Skip to main content

नवरात्र जल जागर : माळ नववी

लेखक नाखु यांनी बुधवार, 21/10/2015 09:19 या दिवशी प्रकाशित केले.

स्थापत्य - एक कला भाग १

लेखक प्यारे१ यांनी बुधवार, 21/10/2015 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः मी एक मारुन मुटकून स्थापत्य अभियंता आहे. लेखात मांडलेली मतं ही इंजिनिअरींगच्या थोड्याफार अभ्यासात व आतापर्यंतच्या अनुभवावरुन मांडलेली असून ती जशीच्या तशी खरी असण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे. या उप्पर जाणकार व्यक्तींना या मध्ये अधिक भर घालायची असल्यास अथवा दुरुस्त करावयाची असल्यास सप्रमाण मांडून व्यक्त केल्यास त्यांचे स्वागत आहे. या लेखमालेमध्ये जमेल तशी भर घालत राहण्याचा प्रयत्न आहे मात्र त्या लेखमाला सोडून इतर पालथे धंदे करताना आढळल्यास हिणवू नये ही नम्र विनंती. आमचा तोच मुख्य व्यवसाय आहे. लेखमालेमध्ये आनुषंगिक इंग्रजी शब्द येतील. अनुवाद सुचवावेत.

काहूर

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 21/10/2015 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
" आयं, भायर कावदान सुटलयं" म्या पाटीवर पिन्शीलीनं गिरगुट्या मारत मनालु, पर आय भाकऱ्या थापतच ऱ्हायली, म्या पण नुसतं तिच्याकडं बघत ऱ्हायलु. आय कायच बुलली नाय. मग म्या ऊठून कवाड ऊघडलं, भाईर रिपीरीपी पाऊस लागला हुता. छपराच्या वळचणीवरचं थेंब म्या हातात धरलं. मग त्यनंच हात धुतलं. मग पुना थेंब थेंब पाणी हातात धरलं, परत त्यनंच हात धुतलं. भिताडाच्या कडकडनं जाऊन मी गोठ्यात नजर मारली. आमची जरशी गाय गरीब बापुडी. अंधारात बसली हुती. म्या तिकडं गीलू न्हाय. पावसाचं टपोरं थेंब वट्यावर पडाय लागलं, मग माज्या बी पायावर शितुडं उडाय लागलं. उंबऱ्यावर पाय पुसून म्या पुना घरात गीलू.

मायें...

लेखक आनंद कांबीकर यांनी मंगळवार, 20/10/2015 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण मनाला कुरताड़ते, तुझं आणवाणी पायाणं रानं धुंडाळनं तापत्या उन्हात, अड़मुठ्या पावसात अन् गारठ्यात मिळलं ते काम करणं आज ही जेव्हां ऑफिसला निघतो, अरशात दिसतेस तु तळपत्या ढेकाळात, ललाटावरच्या कुंकवासगट घामाच्या धारांत लतफत उभी. तुझ्या हातातलं खुरपं माझं काळीज कापतं. तु ढेकळं फोडायचीस मला चारान्याची पेन्सिल देण्यासाठी. दिवाळी ला ठिगळं लाउन नाटी नवी करायचीस खाकी चड्डी मात्र कोरी शिवायाचीस. लई भोगलस तू माझ्यासाठी अता तुला गावांत ठिवनार नई बस्ं झालं तुरःट्या म्होरं सारुण धुर फुंकनं ती फुंकनि चुलीत घालून, येणार आहे मी आज तुला हिकडं घेऊन.

चालत राहू......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 20/10/2015 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
रेषांसंगे चालत आलो, रेषांसोबत चालत राहू, गति नाही, स्थिती नाही, केवळ लय, चालत राहू. उठल्यावरती सूर्य नाही, थकल्यावरती चंद्र नाही कुठला देश, कुठले घरटे, आपली कुडी, चालत राहू. जंजाळाशी रडणे नाही, गुंत्यापाशी थटणे नाही, कोण आले, कोण गेले, कुणी न उरले, चालत राहू. दार लोटले अंधार नाही, दार उघडले प्रकाश नाही, आला दिवस, गेला दिवस, आत्ताचा क्षण, चालत राहू. नाव उलटली आक्रोश नाही, नाव तरली जल्लोष नाही, कुठली लाट, कुठली वाट, आपला किनारा, चालत राहू.

उपासाचे कबाब!

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 20/10/2015 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
नवरात्रीचे नऊ दिवस उपास माझा नवरा गेली कित्येक वर्षे करतो.. पहिल्या २-३ माळा झाल्या की मग दूध, फळांवरून हळूहळू गाडी सा. खि., बटाट्याचा,रताळ्याचा किस, उपासाच्या भाजणीची थालिपिठ यावर येऊन ठेपते. काहीतरी वेगळे हवे आणि जास्त स्टार्ची,ऑयली नको अशी 'आखूडशिंगी बहुदुधी' डिश हवी असते. ह्यावर्षी ह्या मोडवर आल्यावर त्याने माझं डोकं न खाता चल जरा इंडियन स्टोअर मध्ये जाऊ असा विचार मांडला. तेथे गेल्यावर हा सुरण शोधू लागला. आता आम्ही काही राणीच्या देशात राहत नाही, ना उसगावात..

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ९ ऋषीकेशमधून प्रस्थान

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 20/10/2015 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

अधुरी एक कहाणी

लेखक मीउमेश यांनी मंगळवार, 20/10/2015 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात अश्या बर्याच प्रेमकहाण्या सुरु होण्या आधीच संपून जातात . अशीच एक गम्मत माझ्या आयुष्यातली मी एका कंपनी मध्ये नवीन कामाला लागलो होतो . मला लहान पणा पासून साउथ च्या मुली खूप आवडायच्या. काळ्या सावल्या, छान चंदनाचा आडवा टिक्का, अबोलीचे भरपूर गजरे , बारीक पण रेखीव काजळ आणी मुख्य म्हणजे मोकळे सोडलेले केस ( वेणी असली तरी छानच दिसतात) असो तर एक तामिळ मुलगी मला आवडू लागली, मी मुद्दाम तिच्या भोवती घुटमळू लागलो, ती दुसर्या विभागात काम करायची . तरी पण मी काही तरी काम काढून तिच्या dEPARTMENT मध्ये जात असे. आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नाही पण , नजरानजर रोज व्हायची.

चकती वाचे

लेखक निनाद यांनी मंगळवार, 20/10/2015 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
अनंतवर्ती अनभिसंहित अनमोल माहिती चकती वाचे अनापरीवर्तक अनालेखित पंक्ती अनुज्ञापन अनुक्रिया अनुदेशन ही पद्धती अनुनयी अनुमोदनात अनेकोत्तरी रीती अन्योन्य धारिता क्षीणनकारी अन्वस्ती अनेकोत्तरी अन्वस्तीय धागे तरी भीती अपच्छेद अपरा अनुरूपता असे अवनति अनुवाद असे अप्रारुपी शोधू तरी किती अवरक्त विदा अवरोधितात का भिंती अवश्लेष्मल तरी अवाढव्य असे माहिती (पैसा ताईंनी आठवण करून दिली... त्यामुळे भोगा आय मिन वाचा! :) )

नवरात्र जल जागर : माळ आठवी

लेखक नाखु यांनी मंगळवार, 20/10/2015 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== नव रात्र जल जागर : माळ पहिली... माळ दुसरी... माळ तिसरी... माळ चवथी... माळ पाचवी... माळ सहावी... माळ सातवी... माळ आठवी...