’How many columns did he get?’
व्हीनस - २००६
ऑस्कर कधी कधी खूप कद्रूपणे वागते. अर्थात हा कद्रूपणा ऑस्करची उंची कमी करतो. त्या व्यक्तीची नाही , ज्याला इतकी नामांकने मिळूनदेखील एकही ऑस्कर कधी मिळाले नाही. (नाही म्हणायला, लाईफ टाईम अचिव्हमेंट देऊन आपला खुजेपणा तेवढा दाखवला. "Always a bridesmaid, never a bride - my foot!" - ही त्याची ७५व्या ऑस्करच्या वेळेस अॅव्हॉर्ड मिळतानाची प्रतिक्रिया!)
पीटर ओ’टूल
’लॉरेन्स ऑफ अरेबिया’चा हा नायक इतका देखणा होता की, नोएल कॉवर्ड त्याला गंमतीत म्हणाला होता, ’तू जर अजून देखणा असतात तर ती फिल्म ’फ्लॉरेन्स ऑफ अरेबिया’ म्हणून देखील चालली असती.’
शांत करारी आवाज, चमकदार निळे डोळे आणि प्रभावशाली देखणेपण घेऊन आलेला नट अभिनयातदेखील तोडीस तोड होता. त्याच्या गाजलेल्या चित्रपटांची नावे जरी अशीच आठवत गेलो, तर तो डोळ्यांसमोर सहज उभा राहतो. लॉरेन्स ऑफ अरेबिया, बेकेट, हाऊ टू स्टील अ मिलीयन, लायन इन् द विन्टर, द रूलिंग क्लास, व्हॉटस् न्यू पुसीकॅट, गुडबाय, मि. चिपस्, मर्फीज् वॉर अशी कित्येक नावे सहज डोळ्यांसमोर येतात. तशी त्याची ओळख १० वर्षांपूर्वी मी कॉलेजमध्ये नुकताच गेलो होतो, तेव्हा झाली होती. ’लॉरेन्स ऑफ अरेबिया’ आणला होता आणि पहिली ५ मिनिटस् पाहून ठेवून दिला होता, इतकीच. तसा तो इतर चित्रपटातून देखील दिसत आणि जाणवत होता, फक्त तेवढा जवळचा नव्हता. ट्रॉय, स्टारडस्ट, रॅटॅटुई इ. ३ वर्षांपूर्वी त्याचा ’हाऊ टू स्टील अ मिलीयन’ पाहिला आणि हा नट कमालीचा लक्षात राहिला. तसे चित्रपट पाहताना नट उजवा आहे की, डावखोरा हेच चाचपण्याचा जास्त प्रकार होतो, आणि ह्या बाबतीतसुद्धा त्याने मला लक्ष देऊन पाहण्यास भाग पाडले. ( कॅथलिक असल्यामुळे लहानपणी नन्सने त्याला मारून मारून डावखोरेपणा घालवायचा प्रयत्न केला होता). चित्रपट पाहण्याचे खरे कारण ’रोमन हॉलिडे’ ची ऑड्रे हेपबर्न होते हे निराळे. पण त्यानंतर झपाटल्यासारखे त्याचे बेकेट, लायन इन् द विंटर, लॉरेन्स ऑफ अरेबिया, कॅलिगुला, व्हीनस, द रुलिंग क्लास असे चित्रपट पाहिले. इतके सुंदर चित्रपट देऊनही त्याचे आणि ऑस्करचे नेहमीच व्यस्त प्रमाण राहिले. आजपर्यंत ८ वेळा नामांकन होऊन देखील त्याला एकदाही ऑस्कर मिळाले नाही. त्याच्या ’बेकेट’ मधील सहकलाकार , मित्र आणि ७ वेळा ऑस्कर नामांकने मिळूनदेखील ऑस्कर न मिळालेल्या रिचर्ड बर्टन सारखेच.
हे सगळे सांगायचे कारण म्हणजे, १४ डिसेंबर २०१३ ला त्याचे निधन झाले. माझी बसलेली दातखीळ आज कुठे निघाली , तेव्हा त्याच्या आठवणीत हे लिहिण्याचा प्रपंच मांडला आहे. इतके देखणे टॅलेंट विस्मृतीत कधीच जाणार नाही, पण माझ्यासारखी आजच्या पीढीला त्याची ओळख व्हावी इतकीच छोटी इच्छा आहे, बस!
तसेही ’व्हीनस’ मध्ये मॉरिस मेल्यावर त्याचे मित्र न्यूजपेपर मध्ये आलेला त्याचा फोटो आणि बातमी पाहात असतात, तेव्हा एक मित्र विचारतो, ’ किती कॉलम मिळाले त्याला?’
आणि तिथलीच वेट्रेस मॉरिसच्या मित्राला विचारते, ’तुमचा मित्र आज आला नाही?’
मित्र न बोलता आलेला हुंदका आवरत तिला त्याची पेपरात आलेली बातमी दाखवतो.
’गॉड, ही वॉज गॉर्जस’ . ती उद्गारते. :)
---------------------------------------------------------
बहुतांश माहिती स्त्रोत- IMDB.COM
---------------------------------------------------------
बहुतांश माहिती स्त्रोत- IMDB.COM
वाचने
5566
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान माहिती.
सुरेख!!! धन्यवाद!!
त्रोटक वाटला. लॉरेन्स ऑफ
रोमन हॉलिडे चा उल्लेख
In reply to त्रोटक वाटला. लॉरेन्स ऑफ by अन्या दातार
ही नुसतीच तोंडओळख आहे.
In reply to त्रोटक वाटला. लॉरेन्स ऑफ by अन्या दातार
पीटर ओ टूल आणि ऑस्कर
ऑस्कर नामांकने
In reply to पीटर ओ टूल आणि ऑस्कर by अभिजितमोहोळकर
ग्रेगरी पेक - टू किल अ
In reply to पीटर ओ टूल आणि ऑस्कर by अभिजितमोहोळकर
हिचकॉक सारखे लोक ऑस्करपेक्षा
In reply to ग्रेगरी पेक - टू किल अ by बोका-ए-आझम
बेकेट
In reply to ग्रेगरी पेक - टू किल अ by बोका-ए-आझम
चार्ली
फोटो पाहून..
बरोबर हाय!
In reply to फोटो पाहून.. by तुषार काळभोर
तरीपन
In reply to बरोबर हाय! by तर्राट जोकर
शम्मी सारखा राजबिंडा हिरो
In reply to तरीपन by तुषार काळभोर
विजुभौंचा पुर्ण आदर राखून... :)
In reply to शम्मी सारखा राजबिंडा हिरो by विजुभाऊ
शम्मी आणि शशी
In reply to तरीपन by तुषार काळभोर
छान माहिती.