Skip to main content

..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 18/05/2016 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
..कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले.. हातात हात आले,ह्रदयात नाम झाले ती सोबतीस आली,कामात काम झाले शिकवण समान होती,त्यांची जरी तरी ती.. कोणी कसाब झाले,कोणी कलाम झाले.. ऐटीत कार गेली,मंत्रीमहोदयांची.. शिस्तीत चालणारे,ट्राफिक जाम झाले.. सारेच चोर होते,पण एकला पळाला त्याच्या फरार नावे,नंतर इनाम झाले रावण नको म्हणुनि,ज्यांना पसंत केले ते ही पुढे परंतु,पुरते हराम झाले त्यांचीच सर्व दु:खे,त्यांनाच छान विकली पाहुनि खूश तेव्हा,पब्लिक तमाम झाले शेजारुनि निघाली,अवखळ बदाम राणी खिडकित त्वरित गोळा,सारे गुलाम झाले रस्ते अरूंद झाले,शेतात फ्लॅट आले, गुत्तेहि बार झाले,विकसित ग्राम झाले + कानडाऊ योगेशु

आयेश्वराच्या अंगणी

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 18/05/2016 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
तशी बहुत वरुषांची गोष्ट. ८००/ १००० वर्षांपूर्वीची. तेव्हा इये देशी देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. सेऊणदेशचे यादव. देवगिरी ही राजधानी म्हणून स्थापित व्हायची होती. यादव तेव्हा इथे राज्य करत होते ते राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणूनच. यादवांचीच एक शाखा अंजनेरीला होती. सेऊणचंद्र तिसरा ह्याचा शिलालेखच अंजनेरीच्या एका जैन मंदिरात आहे. अंजनेरीचे यादव हे बहुधा जैन धर्मीय होते. यादवांची दुसरी शाखा होती सिंदिनेरात, सिंदीनेर अथवा सिंदनगर म्हणजेच आजचं सिन्नर, नाशिकजवळचं. ह्या सिन्नरातच यादवकालीन स्थापत्यशैलीचे काही अवशेष आहेत. त्यातलं प्रमुख म्हणजे गोंदेश्वर अथवा गोविंंदेश्वर मंदिर.

...वरना इक और कलंदर होता

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 18/05/2016 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी नेहमीसारखाच दिवस होता. नेहमीसारखाच प्रवास; नेहमीच्याच दोन ठिकाणांमधला. घर ते कामाचं ठिकाण. तोच ट्रॅफिक, तेच सगळं. पण कधीकधी अशी एखादी छोटीशी गोष्ट, तीही नेहमीचीच, अगदी नव्याने समोर येते आणि बाकी सगळ्या नेहमीच्या गोष्टींवर हळुवार फुंकर मारून जाते. आणि दीर्घकाळ मग तो गारवा पुरतो. तर, गाडीतल्या स्टिरिओवर हरिहरनची एक ग़ज़ल लागली. तसा ग़ज़ल हा मुळातच हळुवार विषय आणि त्यात ग़ुलाम अली, मेहदी हसन, किंवा तसे नव्या पिढीचे हरिहरन असतील तर मग आवाजाबररोबर शब्दांचा अर्थही अ‍ॅम्प्लिफाय होऊन तुमच्यापर्यंत येतो.

एक संघ मैदानातला - भाग ९

लेखक शि बि आय यांनी बुधवार, 18/05/2016 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळी ग्राउंडवर सगळेच जोशात होते. उद्या निघायचं म्हणून आज काही जास्त प्रँक्टिस नव्हती आणि मुख्य म्हणजे आज फायनल ७ ची कव्हर कळणार होती. आप्पा म्हणाल्या प्रमाणे ते काही टूरला येऊ शकत नव्हते त्यामुळे बर्याचश्या गोष्टी आजच ठरणार होत्या. १७ मुलींमधून टूरला जाणाऱ्या १२ जणी...... त्यातून सर्वप्रथम मैदानात उतरणाऱ्या ७ जणी कोण ? वाँर्मअप झाला थोडी स्किल प्रँक्टिस झाली, आळीपाळीने सगळ्यांची कव्हर फिरवून झाली. खंर तर आम्ही वाट बघत होतो की आप्पा आत्ता सगळ्यांना बोलावतील आणि टूरची टीम सांगून पुढचा प्लान सांगतील. पण कसलं काय आणि कसलं काय?

