उडता पंजाब - एक रखरखीत वास्तव!
पाहिला मी काल "उडता पंजाब" चित्रपट.
सतत पंजाबला चित्रपटात " खेतो का खलीहानो का " "सोनी सोनी कुडीयों का आणि आदरातिथ्यात उत्तम असणारा असे (हे खरे असो वा नसो) सादर करणाऱ्या चित्रपटसृष्टीने पंजाबच्या खेडोपाड्यातील भयाण वास्तव दाखवण्याचे केलेले धाडस स्वागतार्ह आहे. मला व्यक्तीश: वाटते की असा चित्रपट दोन तीन वर्षांपूर्वीच आला पाहिजे होता. असो "बेटर लेट देन नेव्हर".
चित्रपट पंजाबचे भयाण वास्तव दाखवतो. आलिया भटला अभिनयाची उत्तम जाण आहे. पैशाच्या आणि प्रसिध्धीच्या हव्यासापायी नकळत ड्रग कडे ओढली जाणारी एक खेळाडू तिने वठवली आहे. एक नंबर अभिनय तिचाच.
मिसळपाव