Skip to main content

हादगा

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी गुरुवार, 08/10/2015 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमची सोसायटी तशी कास्मोपाँटियनच. हादग्याची तोंडओळख सुद्धा अनेकाना नव्हती पण कामत काकूनी ती करून दिली. नव्हे हादगा जोरात सुरु झाला. यंदाच हे चौथं वर्ष, पण त्याला थोडी कारुण्याची किनार लागली होती. यंदा हादगा बसवायचा की नाही इथून सुरवात होती, कारण काकूंची नात पल्लवी त्यात सहभागी असणार नव्हती. ती आता कराडला असते आपल्या नव्या घरी नव्या बाबा बरोबर, नवीन आजी बरोबर. जवळजवळ एक वर्षच झालं म्हणायचं की त्या घटनेला. काकूंचा धाकटा मुलगा चिंतन, सिव्हील इंजिनियर, दिवाळीच्या तोंडावरच डोकं दुखायची तक्रार करु लागला, पंधरा दिवस गेले असतील नसतील, डायरेक्ट मेंदुतज्ञनं गाठावा लागला.

ये कैसी अजब दास्ता हो गयी है

लेखक संदीप ताम्हनकर यांनी गुरुवार, 08/10/2015 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
सुरय्या जमाल शेख ने 'ये कैसी अजब दास्ता हो गयी है' हे गाणं गायलं आणि त्यावर अभिनय केला तेव्हा ती साधारण 34 वर्षांची होती. 'रुस्तुम आणि सोहराब' (रुस्तुम ऐ सोहराब - 1963) ही तिच्यासाठी आजच्या भाषेत कमबॅक फिल्म होती. नायक पृथ्वीराज कपूर आणि प्रेमनाथ असे बुलंद नट होते. अजून एक माहिती म्हणजे सिनेमाचे दिग्दर्शक 'विश्राम बेडेकर' होते. हिंदी सिनेमामध्ये अनेक सुंदर चेहऱ्याच्या नट्या झाल्या, अनेक अभिनय संपन्न नट्या झाल्या, अनेक सुरेल गायिका झाल्या पण या तिन्हीचा सुवर्ण संगम म्हणजे काय हे पाहायचं असेल तर हे गाणं आवर्जून बघा.

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ३ नयनरम्य ग्वालदाम आणि कर्णप्रयागमार्गे जोशीमठ

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 08/10/2015 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

कोकणातला उन्हाळा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 08/10/2015 06:26 या दिवशी प्रकाशित केले.
"त्या खोल ओहळात म्हणे, पुन्हाळेकरांच्या तरूण सुनेने आयुष्याला कंटाळून जीव दिला होता." कोकणातला पावसाळा जसा मला आवडतो तसा कोकणातला उन्हाळापण आवडतो.उन्हाळ्यातला तो ताज्या हवेचा थंड वारा,फुलझाडांच्या आणि मोहर आलेल्या आंब्याच्या पानामधून, जेव्हा घाईगर्दीने शिरून बरोबर फुलांचा आणि आंबेमोहराचा सुगंध दरवळत आपल्या नाकावर येऊन आदळतो आणि सोनचाफ्यासारख्या उंचच उंच वाढणार्‍या झाडावरच्या चाफ्याच्या फुलांच्या पाकळ्या हळुवार जमीनीवर पसरवतो किंवा पारिजातकाच्या फुलांचा सडा झाडाच्याच खाली घालतो, तेव्हा अनुभवलेला एखादा बहारदार दिवस आठवून मला त्या वातावरणात परत जावं कसं वाटतं. निरभ्र आकाशातला एखादा पांढरा ढग

स्पर्श

लेखक ज्योति अळवणी यांनी गुरुवार, 08/10/2015 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
हां पावसाळी गारवा तुझा सहवास हवा हवा उन्हाच्या त्या काहिलीला स्पर्श हळवा नवा नवा जल भरल्या मेघानाही हळूच स्पर्शे गारवा तप्त झाल्या निळाईला स्पर्श हळवा नवा नवा आतुरलेल्या धरेलाही स्पर्श जीवनाचा हवा मोहरुन उठली ती ही जाणून स्पर्श हळवा नवा
काव्यरस

