इंधन पुरवते.”---संध्या परब सकाळीच बाहेर फेरफटका मारायची माझी जूनीच संवय आहे.मग मी कुठेही फिरतीवर असलो किंवा कुणाकडे बाहेर गावी रहायला गेलो असलो तरी सकाळी उठून जवळ असलेल्या कुठच्याही मोकळ्या जागी फिरून यायचो.मग कोकणात असलो तर,बाजूच्या शेतीवाडीत फिरायचो,समुद्राजवळ असलो तर चौपाटीवर जायचो,छोटासा डोंगर असला तर घाटी जढून जायचो.जवळ नदी असेल तर नदीच्या किनार्‍या किनार्‍याने फिरत जायचो. शहरात असल्यानंतर मात्र अशी निवड करायला मिळत नसायची. एकदा मी दिल्लीत असताना वसंत विहार कॉलनीत रहायला होतो.कॉलनीत अतीशय सुंदर पार्क होता.खूप लोक सकाळी फिरायला यायचे.गॉल्फचं मैदान पण होतं

तुमची शांताबाई आमचा राजाभाऊ!!

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 04/10/2015 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा- सांगायलाच पाहीजे का? https://m.youtube.com/watch?v=IYqGOsnSCJM ) राजाभाव की चलनेकी आवाज सुन ली तुम लोगोंने....... राजाभाव ऐसा गडी है जिसके आतेही महफिल का रंग ऊडकर आसमान छु जाता है. हवा ईधर ऊधर घुमने लगती है, मौसम कोई खबर नही देता... ....और उसकी चप्पल तो ऐसी बजती है, कि जैसे कडाम् कुडुम् ..... कडाम् कुडुम् ...... कडाम् कुडुम्.... राजाभाव .....राजाभाव.....राजाभाव..... गडी कसा अगदी हट्टाकट्टा, मिशीचा तोरा भलामोठा, इंग्लिश मारतो घटाघटा, भरुन बुकना ईकडुन तिकडं खातुय चखना. खातुय ... चखणा, भरुन ....

टीव्ही वरची धूळ

लेखक समीर_happy go lucky यांनी रविवार, 04/10/2015 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
टीव्ही वरची धूळ नेहमीच्या भांडणाला कारण मिळाल पण देव-दयेने त्याच टीव्हीतल्या सासू-सुना योग्यवेळी भांडल्या अन त्या रोजच्या भांडणात आमच भांडण विरलं तीच वाढत वजन आमच्या भांडणाला पुन्हा एक कारण बनल पण त्याच वेळी पिझ्झा हट वाल्यांची फ्री होम डिलिव्हरी मी स्मरली अन आमच भांडण विरलं फिरायला जाऊया म्हणे गमतीत गाडी पेट्रोल पंपावर टाकली नेहमीचं भांडणाला कारण बनलं अन त्याच वेळी नेमका गाडीनी ड्रायचा दिवा लावला त्या क्षीण प्रकाशात आमच भांडण विरलं आमच्या भांडणाच सदाहरित कारण तिच्या दिसण्यावर मी दिलेली कॉमेंट पुन्हा एकदा कारण बनल पण नेमका त्याच वेळी आय सर्जन मित्राचा फोन यावा तिच्या
काव्यरस

जगावेगळी ती

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 03/10/2015 23:33 या दिवशी प्रकाशित केले.
जगावेगळी ती स्वप्न असतो एक अजोडसा ठेवा कोणत्याही क्षणी आठवणीला एकटे सुटू देत नाही स्वप्नांचे असते सगळ्यांशीच सख्य हा आपला अन तो परका असा भेदभाव तिथे होत नाही 'ती' हा व्यक्तिविशेष कोणी न कोणी प्रत्येकच तरुणाच्या स्वप्नात असेल तरीही कवितेत सही पण 'माझी ती' वेगळीच वाटो या अट्टाहासाला अजिबात तळ मिळत नसेल प्रेम हि कल्पना प्रत्येकच जण अनुभवतो हातात हात घेऊन नशिबाशी भांडाया बघतो पण 'जिचा' हात 'माझ्या' हातात आहे तीच जगावेगळी या अन यासम मान्यतेला अजिबातच अंत नसतो वेगळेपणा तिचा कुठे नि कसा स्मरावा??
काव्यरस

अशीहि एक धर्म निरपेक्शता

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शनिवार, 03/10/2015 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
अशीहि एक धर्मनिरपेक्षता ! नातवाची लाडीगोडी म्हणजे एक प्रकारचा हुकूमच असतो मग तो कधीहि वेळीअवेळी का केली असेना, संध्याकाली सात साडेसात वाजता त्याला मातीची खेळणी हवी असतात, त्याच्या दिवाळी च्या किल्ल्यासाठी . त्याला स्कूटरवर घेतो आणि येतो स्टँडजवळच्या मेन चौकात,नगरपालिकेच्या दिव्याखाली एक बाई, बसलेली असते खेळणी विकायला, मावळे घोडेस्वार ,तोफा आणि काय काय खेळणी तो निवडतो आणि सगळ्यात शेवटी, घोड्यावरील शिवाजी महाराज, "घोड्यावरील शिवाजी महाराज,सर्वात जास्त खपत असतील नं?

ब्रायन क्लोज - द मॅन ऑफ स्टील!

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 03/10/2015 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रायन क्लोज गेला! कोण ब्रायन क्लोज? असा प्रश्न साहजिकच अनेकांच्या मनात चमकून गेला असेल. अगदी क्रिकेट जाणकारांच्याही! कारण सध्याच्या ट्वेंटी-ट्वेंटीच्या जमान्यात ८४ व्या वर्षी ख्रिस्तवासी झालेल्या क्लोजबद्दल तपशीलवार माहिती असण्याची शक्यता विरळाच! आजकालच्या हिमेसभाय, यो यो हनीसिंग (काय पण नाव!), आतिफ अस्लम (हे माणसाचं नाव आहे. मला आधी हा मुर्ग मुसल्लम सारखा खाण्याचा प्रकार वाटला होता.

मिरच्यांची भाजी

लेखक मधुरा देशपांडे यांनी शनिवार, 03/10/2015 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
नाव वाचुन काय वाटतंय? कुठल्या मिरच्या? आपल्या तिखट मिरच्या की सिमला मिरच्या/ढोबळ्या मिरच्या की त्या कमी तिखट मोठ्या मिरच्या असतात त्या? नाही म्हणजे ज्या बारक्या हिरव्या मिरच्या ज्या भाजीत किंवा कुठल्याही पदार्थात तिखटपणासाठी घालतात, तर त्याचीच भाजी करायची...हो...त्याचीच, त्याच्यासोबत इतर पदार्थ काय काय ते बघु पुढे... बुलढाणा जिल्ह्यात ही भाजी म्हणजे लेवा पाटील लोकांची खासीयत. नाकातोंडातुन पाणी येईलच अशी तिखट्ट भाजी आणि सोबत भाकरी, ती कुस्करायची, त्यावर कच्चं तेल घ्यायचं आणि कांदा, लिंबु, टोमॅटो चिरुन घ्यायचे. खास करुन पावसाळ्याच्या दिवसात बर्‍याच ठिकाणी या भाजीच्या पार्ट्या होतात शेतात.