Skip to main content

हुरहुर

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 18/12/2015 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
सावल्या झाकोळलेल्या बोलल्या वाऱ्यास हलके जा उन्हाला सांग आता, थांब.. घे थोडा विसावा पावले चालून थकली गाव अजुनी दूर माझा सांग त्या रस्त्यासही घे श्वास वेड्या तू जरासा सांजवेळी काहुर मनी, दाटती अवचीत डोळे अंतरीचा शाम कोठे ?
काव्यरस

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 18/12/2015 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

आई

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी गुरुवार, 17/12/2015 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
"आई " हाक मारली कि सारं आकाश डोळ्यात का गोळा होतं ? कधी कळलच नाही, इवल्याश्या तोंडातून काहीतरी भव्य बाहेर पडावं जसं ज्ञानेश्वरांच्या रेड्यामुखी गीता ! त्या लहानपणीच्या दुरवरच्या गावात ती देवघरात पूजेला बसायची अन् मी तिच्या मांडीवर डोके ठेवून निजायचो शांतपणे, रात्रभर पसरलेलं चांदण डोळ्यात साठवून ! क्षिताजापार सीमा शोधायचा एक जीवघेणा खेळ आयुष्यभर केला, नशाळलेल्या रात्री तिचा हात हातात घेतला की त्या सा-या सीमारेषा धुसर होतात त्याचवेळी क्षितीज धरतीला टेकून धरतीचॆ क्षमा मागू लागते तितकीच क्षमाशील ती मायेचा ओलावा डोळ्यात साठवून अवेळी बरसणारी ! नंदी गेली तेव्हा तिच्या डोळ्यात

मालवणाक जावचो बेत असा...

लेखक saumitrasalunke यांनी गुरुवार, 17/12/2015 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, २५ जानेवारीला कुडाळ किंवा कणकवलीला पोहोचायचे नक्की झाले आहे. सोबत पत्नी आणि मुलगा (वय वर्षे २) आहे. ट्रेकिंग आणि कामाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर कोकण, नाशिक परिसर फिरलो आहे. मात्र दक्षिण कोकणात आणि तेही कुटुंबासोबत जाण्याची हि पहिली वेळ आहे. हातात ३० तारखेपर्यंत वेळ आहे. किमान ३ दिवस मालवण व दोन दिवस रत्नागिरी परिसर पाहण्याची इच्छा आहे. (यात बदल सुचवू शकत असाल तर अगदी हक्काने सांगावे) स्वतःचे वाहन रत्नागिरीत मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे मानस यांच्या धाग्यावर गवि यांचा अप्रतिम प्रतिसाद पाहिला आहे. त्यामुळे कोणती स्थळे आणि परिसर पहायचा आहे याचा अभ्यास झाला आहे.

चिठ्ठी

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 17/12/2015 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
" चहा हवा असेल तर साखर घेऊन या राजे " आईने ने आज्ञा सोडली . तसा मी लगेच निघालो हि , चहा साठी काय पण . गल्लीच्या कोपऱ्यावर दुकान. नेहमीप्रमाणे गर्दी होतीच . कशाला उगाच गर्दीत शिरा.गर्दी जरा कमी झाली कि दुकानदार आपणच सांगेल . त्याला किलोभर साखर बांधायला सांगितली . आणि बाजूच्या कट्ट्यावर उभा राहिलो . तसा हि वेळच काढायचा होता . हे दुकान म्हणजे रोजच्या गावभारातल्या बातम्या मिळवण्याचं सर्वोत्तम ठिकाण. नेहमीची मंडळी होतीच आजूबाजूच्या गल्लीतली . मला बघितल्या बघितल्या बाळ्या हसला . "काय नाना , लई दिस खटे दिसला नैसाय ! " व्हय. कामाची वेळ ठरलेली नसते गा .

