शेवटच्या स्टॉपला बस थांबली. तो कंडक्टर जवळ गेला.
"सायेब, महे पाच रुपै?"
"सुट्टे नाही रे माझ्या जवळ" कंडक्टर त्याच्याकडे न पाहताच गुरकला.
"सायेब, बघा की असलं त्?"
"ओ, सरका की बाजूला. धड़ स्वतः उतरत नाही अन आम्हाला उतरु देत नाही" मागनं येणारी एक बाई चिरकली. तिच्या मागच्या बाईने, पाच रूपडयासाठी हुज्जत घालणाऱ्या 'त्याच्या' वर वंगळ कटाक्ष टाकला. तो थोड़ा सरकला आणि आणखीही काही तसल्याच वंगळ नजरा झेलत तिथेच उभा राहिला.
"जाय खाली टपरीवर काही घ्यायचे असल तर घे, मजी सुट्टे होतील"
"नै सायब, म्या पुडी गिडी खात नै"
"दुसरं काही घे मग"
"सायब, लेकानी मोजकच पैसं दिलतं. कै घेतं त माघरी जायला कमी पडन"
"आन ती पिशवि" कंडक्टर ने त्याच्या हातातली पिशवि स्वतः जवळ घेतली आणि त्याच्या हातात दहाची नोट ठेवत "जाय त्या टपरीवरुण माझ्यासाठी पाच रूपयाची गायछाप आन आणि पाच रुपये तु घी" म्हणाला.
एका हातात बसची दांडी धरत आणि दुसऱ्या हाताने पटका चाचपत म्हतारा खाली उतरला आणि लंगडत लंगडत कोपऱ्यावरच्या पानटपरीच्या दिशेने निघाला.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3358
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक नंबरची ...... असतात ही
सगळेच कंडक्टर असे नसतात ...
अन सगळे सरकारी नोकर ही असे
सहमत
In reply to अन सगळे सरकारी नोकर ही असे by कैलासवासी सोन्याबापु
सरकारी
In reply to अन सगळे सरकारी नोकर ही असे by कैलासवासी सोन्याबापु
कंडक्टर बद्दल चा एक अनुभव.
प्रसंग
In reply to कंडक्टर बद्दल चा एक अनुभव. by सतिश पाटील
ह्म्म्म
In reply to प्रसंग by आनंद कांबीकर
वा! चांगली आठवण!
In reply to कंडक्टर बद्दल चा एक अनुभव. by सतिश पाटील
सगळेच तसे नसतात, पण बरेच असे
वरील बरेच प्रतिसाद कंडक्टर
प्रसंग चांगला मांडलाय
छान
...