" चहा हवा असेल तर साखर घेऊन या राजे " आईने ने आज्ञा सोडली . तसा मी लगेच निघालो हि , चहा साठी काय पण . गल्लीच्या कोपऱ्यावर दुकान. नेहमीप्रमाणे गर्दी होतीच . कशाला उगाच गर्दीत शिरा.गर्दी जरा कमी झाली कि दुकानदार आपणच सांगेल . त्याला किलोभर साखर बांधायला सांगितली . आणि बाजूच्या कट्ट्यावर उभा राहिलो . तसा हि वेळच काढायचा होता . हे दुकान म्हणजे रोजच्या गावभारातल्या बातम्या मिळवण्याचं सर्वोत्तम ठिकाण. नेहमीची मंडळी होतीच आजूबाजूच्या गल्लीतली . मला बघितल्या बघितल्या बाळ्या हसला .
"काय नाना , लई दिस खटे दिसला नैसाय ! "
व्हय. कामाची वेळ ठरलेली नसते गा . कदी ६लाच येताव , कदी १२ वाजत्यात - मी
पैश्यासाटनं करूस पैजेच कि गा . पगार देत्यात न्हवं टाइमवर ? - बाळ्या
देत्यात कधी . कधी ३-४ दिवस हिक्डी तिकडी होताय . पैसा मिळतंय खरं . - मी
"तेच म्हत्वाचं देवा . पैसा पैजेच बग नाना . " एवढं बोलून खाली मान घालून गप्प बसून राहिला .
मला नाना म्हणायचं कारण म्हणजे . माझे आजोबा, गावाभरातल्या सगळ्यांसाठी सगळं केलं . कोणाचं रेशन कार्ड मिळवून दे , कि गावच्या टोकापर्यंत बस येउदे म्हणून सगळ्यांना गोळा करून KSRTC ऑफिस वर मोर्चा काढून बस चालू कर . लोकांना रॉकेल मिळेना म्हणून कुठून तरी आपल्या पैश्याने शे दीडशे लिटर विकत आणून ते गरिबांना फुकट वाट . विनोबा , गांधी आणि संघ . अश्या सगळ्या विचित्र मिश्रणातून तयार झालेली हि पिढी . स्वतःचं घर गहाण जाई पर्यंत आणि त्यानंतर हि फक्त मदत करत राहायचं . हेच याचं आयुष्याचं ध्येय .
या अश्या नानांबरोबर मी कायम हिंडायचो . मी हिंडायचो म्हणण्या पेक्षा ते घेऊन जायचे . वाड्याच्या कुठल्याही टोकाकडून "आदित्य , चल जरा बाहेर जाऊन येऊ" असा त्यांचा पक्का खर्ज्याताला आवाज घुमला, कि आदित्य तयार . मग जसं ते मागे हात बांधून चालतील तसं आपणही चालायचं . त्यामुळे ते असताना सगळी मंडळी मला छोटा पर्बकार म्हणणार किंवा नाना . आणि ते गेल्यावर मग मलाच नाना .
तर असो . विषय बाळ्याचा होता . नाना आठवले . राहवलं नाही . बोटं मोडून घेईन तेवढ्या श्रीखंडाच्या गोळ्या , असा हिशोब करणारे नाना . तर , असोच .
विषय ,बाळ्याचा होता .
तो गप्प बसलेला बघून मीच म्हणालो . . " अण्णा , राजा फास लावला म्हणे . काय झालं हो? गाडी घेऊन दिलेला नवे? खुश दिसत होता परवा तर ! "
बाळ्या - व्हय . माझंच नशीब गांडू . मोट्टा मुलगा म्हणून लाड केलो , डोक्यावरून चढून बसला होता भूस्नाल्या, तेला कोणती गोष्ट नाही म्हणालो नाही . तीच चूक केली बग जीण्यात . ल्हान होता तवाच जरा नकार ऐकायची सवय लाव्लो असतो . आज असं झालं नसतं . . "
मी - जे व्हायचं ते होऊन गेलं अण्णा , त्रास होतंय खरं . अजून लहान मुलगा आहे . आपल्या त्रासात त्याच्यावर दुर्लक्ष नको करू . तो सांभाळेल सगळं नीट . हुशार पण आहे , पण एकदम फास का लाऊन घेतला ? "
बाळ्या - हे पैल्यांदा न्हाई . तुज माहिती हैच कि सगळं . मोबाईल पैजे म्हणून हात कापून घेत्लन . मग त्याच कॉलेज मध्ये पाहिजे नाहीतर परत हात कापतो म्हनला . कर्ज काढून डोनेशन भरलो . आता गाडी पीजे म्हणून एकदा फासाचा पर्योग झाला . मिया जीवाला घाबरून गाडी घेऊन बी दिली . पर एक रेष पार झाली नाना तेव्हा . गाडी दिली . पण देताना संगीत्लो . आता जे काही पाहिजे ते स्वतः कमवून घे . शिकव्लाव पाहिजे तेवढं . ह्येची आई खंगली गा हे असलं बघून .