गेले मोदी कुणीकडे

लेखक anilchembur यांनी मंगळवार, 17/05/2016 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांचा पाऊस पडे सारखा महागाईलाही पूर चढे विमान उडवीत चहूकडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे शिक्षण खोटे पदवी खोटी मंत्रीणबाई तुळशी झाली केजरीवालची पडता बिजली दचकून तीचा ऊर उडे गं बाई .... गेले मोदी कुणीकडे पैसा काळा आणू म्हणुनी ठोकूनी भाषण दाही दिशांनी चाय - गाय पे चर्चा करूनी मनकी बाता देश बुडे , गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे चीनमध्ये झोपाळ्यावरुनी दाढीवाले बिंब बघूनी हसता संघ भगव्या रानी धर्म अफूचे ऊन पडे गं बाई ....

चिमणीचे दप्तर.

लेखक Sanjay Uwach यांनी मंगळवार, 17/05/2016 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
परमेश्वराने स्त्री व पुरुष अशा दोन जाती जरी निर्माण केल्या असल्या तरी त्यांच्यात एकमेकाबद्दल वाटणारे प्रेम, आदर , आपुलकी, जिव्हाळा हे मात्र कांही वेगळेच असते . मग हे नाते मुलाचे व आईचे असेल किंवा वडिलांचे व त्यांच्या मुलीचे असेल अथवा भाऊ बहिणीचे ही असू शकेल, मात्र नात्या प्रमाणे प्रत्येकाची एकमेकाबद्दल असणारी ही ओढ, ही कांही न्यारीच असते आणी शेवटी स्त्री व पुरुषाला जन्म देणारी एकमेव व्यक्ती ही स्त्रीच असते . आता पहा ना, माझी सात वर्षाची छोटी मुलगी ,मी तिला प्रेमाने "चिमणी" म्हणतो . तिची आणि माझी अशी काय गट्टी जमते कि कधी कधी मला असे वाटू लागते कि आपण तिच्या शिवाय राहुच शकणार नाही.

आमचे सार्वजनिक व्यावसायिक अनुभव !

लेखक चिनार यांनी मंगळवार, 17/05/2016 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : राहते घर वेळ: शनिवार, सकाळचे दहा वाजलेले प्रसंग : घरातल्या बाथरूममधले गीझर २ दिवसांपासून खराब झालेले आहे. त्यामुळे घरातले वातावरण जरा 'तापलेले' आहे. दोन दिवस काय केले हा प्रश्न इथे गैरलागू ठरतो कारण फाईव्ह डे वीकच्या संस्कृतीत घरगुती कामांचे स्टेटस हे फक्त शनिवारी अपडेट होते. तेसुद्धा सकाळी ९ ते १ किंवा संध्याकाळी ६ ते ९ ह्याच वेळात ! (दुपारी १ ते ५, मी चितळ्यांची परंपरा पाळून ढाराढूर झोपतो. ह्यावेळी जगाने मला त्रास देऊ नये ,मी जगाला देणार नाही एवढी माफक अपेक्षा!). शनिवारच्या या वेळापत्रकात जर एखादे काम झाले नाही तर ते पुढच्या शनिवारी ढकलले जाते.

गोकर्ण आणि कारवार सहली विषयी मार्गदर्शन हव आहे.

लेखक झंप्या सावंत यांनी मंगळवार, 17/05/2016 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
गोकर्ण आणि कारवार सहली विषयी मार्गदर्शन हव आहे. ४ दिवसांचा कालावधी आहे. सह परिवार रहाण्यास उत्तम पर्याय मिळेल का ? कुणाला या बाबत अधिक माहिती असेल तर सांगा प्लीज. जुना धागा असेल तर कृपया इथे नमूद करावा. धन्यवाद .

दन दन दनाट झिंगाट सैराट..

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 17/05/2016 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी चित्रपटांच्या वाटेला मी मुळीच जात नाही याची एक नाही अनेक कारणं. वास्तवाशी फारकत घेतलेलं टेलरमेड कथानक. स्टुडीओतलेच नव्हे तर कित्येकदा चक्क स्टेजवर मागे पडदे रंगवलेले सीन. आउटटेकिंग मधले दारिद्र्य. सेटिंगचे दारिद्र्य. कृत्रिम ढंगाचे लाडिक संवाद आणि अतिशय बोल्ड, नको इतका ठसठशीत अभिनय, ओव्हरअ‍ॅक्टिंग. प्रेक्षक हा जणू एक मठ्ठ धोंडा आहे अशा थाटात सर्व पात्रे आपले अभिनय-पियुष त्याच्यावर संततधारेने ओतत असतात. यामुळे मराठी चित्रपट बघण्यापेक्षा एखादा अ‍ॅनिमेशन चित्रपट बघितलेला बरा. पण इथे ‘सैराट’ ची लैच चर्चा चालली तसं कुतूहल उड्या मारू लागलं.