Skip to main content

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 03/03/2016 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

भारतीय राष्ट्रवाद, जे एन यु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह (भाग ७)

लेखक Anand More यांनी गुरुवार, 03/03/2016 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६ ----------------------------------------------- मला सर्व २९ घोषणांचा तपशील मिळाला नाही. म्हणून ज्यांच्याबद्दल सर्वत्र जोरदार चर्चा झाली त्याबद्दलच बोलतो. ज्या क्रमाने ह्या घोषणा दिल्या गेल्या तो क्रम मला माहीत नाही, म्हणून मी मला आठवल्या त्या क्रमाने त्यांबद्दल लिहितो.

निसर्गचक्र

लेखक कवि मनाचा यांनी बुधवार, 02/03/2016 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
न मागताही तो सर्वांना भरभरुन देतो, मिळवल्याचे श्रेय मात्र मी स्वतःकडे घेतो! तहानलेल्या धरतीला पहिला पाऊस सुखावतो, पण त्याआधी नभांना गारवा कोण देतो, अथांग त्याची कृपा, प्रत्येकाला आपला वाटा ठरवून देतो, जसे समुद्र स्वतःतले बाष्प, नभांसाठी आधीच राखून ठेवतो.

वाढदिवस

लेखक कवि मनाचा यांनी बुधवार, 02/03/2016 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
आणि तो दिवस पुन्हा खूप दिवसांनी येतो, उगाचच खूप मोठे झाल्याचे भासवतो, मित्रांच्या शुभेच्छा संदेश पहात भूतकाळात रमवतो, शाळेच्या वर्गात, क्रिकेटच्या ग्राउंडवर, मंदिराच्या पायऱ्यांवर, रेल्वेच्या क्रॉसींगवर, गावच्या नदीवर, कधी धरणावर तर कधी विष्णूच्या तळ्यावर फक्त मनानेच हुंदडत असतो, पाणावलेल्या डोळ्यांत एकच प्रश्न अनुत्तरीत असतो, आपण उगाचच एवढे मोठे का होत असतो, आणि तो दिवस पुन्हा खूप दिवसांनी पुन्हा येतो.
काव्यरस

जीवनसंगीत

लेखक कवि मनाचा यांनी बुधवार, 02/03/2016 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
देवा तुझ्या नामानं, मीपण गळलं बासुरीगत झाले मनं, रितं न् पोकळं तुझ्या फुंकरेने केले, स्वर हे मधाळं संगीतमय झाले सारे, जीवन सकळं
काव्यरस

मिपा रंगभूषा मंडळ

लेखक सरपंच यांनी बुधवार, 02/03/2016 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार, मिसळपाव.कॉम वर येणार्‍या साहित्यासोबतच मिपाला सजवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रेखांकनांची, चित्रांची तसेच वेगवेगळ्या प्रसंगी विशेष फलकांची गरज पडते. अश्यावेळी मिपाकरांपैकी ज्यांना शक्य असेल ते लोक असे काम करतात. आता मिपाला या प्रकारच्या कामाची वारंवार गरज पडत असल्यामुळे अश्या मिपाकरांचे एक मंडळ असावे जे या ग्राफिक्सच्या क्षेत्रात काम करतात किंवा हौशी आहेत. अश्या लोकांचे मिळूण एक मिपा रंगभूषा मंडळ आजपासून कार्यरत होतेय. आज या मंडळात अभ्या...

मोसाद - भाग ८

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 02/03/2016 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
. मोसाद - भाग ७ मोसाद - भाग ८ १७ ऑगस्ट १९६६. इझराईलच्या उत्तरेला असलेल्या हात्झोर एअरफोर्स बेसवर असलेल्या रडार यंत्रणेच्या पडद्यावर एक छोटा ठिपका अवतीर्ण झाला. कुठलंतरी विमान इझराईलच्या हवाई हद्दीच्या जवळ येत होतं. आश्चर्याची गोष्ट ही होती, की बहुतेक वेळा असं झाल्यावर इझराईलची मिराज विमानं या आगंतुक विमानाला घेरण्यासाठी हवेत झेपावली असती.

भटकंती गिफ्ट शॉप

लेखक किलमाऊस्की यांनी बुधवार, 02/03/2016 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader body { background-image: url("https://lh3.googleusercontent.com/-4IV7c0ur4aU/VtIMF96j2AI/AAAAAAAAATs/xqn2GqLx4B8/s200-Ic42/BhatkantiBgPatrn.png"); background-repeat: repeat; } .inwrap { border: 0.5em solid transparent; -webkit-border-image: url("https://lh3.googleusercontent.com/-_wyGcMw9TLs/VtMIiDZ_UDI/AAAAAAAAAYI/pkuBjbfWrnc/s512-Ic42/Border.png") 10 round; /* Safari 3.1-5 */ -o-border-image: url("https://lh3.googleus
विशेष