Skip to main content

जपान, जपानी आणि मी !....भाग २

लेखक पद्मावति यांनी गुरुवार, 15/10/2015 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
जपान, जपानी आणि मी! ....भाग १ 'ध' चा 'मा' होवुन पुर्वी एक खून पुण्यात पडला होता. इथे अमेरिकेत 'र' चा 'ल' आणि 'ल' चा 'र' करीत इंग्रजी भाषेचे रोज खून पाडले जायचे. '' आय वान्त तू बीसीत रंडन अँड लोम''....हे नेहमीच. एकीकडे जपानी लोकांची इंग्रजीशी अशी हाणामारी चालली होती तिथे मी सुद्धा आपल्या परीने जपानी भाषेची मन लावून ऐसी की तैसी करत होते. 'अहो' या शब्दाचा जपानी अर्थ होतो मूर्ख, बावळट, ईडियट असा. एकदा भर पंक्तीत मी नवर्याला अहो, अहो... अशा दणादण हाका मारल्या त्या ऐकून समस्त जपानी मंडळींची भीतीने बोबडी वळली होती.

आरसा आणि फूल

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 15/10/2015 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
. . सानिकाची शाळेची तयारी चालू होती. सानिकाच्या आईला, म्हणजेच नेत्रालाही बॅंकेत वेळेवर पोहोचायचं होतं. आज बॅंकेत पूजा होती. "हेअर बॅंड लावलास का सानिका?" नेत्रा पर्समधला छोटा आरसा काढत ओरडली. एकीकडे नेत्रा आपले केस विंचरत होती. "हो आई, तूच तर लावलास." सानिका खोलीत येत म्हणाली. "एवढी वेणी घातलीय आज, पण फूल नाहीये माळायला. जाऊ दे, आता कोण बघतंय!

सक्सेसफुल फेल्युअर: अपोलो-१३चा थरार

लेखक लाल टोपी यांनी गुरुवार, 15/10/2015 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
. . 1 "ह्युस्टन, वुई हॅव अ प्रॉब्लेम.." नासाच्या ह्युस्टन येथील नियंत्रण कक्षात मिळालेला हा संदेश पृथ्वीपासून दोन लाख पाच हजार मैल दूर पोहोचलेल्या, मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या नासाच्या तिसर्‍या मोहिमेतील अपोलो-१३ या चांद्रयानातून आला होता.

सहाचा वडा

लेखक दमामि यांनी गुरुवार, 15/10/2015 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा काय करणार लोकं पण अश्शा जिलब्या पाडतात ना, आवरता आवरत नाही. सहाचा वडा गरमागरम असतो! वड्याच्या कव्हरला गुदगुल्या केल्या कि आपला हात मस्तसा भाजतो, चटणी हवी काय म्हणून मिश्कीलपणे विचारतो! सहाचा वडा झणझणीत असतो! शरीराचा रोम न् रोम जागा करतो जिभेवर लसणीचा स्वाद पसरवतो, अजून मिरची हवी होती का? म्हणून खोडीलपणे विचारतो! सहाचा वडा कॅालेजची आठवण असतो ! मनाचा एकदम रिट्रोस्कोप होतो पण हातातला ग्लास हातातच राहतो ...... ............. ............ ....... ............

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १४: जलाशय

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 15/10/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजवरच्या छायाचित्रण स्पर्धांना भरभरून प्रतिसाद लाभला आहे. याच मालिकेतली नवी स्पर्धा घेऊन येत आहोत. या वेळचा विषय आहे, 'जलाशय'. येथे जलाशय म्हणजे तळे, तलाव किंवा सरोवर एवढेच अपेक्षित आहे. प्रवेशिकेतच जलाशयाच्या ठिकाणाची माहिती लिहावी. फारशी माहिती उपलब्ध नसल्यास किमान ठिकाणाचे नाव अवश्य लिहावे. स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. विजेती छायाचित्रे यंदाच्या दिवाळी अंकात प्रकाशित केली जातील. तुमच्या प्रवेशिका उद्या (दिनांक १५ ऑक्टोबरपासून २९ ऑक्टोबरपर्यंत) या धाग्यावरील प्रतिसादांद्वारे पाठवा.

ल _ _

लेखक दमामि यांनी गुरुवार, 15/10/2015 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
ल _ _ तोंडात पान ठेवल्यासारखी ती शिवी तिनं दिली, एकदा... दोनदा... अनेकदा... मन भरेपर्यंत. तिथेच उभ्या असलेल्या मला अंगावरून काहीतरी ओलसर सरपटत गेल्यासारखं वाटत होतं. श्रीदुर्गापूजेचा आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि लांब जायचे असल्याने बीईयेष्टी ने प्रवास करावा लागणार होता. दादरला बसमध्ये चढलो,, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जण बसच्या मागील बाजूस जेन्ट्सना उभे राहण्यासाठी हमखास जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघींच एक वाचाळ मंडळ खिखीखुखू करत पुढे आलं.

स्थापत्य- एक कला

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 15/10/2015 04:08 या दिवशी प्रकाशित केले.
मूलभूत गरजां पैकी शेवटची पण महत्त्वाची गरज म्हणजे निवारा. आदिमानवाच्या गुहेपासून ते आताच्या प्रचंड आलिशान घरांपर्यंत खरंतर घर म्हणन्यापेक्षा महाल, राजवाड़े किंवा आपल्या भाषेत 'पॅलेस' म्हणावं अशा अनेक इमारती निवारा याच सदरात येतात. निवाऱ्याबरोबरच आणखी काही गरजा भागवण्यासाठी करावं लागणारं तात्पुरतं बांधकाम ते त्याच गरजेचं आपल्या सत्ता, संपत्ति, सामर्थ्याच्या अभिव्यक्ती करता वापरल्या जाणाऱ्या दृश्य रुपाला कदाचित स्थापत्यकला मानलें जावं. मी कुणीतरी मोठा, लोकोत्तर म्हणून काहीतरी अचाट घडवेन या भावनेतून जगातली काही स्थापत्य शिल्पं बनली.

असंच काहीतरी

लेखक प्यारे१ यांनी गुरुवार, 15/10/2015 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
लिहावंसं वाटतं; कधीकधी उगाचच वाटतं. काय लिहायचं ते नंतर ठरतं.

चारचा चहा

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 14/10/2015 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
चारचा चहा touch screen असतो! कपाच्या कानाला गुदगुल्या केल्या कि आतल्याआत मस्तसे हसतो, How's the day? म्हणून मिश्कीलपणे विचारतो! चारचा चहा screen saver असतो! शरीराचा tab refresh करतो मनाचे software update करतो, What's on your mind? म्हणून खोडीलपणे विचारतो! चारचा चहा google map असतो ! मनाचा cursor global होतो पण हातातला mouse local च राहतो ...... ............. ............ ....... ............ हळूहळू चारचा चहा धूसर होतो अरबी समुद्रापार दिसेनासा होतो......... !