हाय फाय
एक दिवस अगोदर बनवायला टाकलेला चष्मा येण्याची वाट बघत कोथरुडातल्या ठरलेल्या दुकानात काल संध्याकाळी शिरलो तेव्हा आत अगोदरच एक जख्ख म्हातारी, तिचा तेवढाच जख्ख म्हातारा नवरा, त्यांची मुलगी, जावई, आणि शाळकरी नात कुठला चष्मा आणि फ्रेम निवडायची यावर तावातावाने चर्चा करताना दिसले. टिपीकल पुणेरी कोथरुडी अतीश्रीमंत हायफाय परिवार होता. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
आपण हायफाय आहोत हे दाखवण्याची एकही संधी ते सोडत नव्हते. आपापसात मधेमधे यथेच्छ इंग्रजी वाक्य पेरत आणि अधेमधे अतीव कष्टाने बोललेल्या मराठीवाक्यांवरही आपल्या तथाकथित हायफाय कल्चरची इंग्रजी छाप सोडत त्यांचं आपापसात आणि सेल्सगर्लशी संभाषण सुरू होतं. त्यांचे संभाषण ऐकून मलाच जाम कानकोंडं झाल्यासारखं झालं. कारण आपल्याच कुटुंबियांना भर दुकानात किती उद्धटपणे आणि काय बोलावं याचं तारतम्य साफ सुटल्यागत झालं होतं.
आजींना नवीन चष्मा/चष्मे करायचे होते. चष्म्यांची संख्या आणि फ्रेमचा दर्जा या दोन मुद्द्यांवर तावातावाने खल चालू असताना जावई हातात जुनी फ्रेम नाचवत एक मस्त आयडीयाची कल्पना सुचल्याच्या आनंदात म्हणाला, "एक स्पेअर करायचाअसेल तर यातच नवीन काचा टाकूया की".
यावर त्याची बायको, म्हणजे त्या जख्ख दांपत्याची मुलगी फटकन् म्हणाली, "तू गप्प बस, my father is paying for it." आणि मग सेल्सगर्लला उद्देशून, "तुम्ही दाखवा हो, don't listen to my husband". तो बिचारा मंत्र्यालयाच्या सहाव्या मजल्यावर असलेला टवटवीत चेहरा एकदम महापालिकेतला चतुर्थ श्रेणी सारखा करत, फॉर द एन्टायर ड्युरेशन ऑफ द खरेदी, बारा वाजलेले भाव घेऊन स्वतःच्या स्मार्टफोनशी चाळे करत निमूट बसून होता.
खरं तर अशा वातावरणात मला गुदमरायला होतं. पण ही मुक्ताफळं ऐकल्या नंतर कानावर पडलेली अहंगंड, उद्धटपणा, अरेरावी, आणि श्रीमंतीचा माज यांनी ओतप्रोत भरलेली वाक्य मी एका कानाने ऐकून दुसर्या कानाने सोडून दिली. पण दुर्दैवाने एक वाक्य अक्षरशः कुणीतरी वितळलेलं गरम शिसं ओतावं तसं कानात शिरलं.
कुठली फ्रेम घ्यावी यावर अजूनही खल चालूच होता. आजींना जरा भारीतली फ्रेम घ्यावी असं त्यांच्या मुलीचं मत पडलं. अर्थात, तिचं काहीच जाणार नव्हतं...after all, her father was paying for it.
एका फ्रेमकडे अंगुलीनिर्देश करुन ती हातात घेऊन ती तिच्या मुलीला म्हणाली, "हीच घेऊ, चांगली आहे, after all, it might as well be her last frame" (नाहीतरी तिचीही शेवटचीच फ्रेम असणार आहे).
आता मी त्या कुटुंबाला ओळखत नव्हतो. त्यामुळे कोण जाणे, त्या म्हातारीला काही असाध्य आजारही झालेला असू शकत होता. अर्थात हा माझा त्या बाईच्या मुक्ताफळावरुन काढलेला अंदाज आहे. पण काहीही झालं असेल, कुठलाही आजार झालेला असेल, वय कितीही जास्त असेल, तरी "आपल्या आईचा हा शेवटचाच चष्मा", असं जाहीर बोलणं सोडाच, मनात तरी विचार येतोच कसा? इथे मात्र आजींची एक्स्पायरी डेट माहीत असल्यागत ती मुलगी बोलत होती.
तेवढ्यात मी मागवलेला चष्मा आला, आणि तो घेऊन मी घाईने तिथून बाहेर पडलो.
घरातल्या म्हातार्या माणसांनी जरी कधी, "आता काय आमचं राहिलंय", "आता सगळं झालं आता आम्ही डोळे मिटायला मोकळे", असं सहज जरी म्हणाली तरी आपण हेलावतो, आणि असं न बोलण्याबाबत त्यांना प्रेमाने दटावतो.
कालपासून विचार करतोय, त्या आजींना असं प्रेमाने कुणी दटावत असेल का?
