Skip to main content

वळण...

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 04/01/2016 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
दुपारची वेळ. मी बसची वाट पहात स्टॉपवर उभा होतो. बाजूने वाहनांची भरधाव वर्दळ सुरु होती. एक आलीशान गाडी उजवीकडून भर वेगात आली. समोरून तितक्याच वेगात पुढे गेली. पाचपन्नास फूट गेल्यावर करकचून ब्रेक लागला. गाडी हळुहळू पुढे गेली आणि जागा मिळताच यू टर्न मारून वळली. पुन्हा काही फूटावर वेगात गेली आणि तिथेही गाडीने यू टर्न घेतला. मी काहीशा रागाने, काहीशा उत्सुकतेनं त्या महागड्या गाडीच्या कसरती पाहात होतो. सत्तरएक लाखाची असावी! आता ती गाडी संथ गतीने माझ्या दिशेने येत होती. अगदी माझ्यासमोर येताच थांबली. डावीकडची काच खाली लयदारपणे खाली गेली... 'नमस्ते साब'...

सिंहलव्दीपाची सहल : १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 04/01/2016 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
================================================================== सिंहलव्दीपाची सहल : ०१ : प्रस्तावना आणि श्रीलंकेत आगमन...

लढा

लेखक शार्दुल_हातोळकर यांनी सोमवार, 04/01/2016 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
ते आले आणि वार केले मी धडपडलो पण भ्यालो नाही अपमान पचवु कसा म्हणत उगा मद्य प्यालो नाही केली त्यांनी अफाट निंदा मी मुळीच बधलो नाही दिखाव्याच्या प्रतिष्ठेसाठी दिखाऊपणे वदलो नाही उष्ण झळा येत गेल्या कोमेजलो पण हरलो नाही मनाला चटके बसले तरी काळजामधे झुरलो नाही सोसुन सारा ऊन-वारा नियतीशीही झुंजत राहीन खंबीरपणे उभा राहुन पहाडाशीही टक्कर घेईन आघात तर होतच राहतील लोक हसुन मजा पाहतील पाहणाऱ्यांना पाहु द्यावे आपण पुढे चालत राहावे रडणार नाही कुढणार नाही त्याचाच भाव चढा असेल आणि बेडरपणे पुढे जाणे हाच खरा लढा असेल - शार्दुल हातोळकर
काव्यरस

SLB चा बाजीराव-मस्तानी

लेखक वपाडाव यांनी सोमवार, 04/01/2016 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी बालपणापासून चित्रपटाचे संस्कार प्यालेला असल्याने, लोकांनी कितीही चिखलफेक केली तरीही, SLB चा "बाजीराव-मस्तानी" पाहायला जाणार ह्यात काही तिळमात्रदेखील शंका नव्हती. पण काही इतर कामात व्यग्र असले कारणाने पंधरा दिवस लागले. एकतर चित्रपटाचा फ्यान अन त्यात प्रेमरंगमहर्षी SLB म्हणजे आनंदाला पारावर उरला नाही माझ्या. आजही रामलीला-देवदास थेटरात लागल्यास ५ वेळा पाहून यीन इतकं प्रेम केलंय ह्याच्या कलाकृतीवर.

कुंकवाचा भार ना होतो कपाळी ...

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 04/01/2016 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
तू तरी कोठे तशी हसतेस आता बोलक्या मौनासही जपतेस आता पालखी माथ्यावरी रुतलीच आहे जोखडांना सौख्य तू म्हणतेस आता कुंकवाचा भार ना होतो कपाळी 'भाग्य' म्हणुनी त्यास का फसतेस आता कोडगा तो उंबरा हसतो मुक्याने का स्वतःची वंचना करतेस आता दांभिकांचे दंभ तू नाकार वेडे तूच दुर्गा, कालिका असतेस आता विशाल

कुठं कुठं जाऊ मी सांगायला?

