Skip to main content

अधुरी एक कहाणी

लेखक मीउमेश यांनी मंगळवार, 20/10/2015 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यात अश्या बर्याच प्रेमकहाण्या सुरु होण्या आधीच संपून जातात . अशीच एक गम्मत माझ्या आयुष्यातली मी एका कंपनी मध्ये नवीन कामाला लागलो होतो . मला लहान पणा पासून साउथ च्या मुली खूप आवडायच्या. काळ्या सावल्या, छान चंदनाचा आडवा टिक्का, अबोलीचे भरपूर गजरे , बारीक पण रेखीव काजळ आणी मुख्य म्हणजे मोकळे सोडलेले केस ( वेणी असली तरी छानच दिसतात) असो तर एक तामिळ मुलगी मला आवडू लागली, मी मुद्दाम तिच्या भोवती घुटमळू लागलो, ती दुसर्या विभागात काम करायची . तरी पण मी काही तरी काम काढून तिच्या dEPARTMENT मध्ये जात असे. आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नाही पण , नजरानजर रोज व्हायची. ,मला नेहमी वाटायच तिला पण मी आवडत असेन… एके दिवशी पोंगल होता, ती आज खूप सुंदर दिसत होती. मस्त पांढरी साडी सोनेरी किनाराची ( टिपिकल साउथ इंडियन ), छान चंदनाचा आडवा टिक्का, अबोलीचे भरपूर गजरे वगैरे वगैरे… आमची नाईट शिफ्ट असे ( कॉल सेंटर), ती हळूच ११ वाजता सीट वरून उठली, आणी पार्किंग मध्ये येऊन एका टू व्हीलर वर बसली. मी पण तिच्या मागे मागे पार्किंग मध्ये गेलो. ती थोडा वेळ अशीच बसून काही तरी गाणं गुणगुणत होती. मला वाटला हीच ती वेळ हाच तो क्षण…. बस आई हीच तुझी सून… आज तिला विचारूनच टाकतो … मी पुढे सरसावलो , तेवढ्यात तिने पर्स उघडली . पर्स मधून सिगारेट च पाकीट काढलं , लायटर नि सिगारेट शिलगावली. आणि मस्त SUTTA लावता. तिला बघून माझ्या तर छातीत कळच आली … आई ग ! तुझी सून कॅन्सल… वार झाला माझ्या हृदयावर … तिने मला बघितला एक स्माईल दीली … म्हणली यु अल्सो टेक वन … म्हणल बाई धन्य आहात तुम्ही … खूप वाईट वाटल त्या रात्री, मग काय, हमको मनकी शक्ती देना…. हमको मनकी शक्ती देना…. हमको मनकी शक्ती देना…. हमको मनकी शक्ती देना…. ओल्ड मोंग रम. नंतर काही दिवसांनी आणि एक गम्मत झाली… मी असाच तिच्या बॉस बरोबर काही कामा निमित्त चर्चा करत होतो . ती समोर येउन उभी राहिली … परत माझ्या मनात ढवळाढवळ सुरु झाली ती समोर उभी, तिचा बॉस म्हणाला "काय झालं काय काम आहे"… तो ओरडूनच म्हणाला ( मी मनात : का रे ओरडतो बिचारीला . . बिचारी माझी नाही झाली तरी काय झालं क्रश होतं ते माझं कधी काळच ) ती म्हणाली " सुटी हवी आहे , लग्न आहे माझं " ( मी पूर्ण पणे घायाळ रक्तबंबाळ …लगेच हमको मनकी शक्ती देना म्हणून प्रार्थना आरंभली ) तिचा बॉस : अगं किती वेळा लग्न करशील… किती वेळा तुला सुटी देऊ , गेल्या दोन वर्षात आता हि तिसर्यांदा लग्नाची सुटी मागते आहेस. मी फक्त चक्कर येउन पडायचा बाकी होतो… तिसर्यांदा लग्न? मग कळलं खरंच तिचं हे तिसरं लग्न होतं गेल्या दोन वर्षात . मग काय … घेतली तिने सुटी… झाल तिचं लग्न आम्ही मात्र हमको मनकी शक्ती देना म्हणून प्रार्थना करत बसलो . बरेच दिवस झालेत या घटनेला…. सध्या तिने परत सुटी साठी अप्लाय केलं आहे ! मला मेसेज पण टाकलाय ' शादी मे जरूर आना "
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 10482
प्रतिक्रिया 60

प्रतिक्रिया

मला आधी वाटल सिगारेट ओढत असली म्हणून काय झाल…चलता है यार…पण हे वाचून…
मी फक्त चक्कर येउन पडायचा बाकी होतो… तिसर्यांदा लग्न?
मलाही चक्करच आली! ;-) बरी ही अधुरी(च) कहाणी!! Sandy

दोन वर्षात तिसरं लग्न... वाह... क्या बात है... च्यायला आम्ही ८ वर्ष झाली एकाच झाडाला लटकलोय....

In reply to by शित्रेउमेश

झाडाने प्रतिसाद वाचला तर फांद्या हालतील. जरा जपून. कधी धप्प होताल सांगता यायचं नै. ;)

In reply to by बिन्नी

चालतंय की. त्यात काय? ते लेखक जरा मागच्या पिढीतलं पिडीत दिसतंय... तुमचा ब्रॅण्ड कन्चा? आमचा ब्रॅण्ड पिवळा हत्ती.

In reply to by प्यारे१

आन्ना कोण आता ! मी चिडले नाही. माझी प्रतिक्रीया स्पष्ट सांगीतली :)

In reply to by प्यारे१

बंद झाली बे हनीड्यु आता. आयटीसीचे राज्य आहे. बिड्या हायेत बघ सगळ्या. संभाजी, गणेश, भिकुसा, लाल दोरा, पिवळा दोरा. दिऊ का बंडल.

