Skip to main content

श्रावण सर

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 07/10/2015 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण सर जेंव्हा कोसळत असेल आठ्वण माझी ति काढत बसली असेल रात्र भर नक्किच निट झोपली नसेल आठवणीने ति बिछान्यावर तळमळत असेल माझ्या आठवणीने ति मनोमन् मोहरली असेल् केवड्याची नाजुक् तनु रोमंचीत् झाली असेल् तो निर्दयी श्रावण् वारा आग् भडकावत् असेल् ह्रुदयाची धडधड तिची वाढली असेल प्रणय् रात्रीचे मदन् चाळे आठवित् असेल् प्रेमपत्रे वाचताना अश्रुंची धार लागली असेल मी ठीक तर आहे ना असे काळजीने श्रावण मेघास ति विचारत असेल माझ्या फोटोकडे ति बघत बसली असेल ह्र्‌दया जवळ घेवुन चुंबन वर्षाव करीत असेल कदाचीत मी ये‌ईल या वेड्या आशेने साज श्रुंगार करीत बसली असेल कसे सांगु सखे, मी निराळ्या दुनियेत आहे सिमेवर लढत

नवमी

लेखक सूड यांनी बुधवार, 07/10/2015 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
वडे घारगे पुर्‍या कधी नाजूकशा सांजोर्‍या दिंडे निवगर्‍या तूप काठोकाठी खमंग अळवड्या कधी तांदुळ कुरवड्या सुरळी पाटवड्या कधी देठीगाठी अबोली वळेसर कधी केवडा त्यावर अनंत नि तगर मोगर्‍याची दाटी असोल नारळ ओटी इंद्रायणी तांदूळ सुपारी तांबूल खण जरीकाठी जितेपणी याचा कधी केला नाही सोस आज सारे खास अविधवेसाठी
काव्यरस

उलटं सुलटं (दीड शशक)

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी बुधवार, 07/10/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
अरुंधतीचं पाककलेत मोठं नांव झालं होतं. परीक्षक म्हणून जेव्हां तिला बेळगावला बोलावणं आलं, तेव्हां मीहि येतो म्हणालो, तेव्हडचं वडिलाना भेटता येत होतं. आईच्या माघारी पण त्यानी मंबईला येण्याचं नाकारलं, माझं मी कसंतरी भागवीन म्हणाले. संध्याकाळी बंडू सावंत लायब्ररीत भेटला, तिथं लायब्रीयन आहे तो,माझा वर्ग मित्र. आणि त्यानं सांगितलं आणि गोट्या कपाळात गेल्या, तसाच घरी आलो,आणि घेतलं फैलावर वडलाना, काय कमी आहे तुम्हाला म्हणून हे थेर सुचतायंत़ ? काय फाडून घेताय त्या पेपर मासीकातून? मी त्याना बोलूनच देत नव्हतो, बघू ती चिटोरी?

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: २ थल- बागेश्वर मार्गे रमणीय बैजनाथ

लेखक मार्गी यांनी बुधवार, 07/10/2015 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. . अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी पिथौरागढ़!

"हाय"कू

लेखक नाखु यांनी बुधवार, 07/10/2015 09:37 या दिवशी प्रकाशित केले.

"हाय"कू

"हाय"कू हा प्रकार समजवण्याचा नाही समजण्याचा आहे. लेखक मकदूरांना त्यांचे प्रेरणास्थान श्री श्री श्री श्री आत्मुदा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावेल न लावेल असा स्पर्श करणे अतिआवश्यक आहे).यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला. पुणे प्रांतीही त्यांना केलेली आर्त विनवणी दुर्लक्षली गेली आणि आम्हाला अंगठा दाखविला. ( त्या अंगठ्याला चुना होता असे वल्लींचा अंदाज आहे, त्या मुळे तो अंगठा आमच्या विनवणीसाठी ठेंगा म्हणून होता का चैतन्यचूर्ण करामत हे कळाले नाही.

