नेसरी स्मारक / सामानगड / रांगणा नाईट ट्रेक
क्रिसमसच्या दिवशी मुंबई ते उरण साई मंदिर हे ३५ किमी पदयात्रा करताना पायाच्या तळव्याला दुखापत झाली होती त्यामुळे या ट्रेकला कितपत चालता येईल याची शंका होती. तसाच दुखरा पाय घेऊन २५ डिसेंबरला मुंबईहून आम्ही निघालेलो २६ डिसेंबर ला सकाळी गडहिंग्लज येथील महागाव येथे उतरलो. शिवाजी महाराजांसारखी दाढी ठेवलेला एक तिशीचा मुलगा आमची सगळी व्यवस्था पाहत होता. अंगाने काटक, हसरा चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्व यामुळे त्यांच्याशी ओळख होऊन गप्पा देखील सुरु झाल्या. संतोष हासुरकर त्याचे नाव. संतोष दुर्गवीर संस्थेतर्फे गडांच्या संवर्धनाचे काम करतात. आम्ही त्यांच्याच सासुरवाडीत उतरलो होतो.
मिसळपाव
मार्टिन क्रो हे नाव माझ्यासाठी माझ्या लहानपणाच्या क्रिकेटवेडाने भारलेल्या दिवसांच्या अनेक आठवणी जागृत करते.