Skip to main content

या जगात तुम्हाला कुठे हरवायचं आहे

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 12/12/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मला बाबा आमटेंच्या 'आनंदवनात', अभय बंगाच्या 'मेळघाटात', कोकणकड्याच्या सावलीत वसलेल्या 'बेलपाड्यात', पृथ्वीवरचा स्वर्ग असलेल्या 'कश्मीर' च्या एखाद्या सफरचंदाच्या बागेत, जगात भारी पोहे आणि मालपुआ भेंटणार्या इंदोरच्या खाऊगल्ली मधे, दिलवालो की 'दिल्ली' च्या ' पराठेंवाली की गली' मध्ये, वाईन चा एक एक घोट घेत पॅरिसमधे, अगदी प्रेमाने 'पास्ता: आणि वुडफायर्ड 'पिझ्झा' खाऊ घालणार्या आजीबाईच्या 'इटली' मधल्या एखाद्या दुरच्या खेड्यात, चॉकलेट च माहेरघर असलेल्या 'स्विस' मधल्या एखाद्या चॉकलेट फॅक्टरी मधे, 'स्पेन' मधल्या 'टोमाटिनो' फेस्टिवल मधे, 'ग्लेनफिडीच' चा उगम असलेल्या 'स्कॉटलैंड' मधे, साहेबाच्या देशातल्य

देवाचं अज्ञान, कुतुहल आणि विज्ञान

लेखक पॉइंट ब्लँक यांनी शनिवार, 12/12/2015 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून देव आणि वि़ज्ञान ह्यावर दंगा करून पॉपकॉर्न उधळायला मिळतील असा गोड गैरसमज करून घेवू नये. कारण हा लेख एका पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी आहे. ह्या पुस्तकाचं नाव आहे "God's Debris". आणि लेखक आहेत "Dilbert" चे निर्माते Scott Adams. ह्या पुस्तकाविषयी सविस्तर लिहले तर वाचण्यातील मज्जा निघून जाईल कारण हा एक विचार प्रयोग आहे. पुस्तकाची रचना दोन व्यक्तींमधील संवाद आणि तेही प्रश्न-उत्तर स्वरूपात आहे. एक व्यक्ती आहे ज्ञानी तर दुसरी आपल्यासारखी गोंधळलेली. पुस्तकात देव किती ज्ञानी असनं हे देवासाठी फायद्याचं आहे ह्या विषयावर थोडं चिंतन करण्यात आलं आहे.

एक आटपाट नगर होतं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 12/12/2015 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्यावेळी व्हिडियो गेम्स नव्हते.त्यामुळे आमचे खेळ मैदानातच व्हायचे.रात्री जेवल्यानंतर दमल्यामुळे झोपेची पेंग यायला सुरवात व्हायची.बरेच वेळा झोपताना आम्ही आजोबांना गोष्ट सांगायला सांगायचो. बर्‍याच गोष्टी आम्हाला त्यांनी सांगीतल्या आहेत.त्यातली "एक आटपाट नगर होतं " ही त्यांची पेट गोष्ट आम्हाला फार आवडायची. आजोबा म्हणायचे, "एक आटपाट नगर होतं.तिथे राजा-राणी राज्य करायची.त्यांचा एक प्रधान होता.तो पण राजा-राणीच्या सत्त्तेत सामिल असणार हे उघड होतं.परंतु, राजाच्या बाजूने असलेली जनता आणि प्रधानाच्या बाजूने असलेली जनता यामधे चूरस असायची.असं असूनही वरकरणी राजा-प्रधानाची युतीची सत्ता होती असं भासवलं जायच

चमत्कारी बाबा (कथा)

लेखक आनंद कांबीकर यांनी शनिवार, 12/12/2015 00:59 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रि पोहचायला उशीर झाला म्हणुन सकाळी थोड़े जास्त झोपावे म्हटले तर मिल्याची काहीतरी शोधा शोध सुरु झाली. त्याने टीव्ही चा टेबल खर्रकण सरकावाला आणि मी उठुन बसलो. "काय शोधतोय रे, मिल्या?" "काय नाय, तु झोप" त्याची सरका सरकी चालूच. मी भिंतीला टेकुन त्याच्याकड़े पाहत बसलो. कॉट खाली, टेबलाखाली, टीव्ही मागे, बॅग मधे पाहुन झाल्यावर त्याला काहीतरी आठवल्या सारखे झाले. त्यानं रॅक मधल्या पुस्तकांच्या सांदित हात घातला आणि एक वाळलेले लिम्बु बाहेर काढले. ते दोन वेळा कपाळाला लाऊन उजव्या खिशात ठेवले. "हे शोधित होतो.

एक स्कॉर्पियो आणि सहा जण...

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 11/12/2015 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या २४ तासातल्या ९०० किमीच्या गुजरात मोहिमेबद्दल थोडक्यात. १. काल सहा वाजता विचारणा झाली. कुठे जायचे सांगितले नाही. सांगितलेले ठिकाण अजिबात ओळखीचे, स्मरणातले नाही. २. दहा हजार भरले की कुणीतरी बँक अधिकारी मुद्रालोन अंतर्गत दहा लाखाचे कर्ज मंजूर करून देतो. अशा अधिकार्‍याला सुरतमध्ये भेटायला जायचे आहे. दहा हजार द्यायची तयारी असेल तर चला. ३. प्रवास सुरु केल्यावर कळले की कुठल्या तरी मंदिरात दर्शनाला जायचे आहे. ४. रात्रभर गुजरात मॉडेलच्या नावाने बोटे मोडत, पाय मोडत अ‍ॅक्स्लिटर-ब्रेक-क्लचवर डान्स केला. ५.

