Skip to main content

आदूमामा

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 14/11/2015 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
तुला म्हणून सांगतो बे आभ्याs, या दारूच्या व्यसनात दोनच स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये आपण दारू पितो, तर दुसर्‍या स्टेजमध्ये दारू आपल्याला. या आदूची पहिली स्टेज तर केव्हाच पार झालीये. आता हि दुसरी कुठवर नेते हे बघायचय." .. कालपरवाच बोलल्यासारखे आदूचे हे शब्द कानात घोळत होते, अन इतक्यात दादरावरचा कोलाहल अचानक शांत झाला. कल्पना असूनही काळजात धस्स झाले. पाहिले तर चार टाळकी आदूच्या घराबाहेर जमताना दिसली. मी काय ते समजून चुकलो. आदू दुसरी स्टेज ओलांडून तिसर्‍या स्टेजला गेला होता. कधीही न परतण्यासाठी, कायमचाच! ***** आदूस !

२२-११-२०१५.....नुलकरां बरोबर ओरिगामी कट्टा...पुणे...

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 14/11/2015 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की, दिनांक २२-११-२०१५ रोजी, टिळक-स्मारक-मंदिर,टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे, इथे ओरिगामी कट्टा आयोजीत केला आहे. वेळ सकाळी ११-३० ते दुपारी ४-१५. काही अपरिहार्य कारणामुळे मी येवू शकत नाही. प्रथे प्रमाणे, पुण्यातल्या कट्ट्याबाबत ३-३ धागे काढावे, असे वाटत नसल्याने, वेळ, तारीख आणि ठिकाण सांगीतलेले आहेच.

जंटलमन्स गेम - २ - विझी, लाला आणि सीके

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 14/11/2015 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात आणि भारतीय उपखंडात क्रिकेटचा खेळ आणला तो ईस्ट इंडीया कंपनीच्या गोर्‍या इंग्रज साहेबांनी! भारतीय उपखंडात खेळल्या गेलेल्या क्रिकेटचा पहिला संदर्भ सापडतो तो ईस्ट इंडीया कंपनीच्याच एका रिपोर्टमध्ये. १७३७ मधल्या या रिपोर्टात बडोद्याजवळ कॅम्बे इथे १७२१ पासून इंग्रज अधिकारी क्रिकेट खेळत असल्याचा स्पष्टं उल्लेख आढळतो. पुढे १७८२ मध्ये कलकत्ता फुटबॉल आणि क्रिकेट क्लबची स्थापना झाली. काही वर्षांनीच मद्रासलाही क्रिकेट खेळलं गेल्याचा उल्लेख आढळतो.

रानडे काका...

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 14/11/2015 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
रानडे काका... बाबांचा जुना दोस्त! परदेशात होते दोघे, काही कारणास्तव पुण्यात आले ८०च्या दरम्यान, मग बाबा भारतात आले की वर्षातून एकदा नक्की भेट द्यायचे त्यांना. मग आम्ही कायमचे पुण्यात आलो १९९३ आँगस्ट नंतर, मग बाबा नेहमीच भेटायला जायचे कधी कधी मला आईला घेउन, कधी एकटे. दोन मुलं होती त्यानां, अमित दादा आणि त्याची छोटी बहीण आदिती...

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 14/11/2015 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

जमेल तितकं सांग...

लेखक अज्ञात यांनी शनिवार, 14/11/2015 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
जमेल तितकं सांग... बोटं पळतायत... डोकं चालतै... डोळे पाहातायत... अक्षरांची रांग... मन बोम्बलतय... जमेल तितकं सांग किती अक्षरं आली, आणि पुसली, कधी हसली अन कधी रुसली कैक रात्री बब्बूळांचा अंत बघत लिहीतोय कधी आई बाबांचा, कधी आजी आजोबांचा, कधी मित्रमैत्रणींचा, काही मोठे काही छोटे... आठवणींचे कधी... कधी स्वप्नांचे थवे सोडतोय. आत्ताचा क्षण सरपण सेकंदा पूर्वीचा...
काव्यरस

हुश्शार छोकरी

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 14/11/2015 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
हुश्शार छोकरी [म्हटले तर छोट्यांची; म्हटले तर मोठयांची गोष्ट! कथेतल्या छोकरीचे एकदम लग्न होते. ती राणीही होते..... सर्बियन लोककथेचा हा स्वैर अनुवाद , बालदिना निमित्त! शैशव जपलेल्या, जपू पाहणाऱ्या सर्वांना शुभेच्छा.] आटपाट नगरात एक हुश्शार छोकरी रहायची.राजापेक्षा हुशार. त्याच्या दरबाऱ्यापेक्षाहुशार. तिच्या बापाला छोकरीचा अभिमान वाटायचा. म्हणायचा, ‘सगळ्या राज्यात माझी छोकरी हुश्शार!’ राजाला ते कळले. त्याने बापाला बोलवून घेतले. विचारले, ‘तुझी छोकरी सगळ्या राज्यात हुश्शार?’ ‘होय, महाराज! आहेच ती!’ राजाने कोडे घातले. ‘ही अंडी घरी ने.

उद्दाम

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 14/11/2015 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
ना गावही तो राहिला ठाम पहिल्यासारखा ना काळही भासे अता उद्दाम पहिल्यासारखा त्या वादळाला सांग ना थांबायला आता जरा प्रगतीस नाही वेग तो बेफाम पहिल्यासारखा आता पुन्हा मिरवेन मी बुरखा जुना, समजा जुन्या नाही जमाना राहिला बदनाम पहिल्यासारखा झालो अता बघ मोकळा वागायला मजसारखा ना राहिलो माझ्यात मी सुतराम पहिल्यासारखा जगलोच जेत्या सारखा मृत्यूसही ललकारतो भोगावया तय्यार मी परिणाम पहिल्यासारखा विशाल
काव्यरस

ICU- २

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शुक्रवार, 13/11/2015 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
वि. सू. :- ICU-१ कुठे आहे विचारू नये. "पेशंट हळूहळू माणसात येतोय, डॉक्टर क्षीरसागर! सुधारणा आहे, डॉक्टर!" " माझी गर्लफ्रेंड माझी गर्लफ्रेंड करत असतो सतत येडझवा आहे!!" (आज सारखे सारखे आपलेच शब्द मागे घ्यावे लागताहेत राव. ) "सॉरी.... नो सुधारणा !
काव्यरस

डोकं दुखून भणभण पायो

लेखक सागरकदम यांनी शुक्रवार, 13/11/2015 15:48 या दिवशी प्रकाशित केले.