In reply to by अभ्या..

शिलगीव की. इचारायलायस काय? हितं बाय कोन बाप्या कोन काय कळंना झालंय आदीच. जरा झुर्का मारतु.

In reply to by प्यारे१

भीती याची वाटली … मी सुद्धा सिगारेट ओढतो आणि ती पण … म्हणजे पोर हातात चिरूट घेऊन जन्माला येणार

In reply to by मीउमेश

हे बरं हाय. तुम्ही सीगरेट ओढली तर चालते. पण तीने ओढता कामा नये. ये ना चालबे. अनाहीता मारतील तुमास्नी..

In reply to by बिन्नी

सिगरेट न पिणार्‍या कुठल्याही व्यक्तीला त्यांचा जोडीदार सिगरेट पित असेल तर ते नाहिच आवडत. बर्‍याच मुलींची तशी अटच असते. मग तीच अट एखाद्या निर्व्यसनी मुलाची असेल तर काय बिघडले?

In reply to by मृत्युन्जय

असाच उलटा विचार करून ती सुटली अस म्हणायचंय मला

In reply to by हेमंत लाटकर

तरळलेपेक्षा धुरळले म्हणा! जास्त सूट होतंय!!!

In reply to by हेमंत लाटकर

दोघे मिळून सिग्रेट आेेेढत असल्याचे चित्र
कसे? मिळून? एकच? एक्का वेळी? काही सुचेना राव :( . ते पूर्वी लग्नात एकच थम्सपची बॉट्ल प्रकार चालायचा तसे का?

In reply to by अभ्या..

दोघे मिळून सिग्रेट आेेेढत असल्याचे चित्र दोन्ही बाजूंनी पेटवून ... :)

दोन वर्षांत तीन लग्ने आणि दोन डिवोर्स होऊ शकतात का? कायदेशीर नोटिस, कोर्टाच्या तारखा, समुपदेशन काळ वगैरेचा काही संबंध नाही का?

In reply to by राही

लिव्ह इन चा प्रकार सगळा … मंदिरात जाऊन लग्न करायचं, नाही पटल कि वेगळा होऊन परत नवीन शोधायचं

कसे? मिळून? एकच? एक्का वेळी? काही सुचेना राव
तिने पहिले एक झुरका मारून सिगरेट त्याच्या हातात द्यायची.

"आर एच टी डी एम" मध्ये माधवन नवर्‍या मुलाला स्टेजवर शुभेच्छा द्यायला जातो अन म्हणतो "हाय! मेनी मोअर हॅपी रीटर्नस ऑफ द डे!!!", त्याची आठवण झाली. त्यांनाही कुणीतरी लग्नदिवशी अशाच शुभेच्छा दिल्या असतील कदाचित!!

पहिल्यांदाच मीपा वर काहीतरी लिहलंय , धन्यवाद सगळ्या मीपाकरन्ना माझ पाहिलं लेखन सहन केल्या बद्दल

In reply to by मीउमेश

अरे साह्यबा, तुम्ही सिग्रेटला नाय म्हणत नाय, मनकी शक्ती ओल्ड माँक मध्ये हुडकता म्हणल्यावर अजून काय पाहिजे. लिव्हा बिन्धास्त. काढा धूर. नाही सहन झ्झाल्यास हावोच आम्ही पेटवायला. ;)

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी , सुबक ठेंगणी तर नाही मिळाली, चांगली उंच धिप्पाड मिळाली. साउथ ची आवड, आवडच राहिली, आता अजून आवड जपतोय

In reply to by मीउमेश

>चांगली उंच धिप्पाड मिळाली. अंगाखांद्यांवर खेळा मग मनसोक्त.हा.का.ना.का! (ह.घ्या.)

In reply to by अभिजीत अवलिया

नवीन कहाणी सुरु झाली , एक कॅलेंडर पण छापलंय

मला लहान पणा पासून साउथ च्या मुली खूप आवडायच्या.
मग लहानपणी काही कहाण्या अधूरया राहिल्या असल्या तर त्या पण येऊ द्यात की! आवडतील वाचायला! ;-)

श्री रा रा रा रा मीउमेश यांस नवरात्रीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि "

काळ आला होता पण वेळ आली नव्हती

"बद्दल अभिनंदन. ता.क. जर जमलेच असते तर आपला विडी-काडी (मोड नसलेला) खर्च त्या तिघांपेक्षा जास्त झाला असता म्हणून आजच देवाला नारळ वाढवून या आणि इकडे खोबरं वाटा.
अखिल मिपा नवलेखन प्रोत्साहन आणि उत्तेजन अभियान अंतर्गत उदयोनमुख लेखक शोधा,स्वप्न भंग लेख मिळवा या पाणलोट विकास कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, चिमण हटेला गँग तर्फे तमाम नवसाहित्यीकांसाठीप्रसारीत

अरे काय चाललंय काय !!! लेख तर आहेच पण प्रतिसाद देखील सुभानल्ला .... कहर आहेत सगळे . "भीती याची वाटली मीउमेश - Tue, 20/10/2015 - 18:47 नवीन भीती याची वाटली … मी सुद्धा सिगारेट ओढतो आणि ती पण … म्हणजे पोर हातात चिरूट घेऊन जन्माला येणार" >चांगली उंच धिप्पाड मिळाली. कानडाऊ योगेशु - Wed, 21/10/2015 - 12:52 नवीन >चांगली उंच धिप्पाड मिळाली. अंगाखांद्यांवर खेळा मग मनसोक्त.हा.का.ना.का! (ह.घ्या.)

In reply to by मीउमेश

कशाला कशाला.. उग्गीच. असु द्या हो. राहू द्या. ;)