विश्वाचे आर्त - भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 11/12/2015 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - काळाचा आवाका http://www.misalpav.com/node/33974 भाग २ - नासदीय सूक्त http://www.misalpav.com/node/33987 भाग ३ - अस्तिस्तोत्र http://www.misalpav.com/node/34009 भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर http://www.misalpav.com/node/34037 माझ्या लहानपणी घरी येणारे एक काका गंमत करण्यासाठी म्हणून 'कोंबडी आधी की अंडे आधी?' असा प्रश्न विचारायचे, आणि मी गोंधळात पडलो की कशी मजा आली म्हणून हसायचे.

कडेमनी कंपाऊंड

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/12/2015 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
जी ए कुलकर्णींच्या स्मृतीस..... कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा. अंगावर कातडी नसलेल्या माणसांच्या कथा त्याने इतक्या सोलीवपणे लिहिल्या, कि अंगभर कातडी असूनही आम्हाला पुन्हा नव्याने आरशात पहावे लागले. पुस्तके मनाचा आरसा असतात, कि फुटलेल्या काचेतून आरपार जाणारे माणसाचे अंतर्मन असते! पुस्तकांच्या नावापासूनच मनाचा कुठला तरी कोपरा धरधरीत अंधारात गळपटायचा. ‘रमलखुणा’ म्हटलं कि, आजही वाळूवर कुणीतरी काही गूढ लिहून गेलंय, त्याचा अर्थ लावता लावता माणसं परागंदा होतात, असं वाटतं. ‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’ आयुष्याच्या मध्यरात्रीही दचकून जागे करतात.

विश्वभरातील अन्याय्य विचार आणि वर्तन करणार्‍या 'त्या' पुरुषांनो- आणि 'त्या' स्त्रीया सुद्धा तुमचा जाहीर निषेध

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 11/12/2015 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
"वास्को -दा-गामा चे नामांतर आणि गोवेकरांची मानसिकता" या धागा लेखात गोवेकर महिलांनी " 'गोव्याची मुलगी' म्हटल्यावर समोरच्या (गोव्याबाहेरच्या) लोकांची दृष्टी जेव्हा बदलतात.." अशा स्वरुपाची नाराजी व्यक्त केली आहे; मी महाराष्ट्रातल्या ज्या भागतून येतो तेथे मी गोवेकर मुली अथवा स्त्रीयांबद्द्ल कोणतीही नकारात्मक अयोग्य भावना कधी ऐकली अथवा पाहिली नाही, परंतु एका स्त्रीला जेव्हा दुसरी स्त्री अनुमोदन देते आहे तेव्हा काही शहरातील काही समुह गटांकडून असा त्रास होत असला पाहीजे.

गॅलरीतला [तिसरा] पालापाचोळा

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/12/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
घरात माणसे कमी अन लोक वाढतात तेव्हा गॅलरीची 'एक्स्ट्रा रूम' होते! घरात नव्याला सूज येते अन जुन्याचे कुपोषण होते तेव्हा गॅलरीचा वृद्धाश्रम होतो! घरात वाचणारे कमी अन वाचाळ जास्त होतात तेव्हा गॅलरीचा रद्दीखाना होतो! घरात आवाज कमी अन गोंगाट जास्त होतो तेव्हा गॅलरीत 'सायलेंट झोन' येतो! घरात हवे ते कमी अन नको ते जास्त येते तेव्हा गॅलरी 'अडगळीची खोली' होते! घरात दिवस कमी अन रात्री जास्त होतात तेव्हा गॅलरीत बोन्साय वाढतात (?) घरात, घर कमी अन भिंती वाढतात तेव्हा गॅलरीला काचा बसतात, फक्त स्वतः चीच प्रतिमा दाखवणाऱ्या ! .

मिनि सबरीमाला कान्जुर मार्ग मुम्बई

लेखक शान्तिप्रिय यांनी शुक्रवार, 11/12/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
कान्जुरमार्ग पश्चिम मुम्बई येथे एन सी एच कोलोनी च्या आवारात एका छोट्या टेकडीवर अय्यप्पा सबरीमाला मंदीर आहे. जाण्यासाठी एल बी एस रोडवर हुमा टोकीज ला उतरून तेथून एन सी एच कोलोनीतून आत जाउन अर्ध्या किलोमीटर्नन्तर शंभर एकशेवीस पायऱ्या चढून गेल्यानंतर हे मंदिर आहे. मंदिर बऱ्यापैकी घनदाट झाडीत वसले आहे. मी भल्या सकाळी साडेसहाला या मंदिरात गेलो शांतता होती. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. पायऱ्या चढताना पण आजूबाजूला चांगला निसर्ग आहे. सकाळच्या वेळी एल बी एस रस्त्यावर वाहने कमी असल्यामुळे वर वाहनांचा आवाज जास्त ऐकू येत नव्हता .