केरळी फिश करी

लेखक इडली डोसा यांनी बुधवार, 07/10/2015 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
एका केरळी मैत्रिणीच्या डब्यातून नेहमी हि फिश करी खाणं व्हायचं . आता या मैत्रिणीची बदली दुसऱ्या हापिसात झाल्यावर तिला म्हटलं मला पण तुझी केरळी फिश करी करायला शिकव. मग तिने सांगितलेल्या पद्धतीने लगेच करून बघितली फिश करी आणि त्याचीच रेसिपी इथे दिलीये. . टीप: ह्या फिश करी साठी मी तिलापिया मासा वापरला आहे. त्याप्रकारच्या सगळ्या माश्यांसाठी ही कृती वापरता येईल . साहित्य : १. स्वच्छ केलेले ४ -५ माश्याचे मोठे तुकडे २. १ छोटा कांदा ३. १ टोमॅटो ४. ४ -५ कढिपत्ता पाने ५. मोहरी ६. चिंचेचा कोळ ७. सुकं खोबरं (अर्धी वाटी कीस ) ८. कोथिंबिर ९. लाल तिखट / लाल मिर्ची पूड १०. धणे पूड ११. मीठ १२.

शेझवान बटाटे

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 07/10/2015 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- ३ ते ४ मध्यम उकडलेले बटाटे लाल,पिवळी,हिरवी भोपळी मिरच्या- मध्यम आकाराची प्रत्येकी एक रंगीत मिरच्या न मिळाल्यास हिरव्या भोपळी मिरच्या घ्या. १ मध्यम कांदा २-३ मोठ्या लसूण पाकळ्या बारीक चिरून.

हाऊ मेनी कॉलम्स डिड ही गेट?

लेखक अजिंक्य विश्वास यांनी बुधवार, 07/10/2015 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
’How many columns did he get?’ व्हीनस - २००६ ऑस्कर कधी कधी खूप कद्रूपणे वागते. अर्थात हा कद्रूपणा ऑस्करची उंची कमी करतो. त्या व्यक्तीची नाही , ज्याला इतकी नामांकने मिळूनदेखील एकही ऑस्कर कधी मिळाले नाही. (नाही म्हणायला, लाईफ टाईम अचिव्हमेंट देऊन आपला खुजेपणा तेवढा दाखवला.

पम्पकिन स्पाईस्ड मफिन्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 07/10/2015 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
. आता फॉल आणि ऑक्टोबर दोन्ही सुरु झाले आहेत त्यामुळे सर्वत्र पानगळ, फॉलची विविध रंगछटा बघून खूप छान वाटतं. बाजारात ही लाल भोपळा भरपूर येऊ लागला आहे, ऑटम म्हटले की घरोघरी लाल भोपळ्याच्या अनेक पाककृती बनु लागतात, कुठे पम्पकिन ब्रेड, तर कुठे पम्पकिन केक, मफिन्स, पाय, स्पाईस्ड लाते.

दिवस तिसरा आणि चौथा-अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.

लेखक सतिश पाटील यांनी बुधवार, 07/10/2015 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारी आणि दिवस पहिला - अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू. दिवस दुसरा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू. दिवस तिसरा पहाटे पहाटेच जुलीने मला उठवले, मी ही कोणतेही आढेवेढे न घेता उठून बसलो, बाहेर तसा अजून अंधारच होता, आम्ही आमचे सामान गोळा करायला घेतले, हळू हळू झुंजू मुंजू व्हायला लागले तसे खिडकीतून पंजाबची हिरवीगार शेती दिसायला लागली, ७ वाजता गाडी अमृतसर स्टेशन ला लागली आणि आम्ही आमचे सामान खाली उतरवून आधी माल डब्ब्यापाशी गाड्या घेण्यासाठ