गणिती गम्मत

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी बुधवार, 07/10/2015 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
गणिती गम्मत (१) कालची तारीख ५-१०-२०१५ उलटे पाहाताहि तारीख तीच ५-१० २०१५, कांही माणसं अशा मजेशीर गोष्टीच्य़ा शोधातच असतात,आता ५तारीख ०५ लिहीली तर सन येईल २०१५० पण अशा ट्रीक मध्ये जास्त चिकित्कपणा दाखवायचा नसतो,मजा निघून जातो, चलता है म्हणून सोडून द्यायचं. पुन्हा अशी गंमत कधी येईल? पुढच्या वर्षी६-१०-२०१६ला. गम्मत(२)काय तर म्हणे किंग फिशर बिअरची किंमत ११५रु.त्यातून तुमचं जन्म साल वजा करा उदा.८१ राहिले ३४, तुमचं वय ३४, खरं तर ११५ तून तुमचं जन्म साल वजा केल्यावर तुमचं वय यणारच असतं पण त्याला किंग फिशर ची जोड दिल्यावर मजा जास्त चढते इथं समजा २किलो कांद्याचा भाव ११५ऱु धरा किंवा काल बी.एस्.ई.

पराजित योद्धा

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 06/10/2015 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
अपराजित जगज्जेता पकडले त्याने काळाला. दंभ अमरतेचा विजयी गुंगीचा. कळलेच नाही त्याला काळ कसा निसटला सूर्यास्त कसा झाला. अखेर हात रिक्तच राहिले पराजित योद्धाचे.
काव्यरस

प्रतिसाद, वाद वगैरे....

लेखक दमामि यांनी मंगळवार, 06/10/2015 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
साद आहे घातली, प्रतिसाद द्यावा नेमका नाही तर जा उडत तुम्ही , मीही आहे खम्मका… अतृप्त नाही , चिमण नाही, ना जयंत, अनाहिता मोजक्याच प्रतिक्रियांना मग करू मी ब्लेम का ? कट्ट्यास जाऊ, ग्रुप करू मार्ग साधा सरळसा ही रीत पाळायास आहे बोल तुजला टैम का ? नवीन दिसला आयडी की मांत्रिकाला आणुनी बकरा नवा कापायचा हा पुराणा गेम का? सोड वाद विवाद तू अन शांत चित्ते ऱ्हा इथे सेम या मिपावरी तुझे नि माझे प्रेम का? डिस्क्लेमर - या कवितेचा आणि मात्रा व्रुत्ताचा वगैरे काहीही संबंध नाही . खम्मका या शब्दात कसा ठसका ठासून भरला आहे.
काव्यरस

हाय फाय

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी मंगळवार, 06/10/2015 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
एक दिवस अगोदर बनवायला टाकलेला चष्मा येण्याची वाट बघत कोथरुडातल्या ठरलेल्या दुकानात काल संध्याकाळी शिरलो तेव्हा आत अगोदरच एक जख्ख म्हातारी, तिचा तेवढाच जख्ख म्हातारा नवरा, त्यांची मुलगी, जावई, आणि शाळकरी नात कुठला चष्मा आणि फ्रेम निवडायची यावर तावातावाने चर्चा करताना दिसले. टिपीकल पुणेरी कोथरुडी अतीश्रीमंत हायफाय परिवार होता. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे. आपण हायफाय आहोत हे दाखवण्याची एकही संधी ते सोडत नव्हते.

मोकलाया दाही दिश्या ते भटकाया दाही दिश्या : एक प्रवास

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 06/10/2015 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
(ढेस्क्लेमर: या लेखातून माझा कुणालाही हिणवण्याचा अथवा दुखावण्याचा हेतू नाही. याउलट 'हसण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी हसणे' हा माझा हास्य'बाना' सर्वांपर्यंत पोचविण्याचा एक किंचीतसा प्रयत्न आहे! तरीही कुणाला माझ्या लेखातील/काव्यातील काही जागांना आक्षेप असल्यास कळवावे, दुरूस्ती किंवा तो भाग काढून टाकण्यासाठी संमंना सांगून प्रयत्न केला जाईल!) न्मसर्कार म्हणडलि! तर महाराजा, शीर्षक आणि पहिली ओळ वाचून पुढे काय वाचायला मिळणार आहे याचा एक अंदाज मिपाकरांना आलाच असेल! तुम्ही बरोबर विचार करताय, सदर लेख "त्याच" काव्यचमत्काराला वाहिलेली एक शब्दांजली आहे.