--------------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रकाशितः http://mandarvichar.blogspot.in/2015/10/blog-post.html
© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ. ८. शालीवाहन शके १९३७
याद्या
9855
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
एका फ्रेमकडे अंगुलीनिर्देश
एका फ्रेमकडे अंगुलीनिर्देश करुन ती हातात घेऊन ती तिच्या मुलीला म्हणाली, "हीच घेऊ, चांगली आहे, after all, it might as well be her last frame" (नाहीतरी तिचीही शेवटचीच फ्रेम असणार आहे). . बाब्बो, साष्टांग दंडवत.एका फ्रेमकडे अंगुलीनिर्देश
फुजि , उगाच खुस्पट काढायला
In reply to एका फ्रेमकडे अंगुलीनिर्देश by फुलथ्रॉटल जिनियस
धन्यवाद प्रगो
In reply to फुजि , उगाच खुस्पट काढायला by प्रसाद गोडबोले
इथे प्रॅक्टीकल असण्याचा
In reply to एका फ्रेमकडे अंगुलीनिर्देश by फुलथ्रॉटल जिनियस
छे छे
In reply to इथे प्रॅक्टीकल असण्याचा by शित्रेउमेश
पुर्वी एका धाग्यावर दिलेला
:(
टिपीकल पुणेरी कोथरुडी
+१
In reply to टिपीकल पुणेरी कोथरुडी by आदूबाळ
पूर्वप्रकाशित
ते शेवटचे वाक्य फालतूच आहे...
तुम्ही फार विचार करता बुवा
Wow
In reply to तुम्ही फार विचार करता बुवा by द-बाहुबली
Wishes मस्त आहेत आणि चेस मेट
In reply to तुम्ही फार विचार करता बुवा by द-बाहुबली
चेसमेटचा भारी चेकमेट....!
In reply to तुम्ही फार विचार करता बुवा by द-बाहुबली
अतिअवांतर
In reply to तुम्ही फार विचार करता बुवा by द-बाहुबली
_/\_ कुणाचंय?
In reply to अतिअवांतर by कपिलमुनी
आयरीश प्रार्थना / आशिर्वाद
In reply to _/\_ कुणाचंय? by असंका
आपल्या मित्राचा रिप्लाय आवडला
In reply to तुम्ही फार विचार करता बुवा by द-बाहुबली
:)
भाद्रपद कृ. ८. शालीवाहन शके १९३७
ही 'तारीख' नसून 'तिथी' किंवा
In reply to भाद्रपद कृ. ८. शालीवाहन शके १९३७ by जगप्रवासी
तिथी मागुन तिथी , तिथी मागुन
In reply to ही 'तारीख' नसून 'तिथी' किंवा by बॅटमॅन
ठोठ्ठोठठठ्ठो ठठठोठठोठो =)) =)
In reply to तिथी मागुन तिथी , तिथी मागुन by प्रसाद गोडबोले
लोल! माझ्या डोल्यांसमोर शेंडी
In reply to ठोठ्ठोठठठ्ठो ठठठोठठोठो =)) =) by बॅटमॅन
आणी मग
In reply to लोल! माझ्या डोल्यांसमोर शेंडी by आदूबाळ
खी खी खी =))
In reply to लोल! माझ्या डोल्यांसमोर शेंडी by आदूबाळ
बाकी 'शालिवाहन शके' असे
In reply to ही 'तारीख' नसून 'तिथी' किंवा by बॅटमॅन
परकीय?
In reply to बाकी 'शालिवाहन शके' असे by प्रचेतस
नै.
In reply to परकीय? by कपिलमुनी
तो शालिवाहन राजाने सुरू
In reply to बाकी 'शालिवाहन शके' असे by प्रचेतस
खी खी खी. =))
In reply to तो शालिवाहन राजाने सुरू by बॅटमॅन
शालिवाहन म्हणजे
In reply to खी खी खी. =)) by प्रचेतस
काय सांगताय?
In reply to शालिवाहन म्हणजे by बॅटमॅन
पण आमच्या माहितीत सातवाहन
In reply to काय सांगताय? by प्रचेतस
ओह्हो.
In reply to पण आमच्या माहितीत सातवाहन by बॅटमॅन
ते काही असो.
In reply to ओह्हो. by प्रचेतस
शलिवाहन राजा म्हणजे नेमका कोण
In reply to खी खी खी. =)) by प्रचेतस
बाकी हा शलिवाहन राजा म्हणजे
In reply to खी खी खी. =)) by प्रचेतस
शकि इन्सानो ,या धाग्या वर पण
"आपल्या आईचा हा शेवटचाच चष्मा
+१
In reply to "आपल्या आईचा हा शेवटचाच चष्मा by पद्मावति
अर्थाचा अनर्थ केला आहे
---- आता हिकरं विंग्रजीचे
In reply to अर्थाचा अनर्थ केला आहे by विवेक ठाकूर
हेही असू शकते :)
In reply to अर्थाचा अनर्थ केला आहे by विवेक ठाकूर
हो. हाच अर्थ आहे.
In reply to अर्थाचा अनर्थ केला आहे by विवेक ठाकूर
सर्वामुखी मंगल बोलवावे...
In reply to अर्थाचा अनर्थ केला आहे by विवेक ठाकूर
+१
In reply to सर्वामुखी मंगल बोलवावे... by असंका
हीच घेऊ, चांगली आहे म्हणजे मुलगी आईसाठी उत्तम फ्रेम घेतेयं.