नौकर

लेखक आनंद कांबीकर यांनी बुधवार, 16/12/2015 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटच्या स्टॉपला बस थांबली. तो कंडक्टर जवळ गेला. "सायेब, महे पाच रुपै?" "सुट्टे नाही रे माझ्या जवळ" कंडक्टर त्याच्याकडे न पाहताच गुरकला. "सायेब, बघा की असलं त्?" "ओ, सरका की बाजूला. धड़ स्वतः उतरत नाही अन आम्हाला उतरु देत नाही" मागनं येणारी एक बाई चिरकली. तिच्या मागच्या बाईने, पाच रूपडयासाठी हुज्जत घालणाऱ्या 'त्याच्या' वर वंगळ कटाक्ष टाकला. तो थोड़ा सरकला आणि आणखीही काही तसल्याच वंगळ नजरा झेलत तिथेच उभा राहिला. "जाय खाली टपरीवर काही घ्यायचे असल तर घे, मजी सुट्टे होतील" "नै सायब, म्या पुडी गिडी खात नै" "दुसरं काही घे मग" "सायब, लेकानी मोजकच पैसं दिलतं.

"The Debt" च्या निमित्ताने

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 16/12/2015 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
deb सन १९९७, इजरायलमधील तेल अवीव्ह हे शहर. सारा गोल्ड नामक एका लेखिकेच्या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्काराच्या कार्यक्रमाने चित्रपटाला सुरूवात होते. साराची आई 'रेचेल सिंगर' हिच्या पुर्वायुष्यातील एक थरारक मिशनवर हे पुस्तक आधारलेले आहे. थरारक मिशन? तर रेचेल ही एक भुतपूर्व गुप्तहेर आहे, इजरायलच्या कुख्यात की ख्यातनाम 'मोस्साद'ची.

घोस्टहंटर-१

लेखक DEADPOOL यांनी बुधवार, 16/12/2015 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
"व्हू आर यू?" "युवर डेथ!" तो खाली कोसळला! "मनिष उठ!" एलिझाबेथ मनिषला उठवत होती. गेले काही दिवस मनिषचे झोपेचे प्रमाण वाढले होते. एलिझाबेथ याच काळजीत होती. शिवाय आताची केस तिच्या काळजीत भर घालत होती. ग्रेग मॉरिसन मर्डर केस! सर्व घोस्टहंटर यामुळे हादरले होते, कारण ग्रेग मॉरिसन हा घोस्टहंटर लोकांचा मुकुटमणी होता. जगात जिवंत लोक जेवढे भूतांना घाबरत नसतील तेवढी भुते ग्रेग मॉरिसनला घाबरत असत. "झोपू दे मला!" "अरे मूर्ख उठ!" "मी केस सॉल्व करतोय." एलिझाबेथ आता पूर्णपणे कंटाळली होती. कारण ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर राहणार होते.

विश्वाचे आर्त - भाग ६ - जंबोजेट दृष्टान्त

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 16/12/2015 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ - काळाचा आवाका भाग २ - नासदीय सूक्त भाग ३ - अस्तिस्तोत्र भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी अगदी कट्टर नास्तिक सोडले तर बहुतेक लोक कुठच्या ना कुठच्या उच्च शक्तीचे अस्तित्व मानतात.

आतातरी जाग

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी बुधवार, 16/12/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
उठा करुणाकरा पसरला काळोख सैतानी प्रवृत्तीची वाढली लगबग दयाघना आतातरी जाग ! क्रूसावरी लटकुनी करू नका डोळेझाक आंधळ्या जगात डोळस सावज प्रभो आतातरी जाग ! सीता जरी सुटली मातले रावण विवस्त्र द्रौपदीला पदरात घाल दयानिधी आतातरी जाग ! अश्वत्थाम्याच्या शराने डळमळे उत्तरेचा गर्भ अनिष्ट प्रव्रुत्तींचा करा विसर्ग श्रीहरी आतातरी जाग ! दिवस ग्रासल्या काळोखाला दाव प्रकाशास्त्र रुतल्या रथाचे सारथ्य त्याग विश्वरूपा आतातरी जाग ! विजयकुमार......... ०४.०९.२००९,मुंबई