रामा मेघ दे : नाटकाच्या अगोदरचे पूर्वांक
नाटक वेड्या मंडळीचे नाटक वेड हा एक लेखनाचा वेगळा विषय ठरावा. नाटकासाठी हे मंडळी कायकाय करतील सांगणे कट्।ईण आहे. स्टेजवर येवून सादरीकरण करतानाची उण्यापुर्या अडीच तीन तासांची ती झिंग त्याना आयुष्यभर जिवंत ठेवते.
एखाद्या नाटकाच्या संहीता लिहीण्या पासून ते ते नाटक स्टेजवर अवतरणापर्यन्त प्रवास हा काही वेगळाच असतो.
दक्षीण अफ्रीकेत असताना मी एक नाटक लिहिले. अस्सल आपल्या मातीतले.
इकडे आल्यानंतर मी ते काही निर्मात्याना दाखवले. नाटकाचा विषय अगदी आपल्या नेहमीच्या परिचयातला. निर्मात्याना नाटकाची थीम आवडायची पण नाटकात पंधरा सोळा कलाकार आहेत म्हंटल्यावर गाडी व्यावसायीक गणीताच्या रुळांवर अडकायची.
मिसळपाव