परवा लाख रुपेय दे म्हणाला . कशा साटनं ते बी संगीना. बाई बी म्हाएरी गेली व्हती . ऐकेचना पोर . माज्या समोरच फास लावला गा . गळ्यात दोर अडकून म्हणाला . पैसे दे न्हाई तर खुर्ची लाथाडतो . माजं बी डोस्क फिरलं . मीच काढली खुर्ची . अन हातात ठेवली चिट्टी लिवून .
" आजपर्यंत आयुष्यात आई बापाला त्रास देण्याशिवाय काही करू शकलो नाही . यापुढे हि काही करू शकणार नाही , जगण्यास काहीच अर्थ नाही , त्यामुळे फाशी लाऊन घेतोय . कोणासही जबाबदार धरू नये "
हि असली गांडू औलाद असण्यापेक्षा नसलेली बरी . जे मागेल ते सगळं हातात देऊन पण काही करू न शकणारा मुलगा असेल तर काहीच अर्थ नाही रे नाना . तू म्हणलास ते बरोबर . छोटा लई हुशार आहे . एक गोष्ट स्वतःहून मागत नाही . आम्ही जे दिल त्यात सुख मानताय . बारावीला फस्क्लास काढतो म्हणतोय . आता चैत्रात परीक्षा झाली . कि सगळं तेच्या नावावर टाक्तु . आणि पोलिसात जातु . ह्यो मोठा , ज्याने जीव भरला त्यालाच धमकी देत हुता सुळ्या लेकाचा .
तेवढ्यात दुकानदार ओरडला .
"मालक . साखर बांधलिया . तीस रुपये देवा . "
वाचने
8122
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
आइशप्पथ अद्द्या,
जबरदस्त हो रावसाहेब!
बाप रे
चिठ्ठी हादरा देऊन गेली आमच्या
+१
In reply to चिठ्ठी हादरा देऊन गेली आमच्या by एस
:(
निप्पणीचे की म्हनायच्चं काय
लय खतरनाक चिठ्ठी.
कथा उत्तम जमली आहे!!
तुफान !
जबरदस्त लिहिलीय
नेहेमीप्रमाणेच उत्तम!!
जबरदस्त.
उत्तम छोटेखानी कथा.
अद्द्या
निघायलाच हवे नाखुनकाका.
In reply to अद्द्या by नाखु
१०१%
In reply to अद्द्या by नाखु
भारीच आहे, लई विचार करायला
नाना बेस लिवलय!
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे
कथा आवडली
गाडी साठी/मुळे आत्महत्या समोर
लेखन आवडले. हे असं काही घरात
अद्द्या भाऊ,
झकास प्रकटन.
आपल्या मताचा आदर आहेच
In reply to झकास प्रकटन. by सस्नेह
चुकलं नै रे , 'पैजे' वगैरे
In reply to आपल्या मताचा आदर आहेच by अद्द्या
त्या टंकन चुका , आणि रात्री १
In reply to चुकलं नै रे , 'पैजे' वगैरे by सस्नेह
वाइन* च्यायला परत तेच
In reply to त्या टंकन चुका , आणि रात्री १ by अद्द्या
=))
In reply to वाइन* च्यायला परत तेच by अद्द्या
कसली विन विन सिचुएशन आहे :P
In reply to =)) by सस्नेह
हाहाहा.
In reply to कसली विन विन सिचुएशन आहे :P by कैलासवासी सोन्याबापु
च्यायाल डेंजर कथा आहे. उत्तम
मस्त जमलीय कथा. चित्र
सुरेख कथा
भाषा चंदगड तालुक्याची आहे
मस्तच
बापरे !!
:(
कथा आवडली
=]]
In reply to कथा आवडली by कपिलमुनी
बब्बो .... जबरदस्त लिवलय ! पण
अद्द्या भौ
अद्द्या भौ
आवडली कथा . मस्त लिहिलीये .
कथा छान आहे, पण मला शहरी
"भाषेशी जवळचा संबंध नसला की
In reply to कथा छान आहे, पण मला शहरी by मराठी कथालेखक
क्लास लिहिलयं हो!
बापाची व्यथा!
वाह अद्दया साहेब,.... तोडलत
व्वा
जबरदस्त कथा!
सुरेख
चान्गलं फ्क्त
In reply to सुरेख by वपाडाव