ओला कॅब्जचा नवा फंडा : रायडींग चार्जेस
परवा ओलाची कॅब बुक केली तेंव्हा बिलात किलोमीटर चार्जेस बरोबर रायडींग चार्जेस लावून बील आलं. हे चार्जेस म्हणजे तुम्ही जितका वेळ प्रवास केला तितक्या मिनीटांसाठी एक रुपया प्रती मिनीट इतकी रक्कम.
मी तक्रार दाखल केली आणि त्यांना कळवलं की एकतर तुम्ही किलोमीटर्सप्रमाणे चार्ज करा किंवा ट्रॅवल टाईमप्रमाणे चार्ज करा. खरं तर किलोमीटर्स प्रमाणे चार्ज केल्यावर रायडींग टाईमचा प्रश्नच येत नाही. वेटींग चार्जेस वेगळे लावले जातात ते मान्य आहेत कारण तेवढा वेळ तुमची कॅब डिटेन झालेली असते पण रायडींग टाईम हा सर्वस्वी ट्रॅफिक सिच्युएशनवर अवलंबून आहे आणि त्यात कस्टमर्सचा काहीएक हात नाही.
मिसळपाव