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 04/01/2016 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं आता फक्त ऑफिस की हो उरलं! मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर. कोण नाही पर्वा करायला कुठं कुठं जाऊ मी सांगायला? थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला! रात्रभर एकटा बसू कसा? क्लायंटला अडचण सांगू कसा? बाकीचे सारे, प्रोफेशनल खरे जातात टायमात ते घरला! कुठं कुठं जाऊ मी सांगायला? जमेल तेवढं खेचून मी काम नाही केला आजिबात आराम सकाळ

राणीच्या बागेत - झाडांच्या सावलीत

लेखक कंजूस यांनी सोमवार, 04/01/2016 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
(फोटो नोकिया ६३० मोबाइलचे.) १) पत्रक

२ ) वेगळ्या कोनातून मनोरा

३ ) जमलेले इच्छुक गाइड उषाकडून माहिती ऐकताना-

४) जमलेले इच्छुक रिनी व्यास'कडून माहिती ऐकताना-

५ ) कैलास्पतीचे फळ

"तू"

लेखक पालीचा खंडोबा १ यांनी सोमवार, 04/01/2016 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी कितीही विखुरलो छिन्न भिन्न जाहलो तू मला गोळा करतेस लहान मुलाने चित्रकोडे एकत्र करावे तसे ......................! मी इतुका अवघडलेला तु मला सहज मोकळा करतेस ! सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ? मी नेहमीच फाटलेल्या वस्त्रासारखा अलगथलग तु सगळा मला जोडुन आईच्या मायेने, माझ्या फाटलेल्या वस्त्रांची गोधडी करतेस उबदार, आश्वस्त................... सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ? थंडी इतुकी कडाक्याची झाडांचे ही खराटे होतात गिळुनी सगळा उबदारपणा रात्रीही गारठ्तात तु मात्र............ मला बाहुपाशात घेऊन विश्वाची उब माझ्या शरीरात भरतेस ! सहजपणे सगळे कसे जमते तुला हे ? तुझ्या स्तनातून वाहणारे दूध नाकारून तु

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग २)

लेखक Anand More यांनी सोमवार, 04/01/2016 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ ________________________________________________________________________________________ ऑर्फिअसने अट मोडण्याची कारणे आणि ऑर्फिअसच्या कथेचे प्राथमिक आकलन काही कथा म्हणतात, ऑर्फिअस वेस ओलांडतो आणि मागे बघतो. पण युरीडीसीने वेस ओलांडली नसते. प्लुटो म्हणतो दोघांनी पाताळ लोक सोडून पृथ्वीवर पोहोचायच्या आधी मागे बघितलस, माझी अट मोडली म्हणून युरीडीसीला परत पाताळलोकात यावे लागणार. या कथेप्रमाणे ऑर्फिअस साधाभोळा दिसतो आणि प्लुटो शाब्दिक कसरती करून माणसाला फसवणारा दुष्ट मृत्युदेव दिसतो. यात ऑर्फिअस आणि युरीडीसी दोघंही सहजीवनाची आस असलेले पण नियतीच्या अगम्य चक्रात अडकून देवाकडून फसवले गेलेले प्रेमी जीव दिसतात.

मै तो चला

लेखक नितीनचंद्र यांनी सोमवार, 04/01/2016 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
जसा चंद्र कविच्या मनाला मोहवतो आणि अनेक काव्य निर्माण होतात किंवा अनेक व्यक्ती, घटना आणि घ्येयासक्ती अनेक कथा किंवा कादबंर्यांच्या लेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. मला कधी रस्ता या विषयावर लिहाव लागेल अस वाटल नव्हत. रस्ते माणसे किंवा वाहने यांच्या वहातुक सोयीसाठी असतात इतकच मनावर बिंबल होत. एखादा रस्ता नविन झाला म्हणजे आजुबाजुच्या जागेचे भाव वाढतात. नविन दुकाने. व्यावसायीक संस्था त्या रस्त्यावर आपले स्थान पक्के करतात हे ही माहित होत. नविन रस्त्यामुळे अर्थकारणांना चालना मिळते हे ही माहित होत. जुनाच रस्ता मात्र अर्थकारणांना चालना देतो हे मात्र पिंपरी- चिंचवड मधले रस्ते पाहिले की समजत.